कुणी पाणी देता का पाणी? (निखिल रत्नपारखी)
‘ पुढचे दोन दिवस पाणी येणार नाही! ’ कायऽऽ!!! ‘ कुठेतरी बॉम्बस्फोट झाला ’ या बातमीने माझ्यावर जेवढा परिणाम झाला असता त्यापेक्षा जास्त गंभीर परिणाम माझ्या मनावर झाला. ‘ झाडे जगवा , पाणी वाचवा ’, ‘ पाणी हे जीवन आहे ’, ‘ थेंबे थेंबे तळे साठे ’, ‘ ओढवेल मोठा अनर्थ , पाणी नसेल तर जगणं आहे व्यर्थ ’ अशा प्रकारच्या चार-पाच म्हणी आणि सुविचार लिहिलेल्या भिंतींसकट पटापट मनात येऊन गेले. एक दिवस कसाबसा आपण काढू , पण दुसऱ्या दिवशीचं काय ? या धक्क्याची तीव्रता बऱ्यापैकी ओसरल्यावर उपाययोजनांना सुरुवात झाली. घरातल्या वाटय़ांपासून ज्या ज्या भांडय़ांत पाणी भरून ठेवता येणं शक्य आहे त्यात पाणी भरून ठेवायचं ठरलं. अगदी वॉशिंग मशिनचीही यातून सुटका झाली नाही. एक वेळ प्यायचं पाणी विकत आणता येईल , आणि एवढी सगळी भांडी भरली तर वापरायचं पाणी पुरेल , असा प्राथमिक अंदाज सर्वानुमते वर्तवला गेला. चला तर मग आता एक क्षणही वाया न घालवता पाणी भरायच्या कामाला लागा. आणि बायकोने अनपेक्षितपणे दुसरा बॉम्ब टाकला- ‘ कुठून आणि कसं भरायचं पाणी ? आज पहाटेच पाणी गेलंय. ’ कळवण्यास अत्यंत दु:ख होतंय की , आज पहाटेच आमचे घरातील सर्वा...