मनमोराचा पिसारा.. भाषेची गम्मत जगण्यातली जम्मत-डॉ. राजेंद्र बर्वे
मनमोराचा पिसारा..
भाषेची गम्मत जगण्यातली जम्मत-डॉ. राजेंद्र बर्वे
जगण्याबद्दल आणि जीवनाविषयी आसक्ती ऐवजी जिज्ञासा वाटू लागली ना मित्रा, की आयुष्य बदलून जातं. जगण्याविषयी उत्सुकता म्हणजे जगणाऱ्या माणसांविषयी कुतूहल. कोण कसा जगतो? त्यानं तसं जीवन का निवडलं याविषयी कोणताही अभिनिवेश न बाळगता विचार केला की आपला स्वत:विषयीचा दृष्टिकोन बदलतो. आपण अधिक सजगपणे जगतो, जगण्याचा ना कंटाळा येत, नाही त्यात मन गुंतूनही राहात.
जगण्यातल्या या गमतीजमती शोधण्याकरता भाषेचा अभ्यास करायला ही गंमत वाटते. भाषेतल्या म्हणी नि वाक्प्रचार यांच्याकडे विश्लेषक नजरेनं पाहिलं की त्या समाजाविषयी अधिक माहिती कळते. उदा. पूर्वी आपल्याकडे परीक्षा देणे याला मांडवाखालून जाणे असा वाक्प्रचार होता. परीक्षेचा नि मांडवाचा काय संबंध? लग्नाचे मांडव आपल्याला निदान ऐकून माहिती आहेत, पण परीक्षेचे? मित्रा, पूर्वी परीक्षेला बसण्यासाठी वर्गाची आणि बंद खोलीची सोय नव्हती, त्यामुळे मांडवात मॅट्रिकच्या परीक्षा घेतल्या जायच्या. त्यामुळे लग्नाच्या मांडवात शिरण्यापूर्वी परीक्षेच्या मांडवातून जावं लागायचं. त्यासाठी परीक्षेत पास व्हावं, अशीही अपेक्षा नव्हती. त्यामुळे मांडवाखालून 'नॉन मॅट्रिक'चा शिक्का घेऊन बाहेर पडलात तरी पुरे. 'तारांबळ' उडणे असा शब्दप्रयोग ऐकला असशील, होय ना? हे तारांबळ आलं कुठून? लग्नात मंगलाष्टके म्हणताना तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं, 'चंद्रबलं तदैव' अशा शेवटच्या चरणापाशी आलं की एकच घाई उडत असे. त्या ताराबलंच तारांबळ आणि लग्नासाठी मुलीचं नशीब बलवत्तर म्हणजे उत्तम चंद्रबळ!
मराठीतल्या अशा गमतीजमती ऐकून ठाऊक असतात. इंग्रजीतल्या, 'लॉजिंग बोर्डिग'विषयी खूप कुतूहल होतं. लॉजिंग म्हणजे राहण्याची सोय नि बोर्डिग म्हणजे जेवणाची सोय. नि बोर्डिग स्कूल म्हणजे राहून, जेवून, खाऊन शिक्षणाची सोय करणाऱ्या शाळा. त्यांचा शिस्तीशी नंतर संबंध आला. परगावातल्या लॉजवर राहाणाऱ्यांना बोर्डर म्हणायचे. हे ठीकाय, पण कंपनीमधल्या स्वच्छ
व्यवहाराला अबव्ह बोर्ड का म्हणायचं? पैसे 'खाण्या'शी संबंध नाही म्हणून?
एके दिवशी कोडं उलगडलं. 'मध्ययुगातल्या लोकांच्या जेवणाच्या सवयी' यावर वाचता वाचता बोर्डाचा संबंध लक्षात आला. पूर्वी आताच्या सारखी डायनिंग टेबलं नव्हती. म्हणजे आडव्या फळकुटाला चतुष्पादांसारखे चार पाय लावले तर स्थिर राहाणारी वस्तू तार करता येते. त्या आडव्या पृष्ठभागावर डिश ठेवून जेवता येतं हा शोध माणसाने लावलेला नव्हता. (कमाल आहे ना?) त्यामुळे जेवणारी माणसं फळकुटं मांडीवर अथवा गुडघ्यावर घेत, त्या फळकुटाना 'बोर्ड' म्हणत असत. त्यामुळे जेवायचं तर फळकुटं हवीत. जेवणारा माणूस आपापल्या फळकुटांची सोय लावी. पुढे जेवणं म्हणजे 'बोर्डा'चा वापर आणि नंतर जेवण म्हणजे 'बोर्डिग' असा शब्दप्रयोग तयार झाला. त्यात काही लबाड माणसं अन्न आपल्या फळकुटाखाली लपवायचे. त्यामुळे जेवताना आपले दोन्ही हात फळकुटावर म्हणजे बोर्डवर ठेवले की ते लोक अबव्ह बोर्ड म्हणजे प्रामाणिक! बोर्ड या शब्दाचा उपयोग कंपन्यांच्या संचालनात होऊ लागला, त्यामुळे बोर्ड म्हणजे अधिकारी वर्ग, शासनकर्ते असा अर्थ तयार झाला.
मी म्हटलं ना, भाषेच्या अशा वापरातून जीवनपद्धतीची माहिती मिळते. अरे, अशीच गम्मत असते, त्याला हाय फंडा नॉलेज हवे, असेच काही नाही!
डॉ. राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com

Comments
Post a Comment