Posts

Showing posts from November, 2014

उपमा-डॉ. अंकुर रविकांत देशपांडे

Image
उपम्यावरील एक खुसखुशीत आणि अभ्यासपूर्ण लेख __________________________________________________________  पोहे आणि उपमा हे महाराष्ट्रात घरोघरी हमखास केले जाणारे आणि सहसा सगळ्यांना आवडणारे पदार्थ. त्यातल्या उपम्याचा महिमा- उपमा हा खरेतर सर्वकालीन महान खाद्य पदार्थ. पश्चिम महाराष्ट्राचे राष्ट्रीय खाद्य असलेल्या 'कांदेपोह्य़ां'नंतर सबंध महाराष्ट्राने ज्या खाद्यपदार्थावर मनापासून प्रेम केले असा हा पदार्थ. सध्या 'चेंज' म्हणून लाल ड्रॅगनसह अ‍ॅल्युमिनियमचे स्वच्छ घासलेले, पण झाकण लावायच्या खोबणीत कोणाची दृष्ट लागू नये इतपतच काळ्या रंगाची रेघ असलेले मोठ्ठे कुकर रस्तोरस्ती दिसून येतात. हरकत नाही.. लपंडाव खेळताना एखादा पोट्टा त्यात जाऊन लपला तर दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत सापडणार नाही याची खात्री.. महाराष्ट्रीय माणूस दिवसभर दाक्षिणात्य इडली- वडे-डोसे (पचायला हलके असते. यू नो अँड इट हॅज लेस कॅलरीज कम्पेअर्ड टू आऊटडेटेड शिरा अँड सांजा.. समोर असतो 'चीज डोसा'. असो) खातो. उत्तर भारतीयाने सामोसा असे न म्हणता 'समोसा' म्हणून समोर आणून ठेवलेला त्रिकोण. ज्या त्रिकोणातल