Posts

Showing posts from May, 2016

चल्- चलूया की! (डॉ. आशुतोष जावडेकर )

Image
संभाजी भगत या लोकविलक्षण कलाकाराची समीक्षा नक्की कोण करणार आहे ? तो लोकशाहीर आहे , म्हणून कुणी लोकसाहित्याचा अभ्यासक ? तो उत्तम गातो म्हणून कुणी संगीत समीक्षक ? त्याच्या विद्रोही विचारांना हेरत ‘ दलित स्टडीज् ’ वाला कुणी नव-प्रस्थापित ? का तो अति डावा आहे म्हणून ठोकण्याच्या मिषाने मैदानात उतरलेला कुणी अति उजवा लेखक किंवा समीक्षक ? मला वाटतं , या साऱ्यांनीच संभाजी भगतांच्या कामावर लिहावं. त्यांच्या कामाचा , निर्मितीचा आकार आणि आवाका हा मोठा आहे. मला आज काही तशी समीक्षा करायची नाही. या सदराचा आवाका मोठा असला तरी त्याची जागा मर्यादित आहे! पण मी करेन तर संभाजी भगत हेच एक स्वतंत्र ‘ डिस्कोर्स ’ चं एकक मानून करेन.  आता फक्त लिखित शब्द म्हणजे साहित्य समजण्याचा काळ संपलाय. व्हॉट्सअॅपच्या दीर्घ चॅटनंतर आलेलं एखादं चिन्ह हेही कवितेसमान असू शकतं- तीही एक संहिताच ( text) असते. आणि इथे तर हा कवी त्याच्या बुलंद , खणखणीत आवाजात साऱ्या प्रस्थापितांना आव्हान देत गातोय बघा. आणि मग संगीत आणि साहित्य हे दोन डिस्कोर्स एकवटत आहेत. तो म्हणतोय : ‘ हे पालखीचे भोई , यांना आईची वळख नाही जिथे जिंदगी जाग

हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे....-रामदास भटकळ

Image
माणिक सीताराम गोडघाटे  ऊर्फ  कवी ग्रेस यांच्या जयंतीनिमित्त(१० मे ) त्यांना आदरांजली !! श्री रामदास भटकळ यांनी  फेब्रुवारी २०१२ मध्ये ग्रेस यांच्या विषयी  लिहिलेला  युनिक फीचर्सच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध झालेला हा भावपूर्ण तितकाच उत्कट लेख    _________________________________________________________________________________ ग्रेस .   मराठी साहित्य विश्वाततले एक महत्त्वाचे कवी. संवेदनांनी ओतप्रोत भरलेली त्यांची कविता मानवी मनाच्या तळाशी असलेल्या दु:खाच्या मुळांचा शोध घेते. असा हा प्रतिभावंत कवी नुकताच ‘साहित्य अकादमी पुरस्कारा’ने सन्मानित झाला, शिवाय ‘युनिक फीचर्स’ आयोजित यंदाच्या ‘दुस-या मराठी ई-साहित्य संमेलनां’चं ( २०१२)  अध्यक्षपद भूषवित आहे. यानिमित्ताने त्यांच्या निकटच्या स्नेह्याने   लिहिलेला लेख. कवी ग्रेस यांच्याशी माझी भेट माणिक गोडघाटे यांच्या आधी झाली ही माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची घटना आहे. प्रकाशकाकडे पोचायला ओळखीपाळखी लागतात अशी अनेकांची समजूत आहे. कदाचित ते काहींच्या अनुभवाला धरून असेलही; पण पॉप्युलर याला अपवाद आहे याचा मला अभिमान आहे. ग्रेसची कविता