Posts

Showing posts from February, 2010

मीठी मीठी बातें...

सध्या साखरेचे नाव जरी तोंडावर आले तरी ती कडू लागते. याचे कारण साखर एवढी महाग झाली आहे की, ती कडूच लागावी. मात्र साखर उद्योगात एक गोड बातमी आली आहे आणि ती मराठी माणसाशी निगडित आहे. बेळगावच्या श्री रेणुका शुगर्स लि. या तरुण उद्योजक नरेंद्र मुरकुम्बी यांच्या कंपनीने ब्राझीलमधील इक्वीपॉव ही कंपनी तब्बल १५३० कोटी रुपयांना विकत घेतली आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांनी ब्राझीलची अशीच एक कंपनी विकत घेतली होती. आत्ताच्या या टेकओव्हरमुळे श्री रेणुका शुगर्स ही जगातली तिसरी आघाडीची साखर उत्पादक कंपनी ठरली आहे. ब्राझीलच्या दोन कंपन्या ताब्यात आल्यावर नरेंद्र मुरकुम्बी व त्यांच्या मातोश्री विद्या यांनी खऱ्या अर्थाने ‘साखर सम्राट’ होण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांनी घेतलेल्या कंपनीमुळे रेणुकाचा समावेश जगातल्या पहिल्या दहा साखर उत्पादक कंपन्यांत झाला होता. सध्याच्या या घडामोडींमुळे देशातीलच नव्हे तर जगातील साखर उद्योगाच्या अग्रभागी आलेली ही मायलेकाची जोडी दहा वर्षांपूर्वी कुणाला विशेष माहीतही नव्हती. मुरकुम्बी कुटुंबीय हे काही साखरेच्या पिढीजात उद्योगात नाहीत. या उद्योगात त्यांची

माय नेम इज फॅन

विशाल विराट अशा त्या हरभरावृक्षाच्या अंतिम याने की टोकाच्या फांदीवर टहलत, चण्याचे घोस मोठय़ा दिलखुशीने ओरबाडत, असताना आम्हाला शाहरुख खानाने वरील विनंती केली. बेटा शाहरूख आमचा फार म्हंजे फार मोठा फॅन आहे. अर्थात, असे आमचे अनेक फॅन आहेत. साक्षात अमिताभ बच्चनदेखील त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्याच्या काळात आमचे श्रेष्ठत्व मान्य करीत असतो. नवल नाही, हे आमचे प्रारब्ध आहे. लोकप्रियतेला काही इलाज नसतो. खरे सांगायचे, तर या फॅनलोकांचा भलताच त्रास आम्हाला होत असतो. पण आम्ही तसे उद्धटपणाने बोलू शकत नाही. उदाहरणार्थ, अकरा नंबर चाळ, तिसरा मजला, संडासाजवळची खोली हा आमचा पत्ता कोणाला माहीत नाही? कधी कधी आमच्या चाळीतील फॅन खिडकीतून आमच्या खाजगी आयुष्यात डोकावत असतात. गेल्या सप्ताहात आंघोळीहून परत खोलीत येऊन आम्ही अंतर्वस्त्रे पेहनत असताना ही फॅनमंडळी पापाराझ्झीसारखी खिडकीला नाक लावून फिदफिदत होती. विजारीच्या येक्या नळकांडय़ात पाय घालून आम्ही खोलीभर लंगडी घालत असतावेळी त्यांच्या फिदफिदण्याचे जहरी आवाज आमच्या कानावर येत होते. अशा वेळी प्राय: आम्ही दुर्लक्ष करतो. परंतु दरवेळी तसे करता येतेच असे नाह

