Posts

Showing posts from July, 2015

इंटरनेटचा महामार्ग आणि ‘ट्रॅफिकजॅम’? - डॉ. अनिल लचके

इंटरनेट म्हणजे अब्जावधी संगणकांना जोडलेलं एक जटिल जाळं आहे. जगातील दोनशे देशांमधील सुमारे तीनशे कोटी ‘नेटिझन्स’ इंटरनेटमार्फत परस्परांशी प्रत्यक्ष वार्तालाप-आणि विविध आर्थिक-सामाजिक व्यवहार अहोरात्र साधत असतात. वर्ल्ड वाईड वेबमध्ये विविध माहिती, ब्लॉग, ट्विटर, यूट्यूब, वर्तमानपत्रे, ई-मेल, हाय-डेफिनिशन चित्रपट वगैरे समाविष्ट आहेत. कोणत्याही वेळी स्काइपवर सरासरी एक कोटी लोक तासन्‌तास एकमेकांसमोर बसून गप्पा रंगवत असतात. वर्ल्ड वाईड वेब हा तर इंटरनेटचा एक भाग आहे. यामध्ये मजकूर-चित्र(फीत)-ध्वनी असं सर्व तातडीने उपलब्ध होत असल्यामुळे इंटरनेट लोकप्रिय झालंय. इ. स. २०००पासून माहितीचा हा खजिना प्रतिवर्षी ६० टक्‍क्‍यांनी वाढतोय. पुढील दहा वर्षांत त्याचा वापर पन्नास पट वाढणार आहे. त्यामुळे हवी ती माहिती घरोघरी पोचवणाऱ्या इंटरनेटच्या महामार्गात आता अनेक अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. संभाव्य ‘ट्रॅफिकजॅम’ टाळण्यासाठी आता संशोधक प्रयत्नशील आहेत. भावीकाळात टीव्ही प्रक्षेपण आणि इंटरनेटचा वापर करताना त्रिमितीयुक्त होलोग्राफिक जिवंत प्रतिमा दिसतील. या अप्रतिम चित्रांसाठी माहितीचा गंगौघ तीस गिगाबिटस्‌