#मराठी राजभाषा दिन
मराठी राजभाषा दिनानिमित्त तमाम मराठीजनांना मनापासून शुभेच्छा. ज्यांचा जन्मदिन आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो, त्या कुसुमाग्रजांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! खरे तर आपल्या मातृभाषेसाठी असा एक दिवस "राजभाषा/गौरव दिन " या गोंडस नावाखाली साजरा करण्यात आपण धन्यता मानण्यापेक्षा दैनंदिन जीवनात आपण फक्त जाणीवपूर्वक काही छोट्या छोट्या गोष्टी केल्यास विनासायास आजीवन "मराठी गौरव दिन " साजरा होतच राहील याची खात्री मनात बाळगा काही छोट्या-छोट्या गोष्टी आपण केल्या, तरी भाषेच्या विकासाला त्या पूरक ठरतील.दररोज आपण भरपूर इंग्लिश/हिंदी शब्द आपल्या व्यवहारात कळत नकळत वापरत असतो त्यांचे पर्यायी शब्द माहिती करून घेण्याचा प्रयत्न करूयात . आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे समाज माध्यमांत (सोशल मीडिया) अगदी सहजपणे मराठी वापरू शकतो जसे की युनिकोड-मराठी. त्याचा वापर वाढवा, युनिकोड मराठी पद्धतीचा प्रसार करा, महत्वाचे म्हणजे वेळोवेळी आपला परभाषिक व्यक्तींशी जसे कि प्रवासातील संभाषणात (आपल्या शहरात जे महाराष्टा...