माधव जूलियन-"प्रेमस्वरूप आई "
मराठीतील प्रसिद्ध कवी डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांची २१ जानेवारी ही जयंती. अत्यंत नावाजलेले मराठी कवी आणि फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक या भूमिका त्यांनी अत्यंत ताकदीने पेलल्या. मराठी साहित्याचे भावविश्व आपल्या तरल आणि भाव मधुर कवितांनी समृध्द केले. त्यांचीच "प्रेमस्वरूप आई" या शीर्षकाची एक अत्यंत हृदयस्पर्शी कविता :
प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई !
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?
तू माय, लेकरु मी; तू गाय, वासरु मी;
ताटातुटी जहाली, आता कसे करु मी ?
गेली दुरी यशोदा टाकुनि येथ कान्हा,
अन् राहीला कधीचा तान्हा तिचा भुका ना?
तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीहि वाहे -
जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे ;
नैश्ठूर्य त्या सतीचे तू दावीलेस माते ,
अक्षय्य हृत्प्रभूचे सामीश्य साधन्याते.
नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.
चिती तुझी स्मरे ना काहीच रूपरेखा,
आई हवी महणूनी सोडी न जीव हेका.
विद्याधनप्रतिष्ठा लाभे अता मला ही,
आईविणे परी मी हा पोरकाच राही.
सारे मिळेपरं तू आई पुन्हा न भेटे ,
तेणे चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे .
आई तुझया वियोगे ब्रह्मांड आठवे गे !
कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे .
किंवा विदेह आत्मा तूझा फिरे सभोती,
अव्यक्त अश्रुधारा की तीर्थरूप ओती !
ही भूक पोरक्याची होई न शांत आई
पाहुनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही
वाटे इथूनि जावे , तूझ्यापुढे निजावे
नेती तुझ्या हसावे , चिती तुझ्या ठसावे !
वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके ,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके?
घे जन्म तू फिरुनी , येईन मीहि पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?
तू माय, लेकरु मी; तू गाय, वासरु मी;
ताटातुटी जहाली, आता कसे करु मी ?
गेली दुरी यशोदा टाकुनि येथ कान्हा,
अन् राहीला कधीचा तान्हा तिचा भुका ना?
तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीहि वाहे -
जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे ;
नैश्ठूर्य त्या सतीचे तू दावीलेस माते ,
अक्षय्य हृत्प्रभूचे सामीश्य साधन्याते.
नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.
चिती तुझी स्मरे ना काहीच रूपरेखा,
आई हवी महणूनी सोडी न जीव हेका.
विद्याधनप्रतिष्ठा लाभे अता मला ही,
आईविणे परी मी हा पोरकाच राही.
सारे मिळेपरं तू आई पुन्हा न भेटे ,
तेणे चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे .
आई तुझया वियोगे ब्रह्मांड आठवे गे !
कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे .
किंवा विदेह आत्मा तूझा फिरे सभोती,
अव्यक्त अश्रुधारा की तीर्थरूप ओती !
ही भूक पोरक्याची होई न शांत आई
पाहुनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही
वाटे इथूनि जावे , तूझ्यापुढे निजावे
नेती तुझ्या हसावे , चिती तुझ्या ठसावे !
वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके ,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके?
घे जन्म तू फिरुनी , येईन मीहि पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !
त्या माधव जूलियन आणि आमची "प्रेमस्वरूप आई "ह्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !!
Premaswrup Aaie, this poem is everlasting meaningful poem , Its clung to the Noumenal factor. So it transmit from phenomenal to Noumenal.
ReplyDeletePremaswrup Aaie, this poem is everlasting meaningful poem. Due to its meaningful status gotchange inits nature from phenomenal to Noumenal.
ReplyDeleteभ्रांत तुम्हा का पडे
ReplyDeleteमला त्यांची ' भ्रांत तुम्हा का पडे ' हि कविता हवी आहेत .
ReplyDeleteKhoop raadu salad. Best, beautiful poem.
ReplyDeleteखूपच सुंदर कविता . माझे मन भावूक झाले. कुणाच्या हीं हृदयाला हात घालणारी कविता.
ReplyDeleteकविना नम्र प्रणाम !
Bhavart patva
ReplyDeleteSo nice l will try to translate in kannada.touching poem
ReplyDeletesunder
ReplyDelete