Posts

Showing posts from June, 2017

आपली राष्ट्रीय दांभिकता-मंदार भारदे

विचार हे वाईनसारखे असतात. ते जितके जुने होत जातात तितके अधिक किमती आणि मौल्यवान होत जातात, असे मीच मागे एकदा प्रचंड मोठय़ा जाहीर सभेत जनसमुदायाबरोबर कोपऱ्यात बसलेलो असताना मनातल्या मनात म्हणालो होतो. मी दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी जन्माला आलो असतो आणि वाचाळही असतो तर माझ्या विचारांना आज फार महत्त्व आले असते. मी सध्याच्या काळात जन्माला आलो याची मला खूप रुखरुख आहे आणि त्यामुळे माझ्या विचारांना कोणीच सध्या महत्त्वाचे मानत नाही याची खंतही आहे. तर ते असो. अशाच एका जुन्या माणसाने म्हणून ठेवले आहे की, प्रत्येकाला त्याच्या लायकीप्रमाणे सरकार मिळते. हे मांडणारा माणूस जुना असला तरी मी त्याच्या मताशी सहमत नाही. माझ्या मते, आपल्या देशाच्या बाबतीत हे विधान अगदीच खोटे आहे. आपल्या देशातील जनतेला नेहमीच तिच्या लायकीपेक्षा जास्त चांगले सरकार मिळत आलेले आहे. आपले नागरिक जितके बोगस आहेत, तितके जर आपले लोकप्रतिनिधीही बोगस असते तर काय झाले असते, याची नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. मी असे वाचले आहे की, कोणत्यातरी देशाचा राष्ट्रप्रमुख हा जेवणात तोच तोपणा यायला लागला की मधून मधून मेजवानी म्हणून माणूस

सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र -स्वप्न आणि वास्तव - डॉ. नरेंद्र जाधव

Image
कृषिक्षेत्राचा घटलेला विकास दर, खालावलेली  उत्पादकता, अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती आणि कमी झालेली दरडोई उपलब्धता, शहरी आणि ग्रामीण जनतेमध्ये रुंदावत चाललेली दरी आणि त्यातून देशाच्या अनेक भागात मोठ्या संख्येने झालेल्या आत्महत्या या सर्वांमधून दुसरी हरीत क्रांती म्हणता येईल इतक्या मोठ्या प्रमाणावर कृषिक्षेत्राला चालना देण्याची आणि कृषकांना संजीवनी देण्याची नितांत आवश्यकता आहे. देशाच्या पातळीवर मोठा विकास, आणि कृषक मात्र भकास हे दारुण वास्तव निग्रहपूर्वक बदलण्याची वेळ आली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला  (१ मे २०१०) ५० वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागात सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे. देशाच्या राजधानी दिल्लीतही तो साजरा होत आहे ही बाब सर्व मराठी भाषिकांना अभिमान वाटावी अशीच  आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी लढलेल्या लढयात आपली जीवनाहूती देणार्‍या १०५ हुतात्म्यांना आणि लढयाला दिशा देणार्‍या दिवंगत नेत्यांनाही ह्या निमित्ताने श्रद्धांजली. महाराष्ट्राच्या गेल्या ५० वर्षाच्या वाटचालीकडे मागे वळून पाहतांना महाराष्ट्राने     सामाजिक, सांस्क

मराठी माणूस व पाणी- प्रदीप पुरंदरे

संयुक्त महाराष्ट्र आता तसा एकसंध व एकजीव राहिलेला नाही. पाण्यासाठीची स्पर्धा व संघर्ष हे एक महत्त्वाचे कारण त्यामागे आहे. महाराष्ट्राच्या जलक्षेत्रात (वॉटर सेक्टर) सध्या सामाजिक -राजकीय वादळे घोंघावता आहेत. आर्थिक भोवरे निर्माण झाले आहेत. पाणी गढूळ झाले आहे. पाणी-प्रश्नाचा तळ काही लागत नाहीये. अनागोंदी, अनास्था, पराकोटीचा भ्रष्टाचार, क्षुद्र राजकारण आणि बुद्धिभेद ही महाराष्ट्रातील जलविकास व व्यवस्थापनाची व्यवच्छेदक लक्षणे बनली आहेत. मराठी माणूस विविध प्रदेशात (मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र), नदीखोर्‍यांत (गोदावरी, कृष्णा, तापी, वगैरे), जिल्हयात,तालुक्यात व गावागावात शतखंड विभागला गेला आहे. पुढार्‍यांनी खतपाणी घातलेल्या अस्मितेच्या राजकारणात त्याची फरफट होती आहे. पाण्यावरून होऊ घातलेल्या ‘तिसर्‍या महायुद्धात’ जलवंचितांचा प्यादी म्हणून वापर होऊ लागला आहे. या खेदजनक परिस्थितीचा एक लेखाजोखा या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील भौगोलिक विविधता आणि पाण्याची नदीखोरेनिहाय विषम उपलब्धता हे नैसर्गिक ‘नेपथ्य’ या लेखात प्रथम मांडण्यात आले आहे. दुसर्‍या टप्प्यात निवड