मोशे दायान

देशोदेशींच्या राजकीय, सामाजिक लढय़ांचे अग्रणी आणि त्यांचे आयुष्य! विसाव्या शतकानं अनुभवलेला विलक्षण विद्युतवेगी रणसंग्राम म्हणजे अरब-इस्रायल यांच्यात झालेले १९६७ सालचे दीडशे तासांचे युद्ध. या युद्धाला कारणीभूत झाली होती ती अरबांची मुजोर वृत्ती, इस्रायलसारखा टीचभर देश अस्तित्वात येताच पेटलेल्या सूडाच्या ज्वाळा आणि त्या इस्रायलला समुद्रात बुडवून टाकल्याशिवाय क्षणभरही स्वस्थ बसायचे नाही, ही त्या पाठोपाठ उच्चारली गेलेली अरेरावीची भाषा. पण त्या आवेशाला सामोरे जाण्याचे मानसिक धैर्य असलेला नेता त्या क्षणी त्या टीचभर देशाकडे नव्हता. एश्कोल आणि एबान हेच होते इस्रायलचे त्या काळचे नेते. एश्कोल काही साधेसुधे राजकारणी नव्हते. तब्बल ११ र्वष इस्रायलचे अर्थमंत्रीपद भूषवलेले आणि इस्रायलच्या आर्थिक प्रगतीचे शिल्पकार मानले जाणारे एश्कोल हे बेन गुरियन नंतर इस्रायलचे पंतप्रधान बनले. एबानचा अरब-ज्यू प्रश्नाचा अभ्यास दांडगा होता. ज्यू राष्ट्राची मागणी किती न्याय्य आहे, हे त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासमितीपुढे प्रभावीपणे मांडले होते, पण एश्कोल काय किंवा एबान काय, दोघेही जागतिक राजकारणात ओळखले जात ते तडज

दर पार्टीच्या शेवटी ऐक क्वार्टर कमी पडते

दारु काय गोष्ट आहे मला अजुन कळली नाही कारण प्रत्येक पीणारा म्हणतो मला काहीच चढली नाही सर्व सुरळीत सुरु असताना लास्ट पॅकपाशी गाडी अडते दर पार्टीच्या शेवटी ऐक क्वार्टर कमी पडते पीण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु वीचारवंतची गोलमेज परीषदच भरते रात्री दीलेला शब्द प्रत्येकजण सकाळच्या आत विसरते मी इतकीच घेणार असा प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो पॅक बनवनारा त्यदिवशी जग बनवनार्यापेक्षा मोठा असतो स्वताच्या स्वार्थासाठी प्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडते दर पार्टीच्या शेवटी ऐक क्वार्टर कमी पडते पीण्याचा कार्यक्रम पीणार्याला दरवेळेस नवीन पर्व असते लोकांना अकँडेमीक्सपेक्षा पीण्याचा क्षमतेवर गर्व असते आपण हीच घेतो म्हणत ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात वेळ आली आणि पैसा नसला की देशीवरही तहान् भागवतात शेवटी काय दारु दारु असते कोणतीही चढते दर पार्टीच्या शेवटी ऐक क्वार्टर कमी पडते पीणार्यामध्ये प्रेम हा चर्चेचा पहीला वीषय आहे देवदासचे खरे प्रेम पारो की दारु मला अजुन संशय आहे प्रत्येक पॅकमागे तीची आठवण दडली असते हा बाटलीत बुडला असतो ती चांगल्या घरी पडली असते त

