Posts

Showing posts from May, 2014

एक शहेनशाह कि लंबी कहानी -डॉ. यशवंत रायकर

Image
शहाजानचं आयुष्य म्हणजे एक दीर्घकथा आहे. ज्यात अनेक पापुद्रे आहेत. पति-पत्नीच्या अमेर प्रेम कहाणीचे, पिता-पुत्र संघर्षांचे आणि भाऊबंदकीचे अनेक पदर आहेत.शाहजहान बादशहाचे जीवन एक दीर्घकथा आहे, सत्यकथा आहे. एका महानायकाची ती शोकान्तिका आहे. सुबत्ता आणि सुवर्ण काळातून दुर्दशा आणि दुष्काळात घेऊन जाणाऱ्या घटनांची हकीकत आहे. त्याचबरोबर कथेत कथा गुंफल्या जाव्यात, तशा घडामोडींचे कथा सरित्सागर नव्हे, पण सरोवर आहे. म्हणून हे कथानक वीर, रौद्र, भयानक, बीभत्स, शृंगार, हास्य व करुण अशा रसांची अनुभूती देत पुढे सरकते. शाहजहानचा काळ मोगल साम्राज्याचा सुवर्णकाळ होता. ताजमहल (१६३१-१६४८) हे त्याच्या उच्चांकाचे प्रतीक. सुबत्तेशिवाय अशी किमया साकारणे शक्य नव्हते. या बादशहाची कारकीर्द १६२८ ते १६५८. म्हणजे त्याने तीस वर्षे राज्य केले. पण तो जगला ७४ वर्षे (१५९२- १६६६).  म्हणून शाहजहानची म्हणजे खुर्रमची कथा सुरू होते अकबराच्या काळात आणि संपते औरंगजेबाच्या कैदेत. त्यामुळे चार बडय़ा मोगल सम्राटांबद्दल ती बरेच काही सांगून जाते. दिग्विजयाच्या घोडदौडीची परिणती विपन्नावस्था व विनाश यात कशी होत गेली व त

Interesting...मानवी हातावर दिसणाऱ्या रेषा व इतर चिन्हे माकडाच्या हातावरपण??

Image
मानवासारखा दिसणारा एक प्राणी म्हणजे माकड. या माकडापासूनच मानवाची उत्पत्ती झाली, असे उत्क्रांतीवाद मानतो. माकड आणि मानव हे पुष्कळ अंशी साम्य असलेले दोन प्राणी आहेत यात शंका नाही. परंतु या दोघांमध्ये फरक म्हणजे मानवाला शेपूट नाही आणि वानराला शेपूट आहे. दुसरा फरक म्हणजे मानवाला दोन पाय आहेत आणि या दोन पायांवरच माणूस चालतो तर माकड चार पायांवर चालते. याचाच अर्थ माकडाला हात नसून चार पायच आहेत. परंतु पुष्कळ वेळा असे बघितले गेले आहे की, माकड आपल्या पुढील दोन पायांचा मानवाप्रमाणेच उपयोग करून घेऊ शकते. म्हणून त्यांच्या पुढील दोन पायांना हस्तसामुद्रिकाच्या दृष्टिकोनातून हात म्हणावयास हरकत नाही. कारण पुढील दोन पाय जवळजवळ मानवाच्या हातासारखेच असतात. मानवी हातावर दिसणाऱ्या रेषा व इतर चिन्हे माकडाच्या हातावरपण सापडत असावीत का, असा विचार मनात आल्यामुळे हस्तसामुद्रिक अश्विन रेळे यांनी माकडांच्या हातांचा अभ्यास करण्याचे ठरविले. ही कल्पना डोक्यात आल्यानंतर अर्थातच त्यांनी जिजामाता उद्यान गाठले. संबंधित अधिकाऱ्याला ही कल्पना सांगितली आणि माकडांच्या हाताचे (?) ठसे मिळवून देण्याची विनंती केल