Posts

Showing posts from October, 2016

लक्ष दीप उजळले! -मल्हार अरणकल्ले

Image
संध्याकाळ भरून आली आहे. क्षणाक्षणाला गडदपणा दाट होतो आहे. पणत्यांचे, आकाशदीपांचे तेजाकार त्यावर उमटत आहेत. अंगणांत, खिडक्‍यांत, सज्ज्यांत, उद्यानांत तेजोमय प्रकाशज्योतींचं साम्राज्य लखलखत आहे. रांगोळ्यांची चिन्हं या तेजाक्षरांचे अर्थ खुलवीत-फुलवीत आहेत. एका अपूर्व तेजानं दीपोत्सवाचा आनंद ओसंडून गेला आहे.  भरलेल्या आनंदाचा प्रत्येक कण म्हणजे त्याचं सूक्ष्मरूप असतो. इवल्या पणतीतल्या वातीच्या शीर्षावर नाचणाऱ्या ज्योतीतही ब्रह्मतेजाचं रूप सामावलेलं असतं. आपण सगळेच भव्यतेचं कौतुक करतो; पण ही भव्यता ज्या छोट्या छोट्या प्रयत्नांतून साकारलेली असते, त्या प्रयत्नांच्या वाट्याला कृतज्ञतेचा शब्द क्वचितच येतो.  पणतीचा आकार बोटं जुळवून होणाऱ्या खोलगट तळव्यासारखा असतो. या तळव्याची मध्यमा इतर बोटांपेक्षा काहीशी मोठी, सशक्त असते. ही मध्यमा तळव्यातल्या सकारात्मकतेचं ज्योतिरूप असते. पणतीतली ज्योतही कडेच्या एका बिंदूच्या आधारानं उंचावलेली असते. ज्योतीचा पाया टोकदार असतो आणि तिच्या शीर्षबिंदूवरही तेजाचंच टोक असतं. मध्यभागी ज्योत विस्तारलेली असते. अंधकाराचे अनेक आळोखेपिळोखे ती गिळून टाकते. पुन्हा टोक

मराठीचे लक्ष बहुभाषांकडे हवे... - डॉ. केशव देशमुख

Image
गेल्या तीन दशकांतील मराठी म्हणून लिहिले गेलेले सर्जनशील साहित्य व त्यापूर्वीची समृद्ध साहित्य परंपरा केवळ श्रेष्ठच नाही, तर ती जागतिक म्हणून तसूभरही कमी नाही. फक्त अनुवादातून बहुभाषांकडे जाण्याचा प्रवास धीमा आहे. तेव्हा बहुभाषा अवगत करण्यासाठी सकारात्मक होण्याची गरज आहे.  मराठीला ज्ञानपीठ सन्मान कमी का मिळाले आणि उशिरा का मिळाले? अशी एक रास्त मीमांसा केली जाते. याचे उत्तर मराठीचे "मराठीपुरते‘ शहाणे असेही आहे. मराठीत विलक्षण क्षमता असूनही आणि महानुभाव, वारकरी संस्कृतीचे मराठीला भव्य अधिष्ठान असूनही अनुवादांसारख्या क्षेत्रातून ही मराठी जागतिक झाली नाही, हे एक कारण कटू असले तरी खरे आहे. दाखला द्यायचा झाला तरी बाबूराव बागूल, रा. चिं. ढेरे, अशोक केळकर किंवा नामदेव ढसाळ, यशवंतराव चव्हाण, गो. नी. दांडेकर किंवा विजय तेंडूलकर, वि. द. घाटे, व्यंकटेश माडगूळकर असे वीसचाही आकडा ओलांडून सांगता येतील एवढे श्रेष्ठ लेखक मराठीत आहेत. पण "ज्ञानपीठा‘पर्यंत पोचलेले नाहीत. इंग्रजीचे ज्ञान, अनुवादाचे काम आणि या आवश्‍यक बाबीमुळे मराठीची सशक्त साहित्यसंपदा असूनही, सर्वस्वी राष्ट्रीय

खड् खड् खड्डे-निखिल रत्नपारखी

Image
नुकताच वाहतुकीच्या नियमासंदर्भातला एक व्हिडिओ  व्हॉट्सअ‍ॅपवर बघायला मिळाला. सरकारने वाहतूक नियंत्रणामध्ये काही सुधारणा करायच्या ठरवल्या आहेत आणि त्यासाठी ठिकठिकाणी किंवा चौकाचौकात कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे जो कोणी वाहतुकीच्या नियमांचा भंग करू धजावेल त्याला पुराव्यानिशी कचाटय़ात पकडायचा. सरकारचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे, असे म्हणायला हरकत नाही. सहज गंमत म्हणून तुम्ही सिग्नल मोडायला जाल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊन दंडाची पावती फोटोसकट तुमच्या घरी येईल. तो मी नव्हतोच, कधी, कुठे, तुमचा काही तरी गैरसमज होतोय वगैरे फालतू वितंडवाद किंवा पळवाटांना आता जागाच नाही. आता माझ्या मनात एवढीच शंका येत आहे. एखादा उत्साही गृहस्थ या फोटोंचा अल्बम करून घरी येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या करमणुकीसाठी त्या फोटोचे प्रदर्शन तर मांडणार नाही ना? हा फोटो मी अमूक एका चौकात गणपुल्यांच्या मर्तिकाला जात असताना सिग्नल तोडला तेव्हाचा. हे आम्ही ट्रिपलसीट डान्सबारमध्ये निघालो होतो तेव्हाचा. हा मी नो एन्ट्रीतून प्रेयसीला भेटायला जात असतानाचा. हा मी गाडी चालवत असताना, मोबाइलवर क्रिकेट स्कोअरची चर्चा करत