Posts

Showing posts from August, 2016

उंचीचे गट करायला काय हरकत आहे? अशोक नायगावकर

Image
प्रिय तातूस, ‘मन की बात’ ऐकता ऐकता गेल्या आठवडय़ापासून ऑलिम्पिकमुळे आपण ‘तन की बात’मध्ये गुंग झालो. टीव्हीमुळे हे सगळं बघायला मिळतं बघ! अरे, या जगात काय काय खेळ आहेत- बघून आपण थक्क होतो. मुळात जगात इतके देश आहेत याचंच आश्चर्य वाटतं. लहानपणी मला फक्त आपल्याच गावात लोक राहतात असं वाटायचं. पण एवढी वेगवेगळी नाकी, डोळी, उंची अशी माणसं बघून गंमतच वाटत राहते. अरे, बास्केटबॉल खेळणाऱ्या बायका किती उंच असतात! आपल्या बायकांना साधा फळीवरचा डबा काढायचा तर स्टुल घ्यावं लागतं. या बायका किती अलगद एसटीत बॅगा वर ठेवत असतील! मला आश्चर्य वाटतं, ते म्हणजे माणूस वजन वाढवू शकतो, दाढी वगैरे वाढवतो, पण ताडमाड उंची कशी काय वाढवतात, काही कळत नाही. पण यामध्ये खरे तर अन्यायदेखील आहे असं मला वाटतं! कुस्तीत कसं वेगवेगळ्या वजनाचे गट असतात, तसे उंचीचे गट करायला काय हरकत आहे! आणि त्याप्रमाणे बास्केटची उंची पण कमी-जास्त करायला हवी. असो. पण खरी मजा ‘जिम्नॅस्टिक्स’ बघताना येते. अरे, डोळ्यांचं पारणं फिटेल अशा शरीराच्या होणाऱ्या अद्भुत, लयबद्ध कसरती बघायला मिळतात. काय ते खेळाडू हवेत कोलांटय़ा मारून अलगद गादीवर पावले टेकतात

‘सर्न’द्वारी नटराज! (लीना दामले)

Image
‘सर्न’ "Conseil Européen pour la Recherche Nucléaire" द्वारी नटराज! जिनिव्हा-  स्विझर्लंड  येथील‘द युरोपियन सेंटर फॉर रिसर्च इन पार्टिकल फिजिक्स’च्या (सर्न) मुख्य इमारतीबाहेर एक भलीमोठी ब्रॉन्झची नटराजाची मूर्ती आहे. भारत सरकारने ती भेट म्हणून या संस्थेला दिली आहे. विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य शोधून काढणारे वैज्ञानिक संशोधन ज्या ठिकाणी होते आहे अशा जागी नटराजाच्या मूर्तीचे काय काम, असा प्रश्न स्वाभाविकपणे कुणालाही पडेल. त्यामागचे कारण विशद करणारा लेख.. ‘द युरोपियन सेंटर फॉर रिसर्च इन पार्टिकल फिजिक्स’ (सर्न), जिनिव्हा,  स्विझर्लंड  येथे मुख्य इमारतीच्या बाहेर एक भलीमोठी ब्रॉन्झची नटराजाची मूर्ती आहे. ती मूर्ती ताम्रयुगातील कुणा कारागिराने घडवलेली नसून आधुनिक काळातील शिल्पकारांनी कलात्मकरीतीने बनवलेली आहे. ही मूर्ती भारत सरकारकडून ‘सर्न’ला देणगी म्हणून देण्यात आली आहे. १८ जून २००४ रोजी या दोन मीटर उंचीच्या नटराजाच्या मूर्तीचे अनावरण जीनिव्हातील भारताचे राजदूत के. एम. चंद्रशेखर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी भारताचे विख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर आणि डायरेक्टर जनरल ऑफ

‘बाल्टिमोर बुलेट‘

Image
खेळाडू कितीही जन्मजात प्रतिभावान असला तरी त्याचे विक्रमवीरात रूपांतर होणे, हे एकट्याचे काम नसते. त्याचे यश वैयक्‍तिक असले, तरी त्याच्या पूर्वतयारीत अनेकांचा हातभार लागावा लागतो. फेल्प्सच्या पदकविक्रमानेही हेच दाखवून दिले आहे.  युद्धे, उत्पात, चक्री वादळे, महापूर असल्या रेट्यांमध्ये साम्राज्ये लयाला जातात. राजशकटे उलथतात. खंदे वीर मातीत मिसळतात. इतिहास कूस बदलत राहातो. पण पुन्हा नव्याने सारे उभे राहाते, नव्याने सारे जमीनदोस्त होते. इतिहास आणि वर्तमानाचे चक्र चालूच राहाते. पण साऱ्याचा अर्थ ‘मातीवर चढणे एक नवा थर अंती‘ एवढाच. पण मानवजातीनेच मांडलेल्या या खेळात सारेच काही निरर्थकाचे प्रवासी नसतात. यद्धभूमी वा राजकारणाविनाही काही व्यक्‍तिमत्त्वे इतिहास घडवताना दिसतात. मानवी क्षमतांच्याही पलीकडे जाणाऱ्या या अतिमानवी व्यक्‍तींना खरे व्यासपीठ मिळते ते ऑलिंपिक खेळांचे. युद्धे आणि रणांगणाविनाही अजिंक्‍यवीराचा सन्मान प्राप्त करता येतो, ही शिकवण ऑलिंपिक चळवळीने जगताला दिली. प्राचीन ग्रीक इतिहासातही अशा अलौकिक वीरांच्या गाथा उपलब्ध आहेत. प्राचीन ऑलिंपिक सोहळ्यात, नेमके सांगावयाचे तर सुमारे 21

जगण्याचा जामीनदार! (आसाराम लोमटे)

Image
माणूस जगतो तो निसर्गाच्या आधाराने. त्याला मिळणारा प्रत्येक श्वास, त्याच्या भोवतालच्या सृष्टीतली हालचाल, त्याच्या भोवतीच्या पर्यावरणाचे उसासे आणि असंख्य जिवांनी भरलेले अवघे चराचर.. ही सृष्टीची किमया साकारणारा पाऊसच आहे. तो पारखा झाला तर माणूस माणसात राहत नाही. अन् त्यानेच जर दिलदारी दाखवली तर मग तरारणाऱ्या कोंभासारखे जगणेही पीळदार होऊन जाते.. केवळ छाती भरून मृद्गंध घेण्यासाठी आसुसलेल्यांना या पावसाने उल्हसित केलेच; पण छाती फाटेस्तोर राबले तरीही हाती काही उरत नाही असा अनुभव नेहमीच घेणाऱ्यांना त्याने ‘आबाद’ केले आहे. त्यांच्या जगण्याचा जामीनदार म्हणूनच धावून आलाय तो.. ज्या उजाड माळरानावर भयाण दुपारी दुष्काळाच्या जिभा फिरलेल्या असतात, तिथेच आता गवताला तुरे लागावेत, ही करामत कोणाची? आईचा तेल माखणारा हातही पारखा झालेल्या एखाद्या अनाथ लेकराचे केस वाऱ्यावर भुरुभुरु उडताना दिसावेत तसे ज्या डोंगरांचे माथे दिसू लागतात, तिथेच दाटून आलेली हिरव्यागार गवताची उतू जाणारी साय पसरवतो कोण? अन् वाऱ्यावर डफासारखी थरारणारी हिरवी सळसळ कोणाचं बोट धरून येते? निष्पाप झाडानं आपले हडकुळे हात पसरावेत आभाळाच्या