Posts

Showing posts from May, 2015

प्रवास छत्रीचा ! - प्रा. शैलजा सांगळे

Image
पावसाळा तसा यंदा वर्षभरच होता ; नाही म्हणायला इतर ऋतू ही होते अधून-मधून आलटून पालटून. पण आता खराखुरा म्हणजे भरतखंडामधील मान्सून रुपी अधिकृत पावसाळा  आता अगदी तोंडावर येउन ठेपलाय. पावसाळा आला की आठवते छत्री. कारण छत्रीच आपले पावसापासून रक्षण करते. दर वर्षी येणाऱ्या वळवाच्या पावसाने किंवा मॉन्सूनच्या पहिल्या वर्षावाने चाकरमान्यांची कशी त्रेधातिरपीट उडते, ते आपण बघतोच. हवामान खात्याने पावसाच्या आगमनाची सूचना दिली की आपण गेल्या वर्षी कपाटात ठेवलेली छत्री शोधतो. कारण तिच्याशिवाय आपले घराबाहेर पडणे अवघड असते. थोडक्‍यात काय, तर छत्री व पावसाळा यांचा घनिष्ठ संबंध आहे. पावसाळा आला की दुकानाबाहेर लटकवलेल्या रंगीबेरंगी छत्र्या आपले लक्ष वेधून घेतात. पण प्राचीन काळी मात्र छत्रीचा वापर पावसापेक्षा उन्हापासून संरक्षण करण्यासाठी होई. अतिप्राचीन काळी तर मानसन्मान, सामर्थ्य, प्रतिष्ठा यांचे प्रतीक म्हणून छत्रीचा वापर होई.  भारतीय पुराणात छत्रीबाबत एक दंतकथा आहे. जमदग्नी हा बाण मारण्यात तरबेज होता. दिवसभर नेमबाजी करणे हा त्याचा सततचा उद्योग. त्यात त्याला त्याची पत्नी रेणुका हिची मोलाची साथ मिळे. प्रत्

शेतीचा उद्योग-दीपक घैसास *

आज ८० टक्के शेती हा व्यवसाय आतबट्टय़ाचा ठरत असेल तर  बळीराजाचे राज्य आले पाहिजे वगैरे वाक्ये फेकणे आपण बंद केले पाहिजे. अशा वेळी या आतबट्टय़ातील छोटय़ा शेतजमिनी विकून निदान त्यांना दुसरा वैकल्पिक व्यवसाय करण्यास किंवा त्या जमिनींवर उभ्या राहणाऱ्या इतर उद्योगांत भागीदार होण्यास आपण मदत करणे गरजेचे आहे.. भूसंपादन कायद्याविषयी सध्या सर्वत्र वाद सुरू आहे. या देशात जणू शेती किंवा उद्योग यापैकी एकच टिकू शकेल की काय अशा आविर्भावात चित्रवाहिन्यांपासून वर्तमानपत्रांपर्यंत सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहेत. भारतच नव्हे तर जगातील सर्वच देश हे मुळात शेतीप्रधान देश होते. परंतु गेल्या हजारो वर्षांच्या शेतीच्या उद्योगानंतर माणसाच्या गरजा जशा वाढत गेल्या किंवा त्याने स्वत:ने जशा वाढवून घेतल्या तसा शेतीचा व्यवसाय अपुरा पडू लागला आणि शतकभरापूर्वी औद्योगिक क्रांतीचे वारे वाहू लागले. प्रामुख्याने पाश्चात्त्य देशांत, वैज्ञानिक शोधांच्या मदतीने विजेपासून सिमेंटपर्यंत, रेल्वेपासून मोटारींपर्यंत आणि तलवारीपासून तोफा व अग्निबाणांपर्यंत गोष्टींच्या उत्पादनाचे उद्योग सुरू झाले. या उद्योगांमुळे जशा माणसाच्या गरजा व