Posts

Showing posts from August, 2015

शिरपूरची तीस खेडी जलसंपन्न- सुरेश खानापूरकर (Shirpurchi Tees Khedi Jalsampanna-Suresh Khanapurkar)

Image
शिरपूरची तीस खेडी जलसंपन्न पावसाचे पाणी जिथल्या तिथेच अडवा-जिरवा, ते स्थानिकांना वापरू द्या! अशी साधी व सोपी संकल्पना घेऊन सुरेश खानापूरकर काम करत आहेत. त्यांचा प्रयोग चालू आहे तो  धुळे  जिल्हयातील शिरपूर तालुक्यात. त्यांनी अमरीश पटेल ह्यांच्या सुतगिरणीच्या आर्थिक साहाय्याने एकोणतीस खेडी जलसंपन्न केली आहेत. तेथे मे महिन्यात देखील शेतीला पाणी मिळते; नवी धान्य लागवडं केली जाते! इतरत्रही ठिकाणी असे प्रयोग होत आहेत, पण येथील प्रयोगांची व्याप्ती, त्यात ओतलेला जीव व त्याला असलेला शास्त्रीय आधार यामुळे शिरपूरसारख्या दुष्काळी तालुक्यातील गावेसुद्धा सुजलाम् बनली आहेत. असली, नागेश्वर यांसारखे नाले, जे भर पावसाळ्यातही पाऊस पडून गेल्यानंतर कोरडे व रोडावलेले दिसायचे ते नाले तुडुंब भरलेले असतात. त्यात साठलेल्या पाण्यामुळे आसपासची भूजल पातळी उंचावली आहे. परिणामी, विहिरी व बोअरवेल्सना कमी खोलीवर पाणी लगत आहे. पाणी जमिनीत मुरवण्याकडे आतापर्यंत लक्ष दिले जात नव्हतं. उलटं, वाटेल तसे पाणी उपसले जायचे, त्याचा परिणाम म्हणून पाण्याची पातळी खोल-खोलवर जात राहिली. काही भागांत तर ती इतकी खोल

गरज पाणी साठवण्याची - अ. पां. देशपांडे (कार्यवाह मराठी विज्ञान परिषद ) [Garaj Pani Sathvanyachi- A.P. Deshpande )

Image
गेली 20 वर्षे तरी आपल्याला फेब्रुवारीपासून जूनमध्ये पावसाळा सुरू होईपर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवते आहे. याला लोकसंख्येतील वाढ, प्रत्येक माणसाची पूर्वीच्या तुलनेत वाढलेली पाण्याची गरज, वाढते औद्योगीकरण आणि बदलते हवामान ही प्रमुख कारणे आहेत. 1947 मध्ये देशाची लोकसंख्या 40 कोटींच्या घरात होती, ती आता 2015 मध्ये 125 कोटी झाली आहे. ही वाढ तिपटीने झाल्याने आपली पाण्याची गरज तितकी वाढली. पूर्वी माणूस विहिरीचे किंवा नदीचे पाणी आणून वापरत असल्याने त्याचा वापर काटकसरीने होई. आता नळाची चावी फिरवली की पाणी येत असल्याने पाण्याचा वापर (की गैरवापर) खूप वाढला आहे. शिवाय वॉशिंग मशिनसारखी उपकरणे जास्त पाणी वापरतात. 1947 मध्ये संपूर्ण राज्यात मिळून 5-10 कारखाने होते. आता प्रत्येक शहरात आणि गावात मोजता न येण्याएवढे कारखाने झाले आहेत आणि शेवटी बदलते हवामान आहेच, पण ते पूर्वीही होतेच की ! या सर्व कारणांमुळे पूर्वीचे पाणीसाठे अपुरे पडत आहेत. कारण त्यात आपण विशेष लक्षणीय अशी वाढ केलेली नाही.  यातील पहिले कारण वाढत्या लोकसंख्येचे आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कुटुंब नियोजना

बाजार-दासू वैद्य

चारेक वर्षांपूर्वी नव्यानं उघडणाऱ्या मॉलची सर्वत्र चर्चा होती. गावभर लागलेले होर्डिग्ज.. वर्तमानपत्रांतून मॉलच्या भव्यपणाचं कौतुक करताना ओसंडून वाहणारे रकाने.. प्रत्येकाच्या तोंडी मॉलची चर्चा रंगलेली. 'अहो, एवढा मोठ्ठा मॉल. संपूर्ण एअर कंडिशन आहे म्हणे!' 'हे आहे का? ते आहे का? असलं विचारायचं नाही. काय पाहिजे ते ब्रँडेड मिळणार!'.. असा मॉलचा बोलबाला वाढतच गेला. शेवटी हे मॉलचं वातावरण एवढं तापलं, की शुभारंभाच्या दिवशी प्रवेशासाठी लोकांना रांगा लावाव्या लागल्या. तरीही लोक आटोक्यात येईनात. शेवटी पोलिसांना पाचारण करावं लागलं. काहींनी पोलिसांचे दंडुके खाल्ले. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत मॉलसमोर लागलेल्या लांबच्या लांब रांगांचे फोटो झळकले. त्यामुळे उर्वरित लोकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली. परिणामी मॉलची गर्दी काही हटेना. एकमेकांना विचारणं सुरू झालं, 'तुम्ही अजून मॉलमध्ये गेला नाहीत?' या प्रश्नातील 'अजून'वर दिलेला जोर बघून अधिकच मागासल्यासारखं वाटायला लागलं. एखादा उत्साही रसिकमित्र मारधाड सिनेमा पाहून आल्यावर साभिनय स्टोरी सांगतो. त्यात त्यानं जवळपास चित्रपटाच