Posts

Showing posts from October, 2012

व्यावसायिक शिक्षण : खरोखरच किती व्यावसायिक?- मनोज अणावकर

अभ्यासक्रम आणि त्याचे प्रत्यक्ष उपयोजन करताना त्या क्षेत्रात आवश्यक ठरणारे ज्ञान यात फार मोठी तफावत दिसून येते. आणि मग यातूनच घडतात कमी ताकदीचे व्यावसायिक. शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांची अनास्था याची कारणमीमांसा आणि त्यावरील उपाययोजनांवर एक दृष्टिक्षेप- आज पुन्हा एकदा नोकरीसाठी मुलाखत देऊन आलेल्या शिरीषचा पडलेला चेहरा खरं तर मुलाखतीचा निकाल स्पष्टपणे सांगून जात होता. पण तरीही न राहवून त्याच्या वडिलांनी विचारलंच, ‘‘का रे, आज काय कारण झालं?’’ त्यावर शिरीषने चिडून सांगितलं, ‘‘काही नाही, तीच ती कारणं. कोणाला जास्त टक्केवारी पाहिजे, तर कोणाला जास्त अनुभव पाहिजे. कोणाला मी त्यांच्या जॉबसाठी योग्य वाटत नाही, तर कोणी म्हणतो नोकरी देतो, पण स्टेटस्चं काम देत नाही आणि पगारही १०-१२ हजार रुपये सांगतात. बारावीपासून क्लास, कॉलेज शिक्षणासाठीचे इतर खर्च यावर लाखो रुपये खर्च करून दिवस-रात्र शिक्षणासाठी एवढी मेहनत घेतली. पण वेळ, मेहनत आणि पसा सगळं वाया गेलं.’’ हे अशा प्रकारचे संवाद अनेक घरांमधून आज ऐकायला मिळतात. व्यावसायिक अभ्यासक्रम, मग तो कोणताही असो, अभियांत्रिकीचा, व

ढगांना..

मित्रानो हा पावसाळा आला कधी आणि संपला कधी हेच काही कळले नाही. हवामान खात्याच्या माहितीनुसार (?) आता मान्सून राजा परतीच्या मार्गावर आहे आणि १ आठवड्याच्या आत तो उत्तरेकडून खाली दक्षिण भारतातून परत जाईल  असे कळते.पण काही मोजके गाव/तालुके/जिल्हे सोडले तर  बाकी इतर सर्व ठिकाणी अवस्था फार फार बिकट आहे.पाऊस  सुरु असून ही  काही ठिकाणी पानी आणि चाराच्यी स्थिती  आत्ताच गंभीर आहे. नोकरी धंदा  करणारया व्यक्ती / कुटुंबांना  याची झळ कितपत जाणवेल याची शंका आहे पण शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असलेले इतर घटक यांच्या पोटात आत्ताच गोळा आला आहे हे निश्चित .सण वार अजून नुकेतच सुरू झालेले आहेत पण जर तुम्ही जरा शहराच्या बाहेर जाऊन बघितले तर खरी अवस्था काय आहे  हे ध्यानात यायला फार वेळ लागणार नाही हे नक्की(अर्थात जे ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यांना फार काही सांगण्याची गरज नाही) बघूया काय होणार आहे ते नजीकच्या भविष्य काळात. पण या क्षणाला मला कवी सौमित्र यांनी लिहलेली अत्यंत  हृदयस्पर्शी कविता आठवते आहे. "नांगरून ठेवल्या शेतांवरती येण्याआधी दाटून कोरडय़ाठण्ण पडल्या सगळ्या विहिरी घ्या वाटून पिवळ्याजर्द म

कर्ते आणि नुसतेच करविते- गिरीश कुबेर

उत्पादन करणं, वस्तू निर्माण होणं, याला असलेलं महत्त्व कमी होणार नाही. गेल्या काही वर्षांत मात्र, या ‘वेल्थ क्रिएशन’पेक्षा , संपत्तीच्या प्रत्यक्ष निर्मितीपेक्षा ती वाढलेली असल्याचे देखावे निर्माण करणाऱ्यांनाही महत्त्व आलं. व्यवहार वाढणारच, पण ते फुगवले गेले की फुगा फुटतो. तसा तो फुटलाही. या फुटलेल्या फुग्याची हवा आत्ता आपल्या अवतीभोवती असताना, कर्ते आणि करविते यांमधला फरकही सहज दिसतो आहे.. परवा एका बडय़ा बहुराष्ट्रीय बँकेत काम करणारा मित्र भेटला. सगळय़ा रडगप्पाच सांगत होता. आर्थिक स्थिती किती वाईट आहे..धंदाच नाही.. अर्थव्यवस्था एकदम संकटात आहे.. बँकेतून अडीचशे जणांना काढतायत, वगैरे. शेवट या मुद्दय़ावर.. आमचा क्रमांक कधी येतोय, माहीत नाही. दचकायलाच झालं एकदम. मित्र उत्तम शिकलेला. आई-वडिलांनी अगदी कर्ज वगैरे काढून त्याला चांगल्या नावाजलेल्या कॉलेजातून व्यवस्थापन शिक्षण दिलं. तिथनं हा बाहेर आला तोच टाय घालून. मग सगळं त्याचं ठरल्यासारखं. आधी यूटीआय, आयसीआयसीआय.. मग रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड.. एचएसबीसी.. गोल्डमन सॅक असं काय काय. एका वर्षांत तीन बेडरूम फ्लॅट. पार्किंगसकट. सोसायटीत जॉगिंग पार्क, क्