माधव जूलियन-"प्रेमस्वरूप आई "
मराठीतील प्रसिद्ध कवी डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांची २१ जानेवारी ही जयंती. अत्यंत नावाजलेले मराठी कवी आणि फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक या भूमिका त्यांनी अत्यंत ताकदीने पेलल्या. मराठी साहित्याचे भावविश्व आपल्या तरल आणि भाव मधुर कवितांनी समृध्द केले. त्यांचीच "प्रेमस्वरूप आई" या शीर्षकाची एक अत्यंत हृदयस्पर्शी कविता : प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई ! बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ? तू माय, लेकरु मी; तू गाय, वासरु मी; ताटातुटी जहाली, आता कसे करु मी ? गेली दुरी यशोदा टाकुनि येथ कान्हा, अन् राहीला कधीचा तान्हा तिचा भुका ना? तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीहि वाहे - जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे ; नैश्ठूर्य त्या सतीचे तू दावीलेस माते , अक्षय्य हृत्प्रभूचे सामीश्य साधन्याते. नाही जगात झाली आबाळ या जिवाची, तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची. चिती तुझी स्मरे ना काहीच रूपरेखा, आई हवी महणूनी सोडी न जीव हेका. विद्याधनप्रतिष्ठा लाभे अता मला ही, आईविणे परी मी हा पोरकाच राही. सारे मिळेपरं तू आई पुन्हा न भेटे , तेणे चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे . ...