Posts

Showing posts from June, 2016

कुणी पाणी देता का पाणी? (निखिल रत्नपारखी)

‘ पुढचे दोन दिवस पाणी येणार नाही! ’ कायऽऽ!!! ‘ कुठेतरी बॉम्बस्फोट झाला ’ या बातमीने माझ्यावर जेवढा परिणाम झाला असता त्यापेक्षा जास्त गंभीर परिणाम माझ्या मनावर झाला. ‘ झाडे जगवा , पाणी वाचवा ’, ‘ पाणी हे जीवन आहे ’, ‘ थेंबे थेंबे तळे साठे ’, ‘ ओढवेल मोठा अनर्थ , पाणी नसेल तर जगणं आहे व्यर्थ ’ अशा प्रकारच्या चार-पाच म्हणी आणि सुविचार लिहिलेल्या भिंतींसकट पटापट मनात येऊन गेले.  एक दिवस कसाबसा आपण काढू , पण दुसऱ्या दिवशीचं काय ? या धक्क्याची तीव्रता बऱ्यापैकी ओसरल्यावर उपाययोजनांना सुरुवात झाली. घरातल्या वाटय़ांपासून ज्या ज्या भांडय़ांत पाणी भरून ठेवता येणं शक्य आहे त्यात पाणी भरून ठेवायचं ठरलं. अगदी वॉशिंग मशिनचीही यातून सुटका झाली नाही. एक वेळ प्यायचं पाणी विकत आणता येईल , आणि एवढी सगळी भांडी भरली तर वापरायचं पाणी पुरेल , असा प्राथमिक अंदाज सर्वानुमते वर्तवला गेला. चला तर मग आता एक क्षणही वाया न घालवता पाणी भरायच्या कामाला लागा. आणि बायकोने अनपेक्षितपणे दुसरा बॉम्ब टाकला- ‘ कुठून आणि कसं भरायचं पाणी ? आज पहाटेच पाणी गेलंय. ’ कळवण्यास अत्यंत दु:ख होतंय की , आज पहाटेच आमचे घरातील सर्वाचे अ

जांब आणि मुंग्या..(रुपाली पारखे देशिंगकर)

Image
आठवडी बाजारात चक्कर मारली तर ऐन भरात आलेला उन्हाळा सहज जाणवतो. एकीकडे भाज्यांच्या गगनाला भिडलेल्या किमती डोळे दिपवत असतानाच , गगनावरी उंच झाडांवरून थेट बाजारात आलेला रानमेवा नजर खेचून घेत असतो. वर्षभर वाट पाहायला लावून भेटीला येणारा आंबा आता खिशाच्या आवाक्यात आला असतानाच , करवंदाच्या जोडीला जागोजागी जांभळांचे वाटे विकायला आलेले दिसतात. शंभर टक्के भारतीय असलेलं हे फळ खातखात मागच्या अनेक पिढय़ा मोठय़ा झाल्या आहेत. जांभळाचं नुसतं नाव जरी उच्चारलं की त्याचा रंग , ते खाऊन रंगलेली जीभ , दात लगेच आठवतात. इंग्रजीत ‘ जावा प्लम ’, डॅमसन प्लम , पोर्तुगीज प्लम , ब्लॅक प्लमसारख्या नावाने भेटायला येणाऱ्या या जांभळाचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे ‘ सायझिगिमि कुमिनी ’. साधारण तीस मीटरची उंची गाठणारं हे झाड सदाहरित गटात मोडतं. याची हिरवीगार पानं वर्षभर डोळ्याला सुखावतात.  मला आठवतंय , माझ्या आत्याकडे गावाबाहेर जांभळाची मोठीमोठी झाडं होती नि त्यांच्या सावलीत आम्ही खेळायचो. माझ्या बालपणातली अनेक झाडं आजही हिरवीगार आहेत. याचं कारण म्हणजे जांभळाच्या झाडाला मिळालेलं दीर्घायुष्य! कोणतीही हानी झाली नाही तर ही