Posts

Showing posts from March, 2015

अवकाळी गारपिटीचे चक्रव्यूह भेदताना...

हल्ली ऋतुचक्र पार आकलनापलीकडे गेलेय अगदी व्हाट्स-अपवर अलीकडेच फिरत असलेल्या एका विनोदाप्रमाणे  पावसाळा  हिवाळा आणि    उन्हाळा, या तीन मुख्य ऋतूंपेक्षा आता  हिवसाळा, पावन्हाळा आणि ऊन्हसाळा हेच मुख्य ऋतू म्हणावे असेच काहीसे झाले की काय याची भीतीदायक शंका वाटत राहावी अशी परिस्थिती झालीय. मागच्या काही वर्षात येत असलेल्या अवकाळी पाऊस,गारपीट या नैसर्गिक आपत्ती जणू काही आता नियमितपणे किंवा कायम स्वरूपी येत आहेत की  काय ? हा एक मोठा प्रश्न आज भारत खंडच नाही तर समस्त जगासमोर उभा ठाकला आहे. आत्ता जो प्रश्नच नीट कळला नाही त्याचे उत्तर तरी काय आणि कसे देणार ??  साधारणत: एक वर्षापूर्वी "साप्ताहिक सकाळ" मध्ये  किरणकुमार जोहरे यांचा   " अवकाळी गारपिटीचे चक्रव्यूह भेदताना..." शीर्षकाचा एक लेख प्रकाशित झाला होता (तो खालीलप्रमाणे) जो आजही अगदी तंतोतंत लागू पडावा हा दुर्दैवी योगायोग आणि आपण आणि आपले सरकार निगरगट्टपणे अगदी काही झालेच नाही या अविर्भावात; वर्तमानपत्राच्या मागच्या पानावरून पुढे जावे इतक्या सहजतेने मागच्या वर्षातून या वर्षात अगदी तसेच पुढे जात आहोत ही (निष्क्रिय) खंत! __

वाक्युद्ध जिंकण्याच्या लोकप्रिय पद्धती-सलील अनप्लग्ड

'हो, मला तुझं म्हणणं पटलं..' हे वाक्य ऐकणं म्हणजे 'तू महान आहेस,' 'माझे तुझ्यावर प्रेम आहे', 'तू सर्वोत्तम आहेस' या सगळ्यापेक्षा 'मोठी' वाटणारी मिळकत!! मेंदूमध्ये विविध प्रकारची जुळवाजुळव करून दुसऱ्याला आपलं 'म्हणणं' पटवून देणं, यात मनुष्यप्राणी सगळ्यात जास्त रमतो. सर्वाधिक मानसिक  शक्तीचा खर्च होणारी जागा.. 'दुसऱ्याला समजावून सांगणं'! सतत दुसऱ्याला समजून घेणं आणि आपलं म्हणणं दुसऱ्याच्या मनी आणि गळी उतरवणं यामध्ये नव्वद टक्के लोकांची शंभर टक्के शक्ती संपून जाते. मग कुठून येणार सर्जनशीलता..? वगैरे! या शब्दांच्या चढाओढीत अनेक खेळी खेळल्या जातात. प्रत्येकजण आपापली उपलब्ध शस्त्रसामग्री घेऊन या वाक्युद्धात उतरतो ते विजय मिळवण्यासाठीच!  बावीस वर्षांच्या एका मुलीने स्वत: लग्नाचा घेतलेला निर्णय अमान्य असणाऱ्या वडिलांचे मुलीशी वाक् युद्ध.. आणि सर्वमान्य लोकप्रिय पद्धती : १) शक्तिमार्ग- 'सांगा तिला- म्हणावं, असलं चालणार नाही.. आमची पत आहे म्हणावं.' माननीय श्री. दादा, भाऊ, अण्णा हे मुलीशी थेट बोलतसुद्धा नाहीत. असल्या महत्त्वाच्या वे