वाचू आनंदे.. नवे नवे!
वाचू आनंदे.. नवे नवे! वाचन संस्कृती लयास चालली आहे अशी सार्वत्रिक बोंब आसमंतात असताना; आणि साठ-सत्तरच्या दशकांतली पुस्तकंच आजही वाचली जात असल्याचं म्हटलं जात असताना ‘लोकसत्ता’ने अलीकडच्या काळातील नव्या लेखकांची पुस्तकं वाचणारे नेमकं काय वाचतात, याचा वेध घ्यायचं ठरवलं. त्यासाठी साहित्यिक, प्रकाशक, नाटक- सिनेमातील कलाकार, शासन-प्रशासनकर्ते, अर्थविश्व अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांना त्यांनी गेल्या वर्षभरात वाचलेल्या पाच नव्या पुस्तकांची नावे कळवावयास सांगितली. त्यानुसार आजच्या नव्या दमाच्या लेखकांचं कोणतं साहित्य वाचलं जातं याचं सम्यक चित्र वाचकांसमोर उभं राहील. काहींना अजूनही जुन्यांचा ओढा आहेच. परंतु एकुणात नवं साहित्य, नवे लेखकही जोमाने लिहीत आहेत. त्यांचाही वाचकवर्ग आहे. नव्याचं भान आणि जाण त्यातून प्रगट होते. *प्राक्-सिनेमा : अरुण खोपकर * जवळीकीची सरोवरे : प्रज्ञावंत सखेसांगाती : नितीन वैद्य * काळ्या निळ्या रेषा : राजू बाविस्कर * चित्रसंहिता : मंगेश नारायणराव काळे * वारसा : मीना प्रभू * रामदास भटकळ * अमर फोटो स्टुडिओ : मनस्विनी लता रवींद्र * रानवस्ती : अनिल दामले * पु. शि. रे