ब्राझील वि. जर्मनी -फुटबॉल विश्वचषक -०८ जुलै २०१४-एक सात नमस्ते
उपांत्य सामना -बेलो होरीझान्ते -०८ जुलै २०१४ ब्राझील आपली ऐतिहासिक आणि नजाकतदार फुटबॉलची कला विसरली का? खेळात जय-पराजय सुरूच असतो पण कालचा ब्राझिलचा पराभव म्हणजे फारच मानहानिकारक ,प्रतिकार विरहीत आणि सच्च्या फुटबॉलप्रेमीच्या मनाला वेदना देणारा होता असेच म्हटले पहिजे. कालच्या सामन्यात ब्राझील ऐवजी दुसरी कुठलाही संघ असता तर फार बरे झाले असते असे प्रकर्षाने वाटून गेले. असो आता बघूया काय होतेय ते आजच्या उपांत्य सामन्यात आणि रविवारच्या अंतिम सामन्यात !