लांडगा आला रे आला

आपल्या आर्थिक आणि राजकीय पाठबळाच्या जोरावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनेक समित्यांवर आपल्याला अनुकूल असणाऱ्या आणि सहजगत्या विकल्या जाऊ शकणाऱ्या तथाकथित विद्वानांची वर्णी लावण्याची खेळी अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रे नेहमीच खेळत आली आहेत. या समित्यांद्वारे विकसनशील देशांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न अमेरिका आजवर करीत आली आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो, अशीच ही परिस्थिती आहे. लांडगा आला रे आला, अशी आरोळी ठोकत आपल्याला भिवविण्याचे प्रयत्न होत आहेत, पण त्यातील गफलती आणि आपमतलबी ओरड ध्यानात आल्यामुळे आपण बेसावध राहण्याची चूक करून बसू आणि खरोखरीच लांडगा येईल तेव्हा त्याचा मुकाबला करणेच आपल्याला गाफीलपणामुळे अशक्य होऊन बसेल. हा खरा धोका आहे; पण लक्षात कोण घेतो! आपल्या समाजाची मानसिकता कडकलक्ष्मीची आहे. आपल्याच अंगावर आसूड ओढून घेत आत्मपीडनात आनंद शोधण्याची धारणा आपल्या खोल मनात दडून बसलेली आहे. त्याचीच परिणती आत्मविश्वासाच्या अभावात होत जाते. आपल्या देशातील परिस्थितीविषयी आपल्याच देशबांधवांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याऐवजी आपण परदेशी तज्ज्ञांवर किंवा आंतरराष्ट्री

अनसंग

टेलिफोनचा शोध ग्रॅहॅम बेल यांनी लावला हे आपण विज्ञानाच्या पुस्तकात शिकलो आहोत. पण मोबाइलचा शोध कोणी लावला असं तुम्हाला विचारलं तर... तर काय तुम्ही डोकं खाजवत बसाल! प्रश्नाची यादी पुढे खेचली तर तुम्हाला ब्लॅकबेरीची निमिर्ती कोणी केली... आयपॉड सर्वप्रथम कोणी बाजारात आणला... 'वर्क अॅट होम' ही संकल्पना पहिल्यांदा कोणाच्या डोक्यात आली अशा प्रश्नांची उत्तरे देता येतील? बरं या सर्व गोष्टींचा वापर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अगदी सहजरित्या करत असतोच ना. चला तर मग जाणून घेऊ या प्रश्नांची उत्तरं. 'अनसंग टेक्नोक्रॅट्स'विषयी. माटीर् कूपर आज तुम्ही-आम्ही मोबाइलची विविध हँडसेट्स हातात मिरवत फिरतो त्या मोबाइलचा शोध या अवलियाने लावला. मोटोरोला कंपनीत इंजिनीअर म्हणून काम करणाऱ्या माटीर्ने ३ एप्रिल १९७३ रोजी जगातला पहिला मोबाइल कॉल केला तो प्रतिस्पधीर् असलेल्या एटी अँड टी बेल लॅब्स कंपनीतील त्याच्या मित्राला. त्याचवषीर्च्या ऑक्टोबर महिन्यात माटीर्ने 'रेडिओ टेलिफोन सिस्टिम'साठी पेटंट दाखल केले. सध्या माटीर् अॅरेकॉम या कंपनीचे सीईओ आहेत. ही कंपनी वायरलेस नेटवकिर्ंगमध्ये काम करत

केशर-सेंद्रियातून संजीवनी

प्रयोगशील माणसे ही नेहमीच नव्याचा ध्यास घेत कार्यरत असतात. सुरेश वाघधरे हे नावसुद्धा शेतीत प्रयोग करणाऱयांमधील एक प्रमुख आहे. म्हणूनच त्यांच्या प्रयोगाची माहिती देणाऱया `केशर ः सेंद्रियातून संजीवनी' या पुस्तकाची तिसरी सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झाली. या नव्या आवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या दोन वर्षांत त्यांनी जे प्रयोग केले प्रामुख्याने वीजनिर्मिती, शेण, गोमूत्र, स्लरी, खतनिर्मिती, सिंचनाची किफायतशीर पद्धत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या २३ वर्षांपासून जे आपल्याला समजले ते दुसऱयाला सांगावे यानुसार शेतकऱयांसाठी माहिती त्यांनी अत्यंत खुलेपणाने उपलब्ध करून दिली आहे. भूमाता व गोमाता यांचा समन्वय असेल तर शेती फायद्याची ठरते, हे सूत्र धरूनच त्यांनी प्रयोगाला सुरुवात केली. आज त्यांच्याजवळ 45 देशी गाई आहेत. त्यांचे शेण हे खत म्हणून, तर मूत्र हे कीटकनाशक म्हणून ते वापरतात. याशिवाय गांडूळ खत, व्हर्मी वॉश तयार करतात. पिकांच्या वाढीसाठी सिद्ध झाले. गोबरगॅसच्या माध्यमातून वीजनिर्मिती; पाण्यासाठी शेततळे या भक्कम पायावर त्यांनी केशर आंबा व आवळ्याची नर्सरी उभी करून शाश्वत शेतीची संकल्पना

