मान्सून म्हणजे काय रे भाऊ ?
नेमेचि येतो पावसाळा हे आपणास ठाऊकच आहे म्हणूनच त्याला मोसमी पाऊस /पावसाळा असेही म्हणतात. पण तो नक्की कधी येणार, कसा , किती प्रमाणात येणार या आणि तत्सम भाकितांवर भारतासारख्या विशाल , खंडप्राय देश्याच्या आर्थिक , सामाजिक , राजकीय आणि एकूणच जागतिक लोकसंख्येत अंदाजे १८-२०% इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या जनतेच्या किमान वर्षभराच्या जीवनमानाची गणिते -ठोकताळे अवलंबून असतात . नाही म्हणायला आताश्या बाळसे धरू लागलेला नव-श्रीमंत विविध उद्योजक, नोकरदार , व्यावसायिक आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात असलेले राजकीय उद्योजक अश्या सर्वांचा अपवाद तेवढा गृहीत धरावा लागेल कारण पाऊस वगैरे सारख्या घटकांचा त्यांच्या अर्थार्जानावर फारसा काही विपरीत परिणाम संभवत नाही (झाला तर फायदाच होतो कारण दुष्काळ म्हणजे वेगवेगळ्या योजनांची खैरातच की हो म्हणूनच दुष्काळ आवडे सर्वांना असे ख्यात आहेच या वर्गाबद्दल). असो तर असा हा मोसमी पाऊस "मान्सून" नामक विशिष्ट पद्धतीने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहावर अवलंबून असतो हे आपणास ढोबळमानाने ठाऊक आहे. पण मान्सू...