कबीरवाणी-अरविंद दोडे
कबीर हे एक सार्वकालिक नाव. त्याला बंधनं नाहीतच ना. ना भाषेची,ना प्रांताची, ना काळाची. कबीराने शेकडो वर्षापूर्वी जे सांगून ठेवलंय त्याचे दाखले आजही दिले जातात. त्याचे सहज सोपे दृष्टांत कोणत्याही पिढीपर्यंत विनासायास पोहोचतात. म्हणूनच कबीराचे दोहे भजन स्वरुपात सादर झाले तरी, किंवा पॉप म्युझिकचा साज लेवून अवतरले तरीही मनाला भिडतातच! सकाळ वर्धापनदिनानिमित्त खारघर येथील सेट्रल पार्क (ऍम्फी थिएटर) मध्ये शनिवारी कबीर कॅफे सजणार आहे. या निमित्ताने अमृतमयी कबीरवाणीवर एक नजर... प्रेम छिपाया ना छिपे... शब्दांचे संवेदनात्मक किंवा नादरूप अंग हे त्याच्या अर्थात्मक अंगाचे प्रतीक असते. हाताळण्याला सोपे असे अर्थाचे एक वाहक म्हणूनच त्याचा उपयोग केला जातो. शब्दाच्या या दोन अंगांचा संयोग हा प्रत्येक मर्यादाबद्ध संघशक्तीला वरदानरूप ठरतो; पण तोच शापरूप ठरला तर? प्रतीक आणि अर्थ यांचा परस्पर भेद आणि संगम करण्याची जादू संतवाणीत दिसून येते. भारतीय संतांमध्ये पहिला बंडखोर संतकवी म्हणून कबीराचे नाव आदराने घेतले जाते. त्याच्या जीवनाची आणि तत्त्वज्ञानाची ही एक झलक... कबीर! झुंजार...