Posts

Showing posts from July, 2013

मनमोराचा पिसारा.. भाषेची गम्मत जगण्यातली जम्मत-डॉ. राजेंद्र बर्वे

मनमोराचा पिसारा.. भाषेची गम्मत जगण्यातली जम्मत- डॉ. राजेंद्र बर्वे   जगण्याबद्दल आणि जीवनाविषयी आसक्ती ऐवजी जिज्ञासा वाटू लागली ना मित्रा, की आयुष्य बदलून जातं. जगण्याविषयी उत्सुकता म्हणजे जगणाऱ्या माणसांविषयी कुतूहल. कोण कसा जगतो? त्यानं तसं जीवन का निवडलं याविषयी कोणताही अभिनिवेश न बाळगता विचार केला की आपला स्वत:विषयीचा दृष्टिकोन बदलतो. आपण अधिक सजगपणे जगतो, जगण्याचा ना कंटाळा येत, नाही त्यात मन गुंतूनही राहात. जगण्यातल्या या गमतीजमती शोधण्याकरता भाषेचा अभ्यास करायला ही गंमत वाटते. भाषेतल्या म्हणी नि वाक्प्रचार यांच्याकडे विश्लेषक नजरेनं पाहिलं की त्या समाजाविषयी अधिक माहिती कळते. उदा. पूर्वी आपल्याकडे परीक्षा देणे याला मांडवाखालून जाणे असा वाक्प्रचार होता. परीक्षेचा नि मांडवाचा काय संबंध? लग्नाचे मांडव आपल्याला निदान ऐकून माहिती आहेत, पण परीक्षेचे? मित्रा, पूर्वी परीक्षेला बसण्यासाठी वर्गाची आणि बंद खोलीची सोय नव्हती, त्यामुळे मांडवात मॅट्रिकच्या परीक्षा घेतल्या जायच्या. त्यामुळे लग्नाच्या मांडवात शिरण्यापूर्वी परीक्षेच्या मांडवातून जावं लागायचं. त्यासाठी परीक्षेत पास व्हावं, अशीह