Posts

Showing posts from August, 2017

आई -तृतीय पुण्यस्मरण

Image
आई -तृतीय पुण्यस्मरण (२९.०८.२०१७) आई , बघता बघता तीन वर्षे झाली पण तुला जाऊन. करतोय प्रयत्न तुझ्याविना जगण्याचा आम्ही लोक ,तसं चाललं आहेच पुढे सर्वकाही भरधाव पण एक सल आहे मनात तू नसल्याची. पण आता काय करावे अश्या दोलायमान अवस्थेत भगवद गीतेचा जरा आधार वाटतो आहे. अर्थात अजून फक्त सुरुवात केलीय भगवद गीतेबद्दल कुतुहूल वाटल्याने अधिक माहिती मिळवण्याची तीही विस्कळीत स्वरूपात आहे,सातत्यपूर्ण नाही हवी तितकी पण आश्वासक नक्कीच आहे. तेव्हा बघतो मला (किंवा प्रत्येकाला ) कधीना कधी पडणाऱ्या काही गूढ- गहन  प्रश्नाची समाधानकारक उत्तरे  भगवद गीतेच्या साहाय्याने मिळविता येतात का ते ज्यात आत्मा आणि त्याच्या अमरत्वाबद्दल खालील उल्लेख आहे : भगवद गीता अध्याय २,श्लोक २२ वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि।तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही।। अर्थात जैसे जगत् में मनुष्य पुराने जीर्ण वस्त्रोंको त्याग कर अन्य नवीन वस्त्रोंको ग्रहण करते हैं, वैसे ही जीवात्मा पुराने शरीरोंको छोड़कर अन्यान्य नवीन शरीरोंको प्राप्त करता है. अभिप्राय यह कि (पुराने वस्त्रोंको छ...