शेतमालाची ‘महागाई’ नाहीच! सतीश देशमुख
अन्नधान्यांचे, दूध, फळे/ भाजीपाल्यांचे भाव थोडे वाढले की शहरांमध्ये ‘महागाई’ वाढल्याची ओरड सुरू होते. शेतमालाचा उत्पादन खर्च गृहीत धरल्यास ‘महागाई’ची परिभाषाच इथे लागू पडत नाही. घाऊक किंमत निर्देशांक वाढ दर गेल्या बारा वर्षांत अनेक प्रकारच्या मालासाठी ‘उणे’च राहिला आहे. आधारभूत किमतीही वाढलेल्या नाहीत. तरीही शहरांमध्ये भाज्या, साखर आदी महागले की बोंब ठरलेलीच. असे होण्यामागील कारणांचा मागोवा घेतल्यास सरकारची धोरणे कशी कृषीकेंद्री नाहीत हेच लक्षात येते.. अन्नधान्यांचे, दूध, फळे/ भाजीपाल्यांचे भाव थोडे वाढले की शहरांमध्ये ‘महागाई’ वाढल्याची ओरड सुरू होते. शहरी मध्यमवर्गीयांची ही मानसिकता बदलण्याचे फार मोठे आव्हान आहे. वर्तमानपत्रे/ मीडियावाले हे शेतमाल, साखर, दूध, डाळ किंवा मेथी/ कोथिंबिरीची जुडी ‘महागली’ अशी शीर्षके देतात. ‘कांदा सफरचंदापेक्षा महाग’ किंवा ‘बँकेत कर्ज काढायला चाललो आहे, कारण कांदे खरेदी करायचे आहेत’ अशा अर्थाची व्यंगचित्रे काढली जातात. येथे शेतकऱ्यांचा जीव जातो आहे आणि तुम्हाला विनोद सुचतो? तुमची महागाईची परिभाषा आहे तरी काय? गेल्या काही वर्षांत ‘इतर’ वस्तूंचे भाव कि...