अनर्थाचे अर्थकारण

‘चांदोबा’ मासिकातील अनेक गोष्टींची सुरुवात ‘एका गावात एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहात असे’ या वाक्याने होत असे. खरे तर, ब्राह्मणच नव्हे तर बहुतांश कुटुंब गरीबच असत. ब्राह्मणव्यतिरिक्त मध्यम व दलित जातींमध्ये तर दारिद्रय़ व हलाखी भयानक होती. युरोपियन साहित्यातही गरीबीची विषण्ण करणारी वर्णने आहेत. इंग्लंडमध्ये १८ व्या आणि १९ व्या शतकात, फ्रान्समध्ये क्रांतीच्या अगोदर (१७८९ पूर्वी), जर्मनीत अगदी २० व्या शतकातही अफाट दारिद्रय़ होते. चीनमधील उद्ध्वस्त जीवनाचे आणि अथांग गरीबीचे चित्रण तर अनेक कथा-कादंबऱ्यांमधून आले आहे. पर्ल बक यांच्या ‘द गुड अर्थ’ कादंबरीने जगाचे लक्ष चीनच्या स्थितीकडे वळले. गरीबी तशी अगदी ‘सिव्हिलायझेशन’च्या पहिल्या टप्प्यापासून आहे. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर गरीबीचे रुपांतर हलाखीत, दारिद्रय़ात आणि देशोधडीला लागण्यात झाले. म्हणजेच ज्या औद्योगिक क्रांतीने प्रचंड उत्पादनाबरोबर नव्या श्रीमंतीला जन्म दिला, त्याच क्रांतीने नव-दारिद्रय़ालाही जन्म दिला. औद्योगिक क्रांतीच्या अगोदर (म्हणजे १६/१७ व्या शतकाच्या अगोदर) जमीनदार, व्यापारी, सावकार, सरंजामदार, राजे

आयटीमधील नऊ 'इनोव्हेटिव्ह' कंपन्या-2009-10

मोबाईल तंत्रज्ञान, ग्रामिण भारतासाठी उपयुक्तता, रोजगार अशा विविध नाविन्यपूर्ण संकल्पना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात प्रत्यक्षात आणल्याबद्दल "नॅस्कॉम'ने भारतातील नऊ कंपन्यांना नुकतेच "नॅस्कॉम इनोव्हेशन' पारितोषिकाने गौरविले. या पारितोषासाठी 24 कंपन्यांची ऑनलाईन उत्पादने स्पर्धेत होती. उद्या (ता. 10) मुंबईत "नॅस्कॉम'च्या इंडिया लिडरशीप फोरममध्ये या नऊ कंपन्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येतील. विजेत्या कंपन्यांची निवड करण्यासाठी त्रिस्तरीय पद्धत हैदराबाद, बंगळूर, दिल्ली आणि पुणे येथे राबविण्यात आली. भारतीय माहिती तंत्रज्ञान-बीपीओ क्षेत्रामध्ये या पुरस्काराचे विशेष महत्व आहे. त्यामुळेच, या कंपन्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांकडे भारतीयच नव्हे, तर जगाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे लक्ष असते. नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वास्तव वापर, हे भारतीय माहिती तंत्रज्ञान-बीपीओ क्षेत्राच्या वाढीचे रहस्य राहिले आहे. सन 2020 मध्ये हे क्षेत्र 75 अब्ज डॉलर्सची उलाढाल करेल, असा "नॅस्कॉम'ला विश्‍वास आहे. या पार्श्‍वभूमीवर पारितोषिक विजेत्या कंपन्यांच्या उत्पादन-सेवांना

