Posts

Showing posts from October, 2014

महाराष्ट्र २०१९-सदानंद मोरे

समूहाची ऐतिहासिकता आणि भविष्यदृष्टी यांचा त्याच्या वर्तमान कृतीवर प्रभाव पडत असतो. काही कृती करण्याऐवजी समूह स्मरणरंजनात व स्वप्नरंजनात दंगून जाण्याचा धोकाही संभवतो. असा समाज निष्क्रिय बनतो किंवा चुकीच्या कृती करतो. आपली अवनती होण्यामागची खरी कारणे शोधण्यासाठी आत्मपरीक्षण करण्याऐवजी तो त्याचे खापर इतरांच्या डोक्यावर फोडण्यातच समाधान मानतो. इ. स. २०२० पर्यंत भारताने महासत्ता होण्याचे स्वप्न काही धुरीणांनी पाहिले व दाखवलेदेखील आहे; पण तूर्त आपली चर्चा महाराष्ट्रापुरती मर्यादित असल्याने त्याचा विचार नको. असेच स्वप्न चीनसारखे इतर राष्ट्रसमाजही पाहात आहेत. याचा उल्लेख केला म्हणजे पुरे. या अनुरोधाने महाराष्ट्राची म्हणजे मराठी समाजाची चर्चा करायला हरकत नसावी. मराठय़ांची म्हणजेच मराठी समाजाची प्रकृती काय आहे याची सर्वात चांगली चिकित्सा राजारामशास्त्री भागवत यांनी केली. दुर्दैवाने महाराष्ट्र राजारामशास्त्रींना पूर्णपणे विसरला. राजारामशास्त्री लिहीत होते तो काळ ब्रिटिश पारतंत्र्याचा होता. म्हणजे तेव्हा संपूर्ण भारत देशच गुलामगिरीत खितपत पडला होता. अशा वेळी भागवतांनी मराठी आयडेंटिटीचा विचार केल

रुजुवात : चवीने खाणार त्याला..मुकुंद संगोराम

लहानपणी जेवताना घास घशाखाली उतरेनासा झाला की आई म्हणायची, ‘ताट स्वच्छ करायचं, नाही तर डोक्याला बांधीन’. त्या भीतीनं ताट कसंबसं स्वच्छ व्हायचं, पण डोक्यात विचारचक्र सुरू व्हायचं, की ताटातलं उरलेलं अन्न आई डोक्याला कसं काय बांधणार? तेव्हापासून आत्तापर्यंत त्या भीतीनं ताट संपवण्याचं नैतिक बंधन आपोआप पाळलं गेलं. पण आता असं आठवतं, की ते अन्न खूपच चविष्ट असे. त्यात शेपूची भाजी कधी तरी असायचीच. शेपूची चव आवडेनाशी असली, तरी ती भाजी खाणं भाग असे. नंतर ती चव आवडायला लागली. तव्यावरची गरम पोळी मिळण्याचे दिवस संपले तरी ती चव मात्र अजूनही रेंगाळणारी ठरली. पिठलं भाकरी हे अगदी पंधरा-वीस वर्षांपूर्वीपर्यंत पक्वान्न म्हणून ओळखलं जात नव्हतं. दिवाळीचा फराळ दिवाळीतच तयार व्हायचा आणि श्रीखंड, बासुंदी ही पक्वान्नं फार क्वचित जिभेवर यायची. आता शेव चिवडा हे दैनंदिन खाद्य झालं आहे आणि जिलबी, आम्रखंड हे कधीही, केव्हाही सहज उपलब्ध असतं. भात, भाजी, पोळी किंवा भाकरी, चटणी, कोशिंबीर, लोणचं, ताक किंवा दही असा साधारण रोजचा स्वयंपाक असलेल्या घरात आता जेवणातच रेडिमेड अन्न समाविष्ट झालं आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षांत आपल

निळासावळा नाद | पांडुरंग कांती:विवेक दिगंबर वैद्य

Image
भागवत धर्म-वारकरी  म्हणजे नेमके काय -पंढरपुरात नेमके असे काय आहे की जिथे लाखो भक्त अतीव श्रद्धेने आषाढी/कार्तिकी सोबतच आपल्या आयुष्यात वेळ मिळेल तेव्हा जात असतात असे अनेक प्रश्न मला पडत होते त्यांचे उत्तर अजूनहि शोधतो आहेच पण त्यांचे उत्तर बहुधा मिळू शकेल असे हा निळासावळा नाद पांडुरंग कांती(लेखक विवेक दिगंबर वैद्य )वाचण्याचा योग आला.  काय अलौकिक लेख आहे हो हाअगदी शब्दातीतच!प्रत्यक्ष ही अलौकिक वाचनानुभूती घ्या एकदा. बहुतेक त्या पांडुरंगाचा वरदहस्त असावा विवेक वैद्य साहेबांना असो!  ____________________________________________________________________________________________________ आषाढ शुक्ल दशमी दूरवर कसलेसे टोले पडले आणि राऊळाची कवाडं धाडदिशी बंद झाली. बाहेर अव्याहतपणे सुरू असलेला गलका एकाएकी सुन्न करणाऱ्या शांततेत जसा मिसळून गेला तसा तो भानावर आला. एव्हाना िदडीदरवाजाही बंद झाला होता. एकाएकी आलेल्या त्या नीरव शांततेमुळे तो क्षणभर सैलावला. दिवसभर त्याला ना विश्रांती मिळाली होती ना फुरसत. उभं राहून राहून त्याचे पाय जडावले होते. अर्थात, हे त्याच्यासाठी तसं नेहमीचंच होतं. आपल्याती

कथा एका शहराच्या यशस्वी पुनर्निर्माणाची- अनिरुद्ध पावसकर

ज गामधील सुनियोजित शहरांचा विचार केला तर असे लक्षात येते, की या सर्व शहरांमधील उत्कृष्ट नियोजन हे भागीदारीमुळे शक्‍य झालेले आहे. भागीदारी ही राज्यकर्त्यांची व नगर नियोजनामधील तज्ज्ञ व्यक्तींची. त्यासाठी दोघांनाही एकाच ध्येयाने झपाटलेले असणे अत्यावश्‍यक आहे. एक- उत्कृष्ट शहराची निर्मिती करणे, अशा कितीतरी भागीदाऱ्या सांगता येतील. ग्रेटर लंडनसाठी चर्चिल आणि पॅट्रिक ऍबरक्रॉम्बी, इस्लामाबादसाठी जनरल आयुब खान आणि डॉक्‍सियिडिस, नवी दिल्लीसाठी पंडित नेहरू आणि ल्युबरक्रॉम्बी, चंडीगडसाठी पंडित नेहरू व ली कारबुझियर या सर्व नगरनियोजनकारांची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती, इ. चे कौतुक करावे तितके थोडे. परंतु या राज्यकर्त्यांना तर सलामच केला पाहिजे. त्यांची दृष्टी, त्यांचे नेतृत्व व मुख्य म्हणजे नियोजनकारांना त्यांनी नियोजन करण्यासाठी दिलेले संपूर्ण स्वातंत्र्य. अशीच एक अत्यंत यशस्वी आणि हेवा वाटावा अशी भागीदारी साऱ्या जगाने एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला बघितली. पॅरिस शहराची पुनर्निर्मिती करताना लुईस नेपोलियन बोनापार्ट व जॉर्ज हाऊसमन यांच्या भागीदारीने साध्य केलेल्या जादूने संपूर्ण जगाला भ