#मराठी राजभाषा दिन

मराठी राजभाषा दिनानिमित्त तमाम मराठीजनांना मनापासून शुभेच्छा. ज्यांचा जन्मदिन आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो, त्या कुसुमाग्रजांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!
खरे तर आपल्या मातृभाषेसाठी असा एक दिवस "राजभाषा/गौरव दिन " या गोंडस नावाखाली साजरा करण्यात आपण  धन्यता मानण्यापेक्षा दैनंदिन जीवनात आपण फक्त जाणीवपूर्वक काही छोट्या छोट्या गोष्टी केल्यास विनासायास आजीवन "मराठी गौरव दिन " साजरा होतच राहील याची खात्री मनात बाळगा
  • काही छोट्या-छोट्या गोष्टी आपण केल्या, तरी भाषेच्या विकासाला त्या पूरक ठरतील.दररोज आपण भरपूर इंग्लिश/हिंदी शब्द आपल्या व्यवहारात  कळत नकळत वापरत असतो त्यांचे पर्यायी शब्द माहिती करून घेण्याचा  प्रयत्न करूयात . 
  • आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे समाज माध्यमांत (सोशल मीडिया) अगदी सहजपणे मराठी वापरू शकतो जसे की युनिकोड-मराठी. त्याचा वापर वाढवा, युनिकोड मराठी पद्धतीचा प्रसार करा, 
  • महत्वाचे म्हणजे वेळोवेळी आपला परभाषिक व्यक्तींशी जसे कि प्रवासातील संभाषणात (आपल्या शहरात जे महाराष्टात असेल) किंवा कॉलसेंटर्स (माहिती केंद्रे) वरून येणाऱ्या दूरध्वनींवर  मराठीचा   आग्रह धरा (दुराग्रह नाही )...                                                                                                                                अशा अनेक गोष्टी आपण वैयक्तिक पातळीवर करू शकतो . 

   यावेळी कविवर्य सुरेश भटांची एक अप्रतिम कविता मन पटलांवर उमटते आहे
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

जय हिंद ! जय महाराष्ट्र !!

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण