Posts

Showing posts from September, 2013

ग्रंथविश्व : ‘दुर्मिळ म्हणींचा अनमोल खजिना’

‘अंगापेक्षा बोंगा मोठा’ ही म्हण ‘शेती’विषयक विभागात वर्गवारी करून नोंदलेली वाचून अडखळलो. ‘बोंगा’ म्हणजे मक्याच्या दाण्यांनी टच्च भरलेलं कणीस व ‘अंगा’ म्हणजे कणीस; ज्याला फाडून बाहेरही आलेलं दिसतं ते त्याचं बाहेरचं पातळ आवरण. ही अनोखी माहिती आढळली ती ‘मराठी प्रोव्हर्बस’ या १८९९ साली ऑक्सफर्ड प्रेसनं प्रकाशित केलेल्या तीनेकशे पानी पुस्तकात. संग्राहक व रूपांतरकार आहेत रेव्हरंड आल्फेड मॅनरिंग (मिशनरी ऑफ दि चर्च मिशनरी सोसायटी). सुमारे दोन हजार म्हणींचा हा संग्रह ‘बुक्स.गुगल.कॉम’वरती अलीकडेच अगदी फुकट वाचावयास मिळाला. त्यात अगदी नमनालाच ही म्हण छापलेली आहे. पुढचीच म्हण ‘आवळा देऊन कोहळा काढणार’ ही मात्र या विभागात चपखल बसणारी आहे. मिशनरी मंडळी म्हणजे केवळ धर्मातरं करायला आलेली जमात या समजुतीला छेद देणारी जी अनेक कामं आहेत, त्यात ग्रंथलेखनाचं व त्यासाठी घेतलेल्या अफाट मेहनतीचं स्थान फार वरचं आहे. हे साहेब महाराष्ट्राच्या कुठच्या भागात होते, किती काळ होते वगैरे काहीच माहिती  सुरुवातीच्या तीनपानी प्रस्तावनेत आढळत नाही. सरळ विषयालाच हात घालून ते लिहितात, ‘मराठी म्हणींचं इंग्रजी भाषांतर बहुधा प