Posts

Showing posts from December, 2014

खरी चूक देवाचीच

रागावू नका मंडळी, कोणाच्याच भावना दुखवायची माझी इच्छा नाही; पण शांतपणे विचार करून पाहिलात, तर तुम्हीसुद्धा 'चूक देवाचीच आहे' हे लगेच कबूल कराल. देवाचा अवमान करण्याचा तर माझा काडीमात्र हेतू नाही. त्याच्याशी पंगा घेऊन, मेल्यानंतर मला नरकात जाऊन पडायचे आहे थोडेच? देव सर्वशक्तिमान आहे. साऱ्या विश्वाचा व्यवहार केवळ त्याच्या इच्छेनुरूप चालतो. आपण कोणाच्या पोटी, केव्हा आणि कुठे जन्म घ्यायचा, जन्मभर काय भोग वा हालअपेष्टा भोगायच्या, केव्हा मरायचे हे सारे देवच ठरवतो. जिवंतपणी आपल्या हातून कोणती कृत्ये व्हावीत, इतकेच काय, पण आपल्या मनात कोणते विचार यावेत, हेही सारे केवळ देवच ठरवतो. टाचणीच्या टोकावर ज्यांचा मेंदू ठेवला तरीदेखील त्या टोकावर मूळ जागेइतकीच जागा शिल्लक राहील, अशा किडय़ा-मुंगीसारख्या क्षुद्र (क्षुद्र केवळ आपल्या लेखी हं, परमेश्वराच्या लेखी नव्हे! कारण तीही त्याचीच निर्मिती आहे ना?) जीवांनासुद्धा आहार, निद्रा, भय, मथुन या गोष्टी परमेश्वराने त्यांच्या जीन्समध्ये आणि डीएनएमध्ये लिखित स्वरूपात दिल्या आहेत. आपण ती लिपी अजून तरी वाचू शकत नाही, ही बाब वेगळी! श्वसन, पचन, उत्सर्जन,

समाजाला सुसंस्कृत करण्याचे समर्थ माध्यम आणि मोहंमद रफी साहेब

सिनेमा ज्याला लिहिता-वाचता येत नव्हतं अशा निरक्षरांना सुशिक्षित करण्याचं सिनेमा हे एकमेव तत्कालीन साधन ठरलं. अशा या सिनेमाचा जन्म सन १८९५ मध्ये पॅरिसमध्ये झाला. या नवनिर्मित कलाकृतीच्या किमयेनं माणसाची जीवनशैलीच प्रभावित केली. लोकांना या कलाकृतीचं अक्षरश: वेड लागलं. या वेडानं, महाराष्ट्रातील दादासाहेब फाळके नावाचं प्रभावशाली व्यक्तिमत्त्व इतकं झपाटल्या गेलं की, लगेच परदेशात जाऊन त्यांनी या कलेचे तांत्रिक, वैज्ञानिक आणि आर्थिक बारकावे शिकून घेतले आणि आपल्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वानं सन १९१३ मध्ये ‘राजा हरिश्‍चंद्र’ हा संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला चित्रपट तयार करून, भारतात चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. मात्र, हा मूक चित्रपट होता. पुढे ध्वनीचं तंत्रज्ञान विकसित होत गेलं आणि सन १९३१ मध्ये ‘आलमआरा’ हा पहिला बोलपट भारतात तयार झाला. सिनेमा हे जनमाध्यम आहे आणि ते समाजप्रबोधनाचेही माध्यम होऊ शकते, हे तत्कालीन जाणत्या मंडळीला कळून चुकले. अशिक्षितांना चित्रपटांनी करमणुकीसोबतच विविध विषयांचे ज्ञान दिले. स्वातंत्र्य, समता, बंधुता व मानवता या मूल्यांची जोपासना करण्यासाठी आ

ओळख असू द्या : लेखक-शफाअत खान

ओळख नसणे हे सर्व मानवी दु:खांचं मूळ आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे. ओळख हवीच. ओळख नसलेला माणूस ताशी शंभर मैल वेगाने धावला तरी इंचभरही पुढे सरकत नाही. ओळख असलेला झोपून राहिला तरी तो उठायच्या आत शंभर मैल पुढे गेलेला असतो. आता मी ठरवून टाकलं आहे- मागे राहायचं नाही. ओळखी वाढवायच्या. लहान-थोर, भला-बुरा दिसेल त्याच्याशी सलगी करायची, सर्वाशी खेळीमेळीनं वागायचं. छोटय़ांना कडेवर घ्यायचं, मधल्यांवर प्रेम करायचं, ज्येष्ठांच्या पायावर पडायचं. ओळखी वाढवून पुढे जायचं. खूप मोठं व्हायचं. पूर्वी बालमनावर संस्कार करण्यासाठी गोष्टी सांगण्याची पद्धत होती. मी ऐकलेली एक गोष्ट मला सतत आठवते. गोष्टीत मोठय़ा प्रवासाला निघालेला एक नायक असतो. तो लगबगीनं चालत असताना अचानक मागून हाका ऐकू येतात. तो गडबडतो. थांबतो. मागे वळून बघतो. तो थांबून मागे वळतो- न वळतो तोच त्याचा दगड होत असे. आता रस्ते दिसत नाहीत. दगडच दिसतात. सर्व रस्ते खचाखच दगडांनी भरून गेले आहेत. थांबून, मागे वळून बघणारे पायाखाली दगड होऊन पडले आहेत. आता आपला दगड होऊ नये म्हणून आपण कुणाच्या हाकेला 'ओ' देत नाही. थांबत नाही. धावत राहतो. 'थांबला तो

हवेलीरामचा किमतराय By गिरीश कुबेर

Image
किमतराय गुप्ता हे गेल्या आठवडय़ात गेले. वय तसं काही फार होतं असं नाही. ७७ वर्षांचे होते ते. तब्येतीनं खरं तर ठणठणीत होते. पण हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि जागच्या जागीच गेले. मोठा माणूस. जवळपास २०० कोटी डॉलरची उलाढाल होती त्यांची. ..पण त्यांच्या मरणाची बातमीदेखील आली नाही कुठे. अनेकांना तर माहीतही नसेल कोण हे किमतराय म्हणून. आता व्यक्तीच माहीत नाही तर त्यांची किंमत कशी असणार आपल्याला. आता तर तोही प्रश्न येणार नाही. कारण ते गेलेच. निदान गेल्यानंतर तरी त्यांच्या कर्तृत्वाचा परिचय व्हावा म्हणून हा प्रपंच. आपण तेवढा तरी तो करून घेतला पाहिजे. कारण अगदी आंतरराष्ट्रीय वाटावा असा एक मोठा ब्रॅण्ड त्यांनी आपल्या देशाला दिला. किंबहुना आजही अनेकांना माहीतही नसेल आपण कौतुक करतोय ते उत्पादन आपल्या देशाचं आहे म्हणून. किमतराय हे काही जन्मजात उद्योगपती नव्हेत. जन्म गरिबीतला. पंजाबातल्या मालेरकोटला गावात. वडील शेतमजुरी करायचे. पोरांना शिकवायची वगरे बोंबच. गरिबाच्या घरी पोरांनी आपापल्या पायावर उभं राहायची गरज असते. शिक्षणापेक्षा जगण्याचं आव्हान केव्हाही मोठंच असतं. त्यामुळे गरिबाची मुलं शिकली नाही तरी