Posts

Showing posts from March, 2018

सामान्य भाजीविक्रेती ठरली शेतकऱ्यांसाठी आदर्श; ३ गुंठ्यात ५२ पिके घेण्याची साधली किमया,हाती तीन एकर माळरान, पाण्याची कमतरता याला न डगमगता यशस्वी शेती- महिला दिनानिमित्त या नारीला सलाम

Image
सामान्य भाजीविक्रेती ठरली शेतकऱ्यांसाठी आदर्श; ३ गुंठ्यात ५२ पिके घेण्याची साधली किमया,हाती तीन एकर माळरान, पाण्याची कमतरता याला न डगमगता यशस्वी शेती- महिला दिनानिमित्त या नारीला सलाम अपुरा पाऊस, नापिकी, कर्जाचा डोंगर यामुळे राज्यात आणि देशात गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. सरकारकडून कर्जमाफी, पीक विमा आदी योजनांद्वारे बळीराजाला या समस्येतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. पण दुसरीकडे मात्र आत्महत्या काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. कर्ते पुरूष कंटाळून आत्महत्येचा मार्ग अवलंबताना दिसत आहेत. पण इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर ही रडगाणी न गाता..अवघ्या काही गुंठ्यात..आदर्श आणि यशस्वी शेती कशी करता येते याचा वस्तूपाठच एका माऊलीने उभा केला आहे. मनीषाताई भांगे असे या माऊलीचे नाव असून त्यांनी खैरेवाडी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेती कशी करावी याचे उदाहरण जगासमोर ठेवले आहे. अशिक्षीत असूनही एखाद्या कृषी तज्ज्ञाला लाजवेल अशी कामगिरी त्यांनी केली आहे. हाती तीन एकर माळरान, पाण्याची कमतरता अशा परिस्थितीलाही न डगमगता ...

भविष्यवेधी भोपळा-डॉ. बाळ फोंडके

पुणे-मुंबई दरम्यानच्या प्रवासाचा कालावधी कमी करण्यासाठी 'हायपरलूप' हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरले जाणार असून त्यासाठी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'दरम्यान 'व्हर्जिन हायपरलूप वन' कंपनीसोबत गेल्या रविवारी करार करण्यात आला. या करारान्वये पुण्याहून नवी मुंबई विमानतळमार्गे मुंबईपर्यंतचा प्रवास अवघ्या २५ मिनिटांत करता येणार आहे. हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे, त्याविषयी...  केवळ विस्ताराचाच विचार केला तर आपल्या देशातील रेल्वेचं जाळं जगात दुसऱ्या क्रमांकाचं मानलं जातं. त्यात गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे प्रवास अधिक आरामदायी आणि सोईस्कर झाला आहे. दूर अंतरावरच्या प्रवासासाठी शयनयान, त्यातील दुसऱ्या वर्गाच्या डब्यांमध्येही अंगाला टोचणाऱ्या फळकुटांऐवजी गाद्या, अंथरुण-पांघरूण आणि खानपान आदि सेवा, वातानूकुलित डब्यांचीही सोय, वगैरे अनेक सुधारणा झाल्या आहेत. अध्येमध्ये कुठंही गाडी बदलावी न लागता कोणत्याही एका गावापासून कोणत्याही दुसऱ्या गावापर्यंत आता प्रवास करता येतो. तरीही विकसित देशांच्या मानानं या प्रवासाचा वेग संथ आहे, हेही सत्य आहे. दक्षिणेकडच्या कन्याकुमारीपासून उत्तरेती...