Posts

Showing posts from August, 2019

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त आणि फक्त आठवणी . आई , ५ वर्षं झालीही तुला जाऊन,आणि आम्ही तरी कुठे थांबलोय? संसारचक्र सुरूच आहे आणि धावतोय आम्हीही जमेल तसं पण आई आता तू नाहीस, फक्त तुझा आश्वासक आवाज आहे अजूनही कानात घट्ट रुतलेला,आणि खूप साऱ्या आठवणी ज्या उलगडत असतात एकामागून एक कधी अचानक तर कधी प्रसंगानुरूप. हे आई! आमचं विनम्र अभिवादन स्वीकार जिथे कुठे असशील तिथे  !!

मुंबईला खऱ्या अर्थाने श्रीमंत करणाऱ्या नाना शंकरशेठ यांची कहाणी

Image
मुंबईने ज्यांना श्रीमंत केले असे लक्षावधी लोक आपल्याला भेटतील, पण आपल्या कर्तृत्त्वाने आणि दातृत्वाने ज्यांनी मुंबईला श्रीमंत केले असे अगदीच मोजके. नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ हे त्यातील अग्रगण्य नाव. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करत, नानांनी या मुंबईत चोख व्यापार केला. उदंड पैसे कमाविले आणि कमाविलेल्या या पैशाचे फक्त उंच इमले न बांधता त्यातून समाज घडविणाऱ्या संस्था उभ्या केल्या. नानांनी उभारलेल्या संस्था पाहिल्या की आजही आवाक् व्हायला होते. आज नानांच्या पुण्यतिथीनिमित्त, त्यांच्या या खऱ्याखुऱ्या श्रीमंतेचे मॉडेल समजून घेण्याचा केलेला हा प्रयत्न. नानांचा काळ (१८०३-१८६५) हा इंग्रजाविरुद्ध सुरू झालेल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या आधीचा काळ. मुंबई हे शहर म्हणून आकाराला येण्याचा हा कालावधी. समुद्री व्यापारामळे हे शहर घडत होते आणि रोजगाराची संधी शोधण्यासाठी लोक या शहरात येत होते. नानांचे कुटुंब या अशा मुंबईत येणाऱ्या लोकामधील अगदी सुरुवातीला आलेल्यामधले लोक म्हणायला हवे. नानांचे पूर्वज बाबूलशेठ मुरकुटे अठराव्या शतकात कोकणातून मुंबईत आले. मुंबईच्या आघाडीच्या व्यापाऱ्यांमध्ये त्यांची गणन...