जॅकी चॅन

निष्णात नर्तकाला लाजवण्याची धमक असलेले ‘कुंग फू’ हाणामारीमधले पदलालित्य आणि बावळटपणाच्या बुरख्याआड लपलेल्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांना गुदगुल्या ते पोट धरून हसण्यास भाग पाडणाऱ्या ‘जॅकी चॅन’ या नावाभोवतीचे वलय अगडबंब आहे. एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आंतरराष्ट्रीय सन्मान लाभूनही भरमसाट प्रेक्षकप्रियता मिळविण्याचे भाग्य मिळविणारा जॅकी चॅन सारखा दुसरा ‘सुपरस्टार’ शोधूनही सापडणार नाही. लढण्याचे आणि कधीही पराभूत न होण्याचे तत्वज्ञान सांगणाऱ्या कुंग फूपटांना ब्रूस लीने जागतिक पटलावर प्रस्थापित केले असले, तरी आपल्या खाशा मस्कऱ्यांच्या ‘अ‍ॅक्शन’ मसाल्यांनी भरलेल्या चित्रपटांनी जॅकीने ‘हार्डकोअर’ कुंग फूपटांच्या चाहत्यावर्गाला या चित्रपटप्रकारापासून दूर जाऊ दिले नाही. त्याच्या चित्रपटांना अनेकदा सवंग विनोद म्हणून हिणवले जाते. तरी पडद्यावर खलनायकाला अन् त्याच्या न संपणाऱ्या टोळक्याला लोळवण्याच्या नवनवीन कल्पना पाहून त्याच्या विरोधकांनादेखील टाळ्या पिटण्याचा मोह अनावर होतो, हे तितकेच सत्य आहे. हाँगकाँगमध्ये जन्मलेल्या चान काँग-सांग म्हणजेच जॅकीचे बालपण फ्रेंच दूतावासात गेले. तेथे स्व

रिंग आणि सेल फोन

३९बेल लॅब्जमधल्या एका शोधनिबंधामध्ये १९४७ साली डग्लस रिंग नावाच्या माणसानं सेलफोनची संकल्पना प्रथमच मांडली. आता आपण मोबाईल फोन आणि सेल फोन हे शब्द एकाच समान अर्थानं वापरत असलो तरी त्या काळात मात्र या दोन तंत्रज्ञानांमध्ये फरक होता. मोबाईल फोन वापरून एकीकडून दुसरीकडे जाताना लोक बोलू शकायचे. पण त्यासाठी आता वापरतात तशी सेलची संकल्पना तेव्हा अस्तित्वात नव्हती. म्हणजे आता जसे एखाद्या देशाचे राज्यांमध्ये, राज्याचे गावांमध्ये आणि गावाचे छोटय़ा विभागांमध्ये तुकडे करून प्रत्येक ठिकाणी मोबाईल फोनची सुविधा पुरविणाऱ्या कंपन्या संदेशवहनासाठी मनोरे उभे करतात तसं तंत्रज्ञान रिंग या माणसानं प्रथमच सुचवलं होतं. यासाठी एका गावाच्या होणाऱ्या प्रत्येक विभागाला एक सेल असं म्हटलं गेलं आणि या सगळ्या सेल्सच्या एकत्रीकरणातून बनलेल्या जाळ्याला सेल्युलर नेटवर्क, असं नाव दिलं गेलं. ही या तंत्रज्ञानामागची ढोबळ कल्पना होती. प्रत्यक्षात ते तंत्रज्ञान जरा किचकट होतं. उदाहरणार्थ- समजा पुण्यात एखाद्या मोबाईल कंपनीला आपलं जाळं उभं करायचं असेल तर ती पुण्याचे प्रत्येक (समजा ७०) विभाग पाडेल. प्रत्येक विभाग म्हणजे एक सेल, अ