Posts

Showing posts from April, 2017

अन्नपूर्णाची खाद्य चॅनेल्स-शुभा प्रभू-साटम

Image
आधुनिक माध्यमातल्या, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या या अन्नपूर्णा. सगळ्या जणींना खरं तर स्वयंपाकाची, खाऊ घालण्याची आवड, यातून बिनभांडवली व्यवसाय सुरू झाला, खाद्य चॅनेल्सचा. ‘यू-टय़ूब’वर एक असतं, एकदा का लाइक्स् मिळायला लागले आणि सबस्क्रायबर वाढायला लागले की ‘स्काय इज द लिमिट’. कुठला पदार्थ कोणाला, कुठे, कसा आणि का आवडेल हे सांगताही येत नाही. रूपाच्या सोलकढीला कॉकटेल्स म्हणून अनेक जण सव्‍‌र्ह करतात. मधुराच्या वांग्याच्या भाजीवर मध्यपूर्वेवरून पंसती मिळाली आहे. अर्चनाच्या पाककृती करून त्याचे फोटो आवर्जून तिला पाठवणारे अनेक जण आहेत. कल्पनालाही पाठारे प्रभू समाजातूनच पोचपावती मिळालीय. शुभांगी कीरने दाखवलेली अंडय़ाची भुर्जी असंख्य एकटय़ा राहणाऱ्या पुरुषांच्या मदतीला धावून आलेली आहे.. खाद्यचॅनेल्स आणि आधुनिक माध्यमातल्या या अन्नपूर्णाविषयी.. १) अर्चना अर्ते २) कल्पना तळपदे ३) स्मिता मयेकर ४) रुपा नाबर ५) मधुरा बाचल  ६) शुभांगी कीर स्वयंपाकाची संथा.. फार आधी ती घरातून मिळायची. आजी, आई, काकूकडून नंतर सासूकडून. बाईला स्वयंपाक आलाच पाहिजे ही विचारसरणी त्याचा मुख्य आधार. त्यासाठी आधी करायल

जातीच्या अस्मितेमुळे सामाजिक समरसता धोक्यात!

आपल्या जातीची प्रखर अस्मिता बाळगणारे, आपल्या जातीतील भ्रष्ट पुढार्‍यांच्याही समर्थनार्थ रस्त्यावर उतरणारे महाभाग मात्र गुणवान, चारित्र्यवान व्यक्ती केवळ आपल्या जातीची नाही म्हणून त्याची जराही कदर करण्यास तयार नसतात. आपल्या भारतीय समाजाच्या या दोगलेपणाचं मला केव्हा केव्हा मोठं आश्‍चर्य आणि वैषम्य वाटतं. जातीच्या नावावर आवाहन केलं की, भारतातील प्रत्येक जातीचा समाज संघटित व आक्रमक होताना दिसतो; पण अशा संघटित व आक्रमक लोकांच्या वैयक्तिक जीवनाकडे पाहिलं तर काय दिसतं? भावाभावांत, वडील-मुलात, काका-पुतण्यात वडिलोपार्जित घर, शेती, पैसा, सोने यांच्या वाटणीबाबत टोकाचे वादच नव्हे, तर कट्‌टर शत्रुत्व आहे. कोर्टकचेर्‍यांच्या वार्‍या आहेत, रोेजची भांडणं आहेत, मारामार्‍या, खुनाखुनी आहे. आपल्या वाटणीची घराची दहा फूट जागा, तोळाभर सोनं किंवा शेतीतील एक गुंठा जागा कुणी एकमेकांसाठी सोडायला तयार नाही. भावांनी भावाशी कसं वागायला पाहिजे यासाठी आम्ही रामायणाचा नव्हे, तर महाभारताचा आदर्श सहीसही आपल्या आचरणात उतरविला आहे! सर्वनाश झाला तरी चालेल, पण सुईच्या अग्रावर मावेल एवढाही वडिलोपार्जित जमिनीचा तुकडा भावाला

एक तितली थी... (प्रवीण टोकेकर)

Image
खरं तर ‘पॅपिआँ’ ही कादंबरी म्हणूनच लिहिण्यात आली होती; पण आत्मचरित्र म्हणून जास्त खपेल, असं प्रकाशकाचं मत पडल्यानं तिचा पोत बदलला. साहजिकच, चित्रपट बघतानाही हे सगळं एका माणसाच्या आयुष्यात घडलं असेल, यावर विश्‍वास बसणं तसं कठीण होतं. त्याच्या छातीवर एक फुलपाखरू गोंदवलेलं होतं: पॅपिआँ (#Papillon) . म्हणून त्याला पॅपी म्हणायचे. पेशा विचाराल तर अट्टल तिजोरीफोड्या; पण एका वेश्‍येच्या माडीवर त्यानं म्हणे एका दलालाचा गळा चिरला. धरपकड झाली. मग जन्मठेपेची शिक्षा. आता फ्रान्स विसरायचं. दूर दक्षिण अमेरिकेत फ्रेंच गयाना आहे, तिथल्या तुरुंगात कैद भोगायची. कैद भोगून झाल्यावर तिथंच, त्या बेटांवर कामधाम शोधून उरलेलं आयुष्य काढायचं. इथं फ्रान्सच्या किनाऱ्यावर परत पाऊल ठेवायचं नाही. खुनाचा ‘खोटा’ आरोप शिरावर घेऊन पॅपी बोटीवर चढला. ही घटना २४ ऑक्‍टोबर १९३१ ची. पुढच्या चौदा वर्षांत पॅपीनं अर्धा डझन वेळा तुरुंगातून पळ काढला. दरवेळी पकडला गेला. ३० एप्रिल १९४५ रोजी त्यानं डेव्हिल्स आयलंड या बेटावरून समुद्रात पुन्हा एकवार उडी मारली. ती मात्र त्याला संपूर्ण स्वातंत्र्य देणारी ठरली. हाच पॅपी प