Posts

Showing posts from February, 2017

समस्त मराठी जनांना #जागतिक मराठी भाषा दिवसाच्या' हार्दिक शुभेच्छा!

माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन ,स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान.......असे प्रतिपादन करणारे महान कविवर्य #कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस. हाच दिवस आपण #जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो.तेव्हा समस्त मराठी जनांना 'जागतिक मराठी भाषा दिवसाच्या' हार्दिक शुभेच्छा! कुसुमाग्रज यांची एक नितांत सुंदर आणि आजही समयोचित असलेली अर्थपूर्ण कविता........                                                                                                                                                                                                                              दर्शनाला आलात? या.. पण या देवालयात, सध्या देव नाही गाभारा आहे, चांदीचे मखर आहे. सोन्याच्या सम्या आहेत, हिर्यांची झालर आहे. त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या पाहीलात ना तो रिकामा गाभारा? नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा दोन तास वामकुक्षी घ्यायचा सार काही ठीक चालले होते.