वाचनानंद २०२५!
आजकाल खरं तर पुस्तकं वाचणारे वाचक तसे कमी होत आहेत हे मानायला वाव आहे. त्यातल्या त्यात आताशी ऑनलाईन पुस्तकं वाचण्याची सुविधा विविध माध्यम संस्थांनी कधी फुकट तर कधी वर्गणी (म्हणजे आपले सब्स्क्रिप्शन की हो! ) तत्वावर उपलब्ध करून दिल्यापासून कार्यमग्न (बीजी) लोकांना त्याचा बराचसा फायदा झाला आहे हे जरूर नमूद करावे लागेल.
आता यात कोण कुठल्या भाषेत , कोणत्या विषयावर कोणत्या वेळी वाचणे पसंत करतो हे ज्याचे त्याने ठरवावे. पण वाचावे काय हा मोठाच प्रश्न असतो बऱ्याचदा. पाश्चिमात्य साहित्यविश्वात तश्या खूपविक्या (बेस्ट सेलर्स ) पुस्तकांच्या याद्या नियमित प्रसिद्ध होत असतात त्याबरोबरच बुकर , नोबेल यासारख्या विविध पुरस्कारांसाठी नामाकिंत केल्या गेलेल्या साहित्यिकांची यादीही , काय वाचावे हा प्रश्न बऱ्यापैकी सोडवत असते .
आपल्या माय-मराठीसारख्या प्रादेशिक ( पण जागतिकीकरणाच्या रेट्यात वैश्विक होत चाललेल्या ) भाषेत नक्की काय वाचावे याचे उत्तर तितकेसे सोपे सरळ नक्कीच नाही. तेव्हा काही नामांकित माध्यम समूह त्या त्या वर्षात तत्कालीन मान्यवरांना आपण सध्या काय वाचत आहोत किंवा काय वाचणार आहोत याची एक यादी द्यायला सांगतात आणि त्यांची संकलित बृहद -यादी प्रसिध्द करतात. त्यातील आपणांस किती,कधी, कसे, वाचता येईल ते किमान ठरविण्यासाठी अशीच एक संकलित यादी खालील प्रमाणे :
अनुक्रमांक पुस्तकाचे आणि लेखकाचे नाव
1 ताओ ते चिंग- लाओ त्सू- भाषांतर : अवधूत डोंगरे
2 ठकीशी संवाद- सतीश आळेकर
3 काळ्यानिळ्या रेषा- राजू बाविस्कर
4 ओरहान पामुक… भाबडे आणि चिंतनशील कादंबरीकार- भाषांतर- चिन्मय धारुरकर, जान्हवी बिदनूर
5 विहिरीची मुलगी- ऐश्वर्या रेवडकर
6 खोल खोल दुष्काळ डोळे- प्रदीप कोकरे
7 मनसमझावन- संग्राम गायकवाड
8 एक पाय जमिनीवर- शांता गोखले (अनु. करुणा गोखले)
9 विहिरीची मुलगी- ऐश्वर्या रेवडकर
10 निळावंती : अ स्टोरी ऑफ द बुकहंटर- नितीन भरत वाघ
11 खोल खोल दुष्काळ डोळे- प्रदीप कोकरे
12 क्षुल्लकची ब्लॅक कॉमेडी – श्रीकांत बोजेवार
13 तिथे भेटूया मित्रा- संकेत म्हात्रे
14 नाही मानियले बहुमता- नंदा खरे
15 हरवलेल्या वस्तूंचं मिथक- प्रफुल्ल शिलेदार
16 अरुण कोलटकर- संपादक- प्रफुल्ल शिलेदार
17 कोलाज- उषा मेहता
18 परकीय हात- रवी आमले
19 तळ ढवळताना- नीरजा
20 कथासरिता- सुनील साळुंखे
21 लपलेले लंडन- अरविंद रे
22 मोहरम- हंसराज जाधव
23 भरताचे नाट्यशास्त्र- भाषांतर- सरोज देशपांडे
24 एक दोन चार अ- राकेश वानखेडे
25 रंगभास्कर- भास्कर चंदावरकर (ग्रंथसंकल्पना- अरुण खोपकर )
26 मोहरम- हंसराज जाधव
27 नांगरमुठी- पांडुरंग पाटील.
28 हलते डुलते झुमके- मनस्विनी लता रवींद्र
29 पिवळा पिवळा पाचोळा- अनिल साबळे
30 कुमार स्वर एक गंधर्व कथा- माधुरी पुरंदरे
31 वॉरन हेस्टिंगचा सांड, सचित्र आवृत्ती- उदय प्रकाश, अनुवाद- जयप्रकाश सावंत
32 हिट्स ऑफ नाइन्टी टू- पंकज भोसले
33 कनातीच्या मागे- श्यामल गरूड
34 एक पाय जमिनीवर- शांता गोखले, अनु- करुणा गोखले
35 (दु)र्वर्तनाचा वेध- सुबोध जावडेकर
36 वुहानचा वाफारा- विजय तांबे
37 काही आत्मिक, काही सामाजिक- सानिया
38 आंबेडकर : जीवन आणि वारसा- शशी थरूर – अनुवाद- अवधूत डोंगरे
39 शब ए बारात- विलास नाईक
40 श्वासपाने- राही अनिल बर्वे
41 कानविंदे हरवले- हृषीकेश गुप्ते
42 श्वासपाने- राही अनिल बर्वे
43 हिट्स ऑफ नाइन्टी टू- पंकज भोसले
44 वॉरन हेस्टिंग्जचा सांड- उदय प्रकाश, अनुवाद- जयप्रकाश सावंत
45 कानविंदे हरवले- हृषीकेश गुप्ते
46 नाही मानियले बहुमता : विवेकवादी चिंतन – नंदा खरे- संकलन / संपादन – विद्यागौरी खरे, मेघना भुस्कुटे, धनंजय मुळी, रविकांत पाटील
47 वाणी आणि लेखणी- दिलीप माजगावकर
48 पत्र आणि मैत्र- दिलीप माजगावकर
49 बाय गं- विद्या पोळ -जगताप
50 कुब्र- सत्यजीत वसंत पाटील
51 नव्वदीच्या आगेमागे- अमोल उदगीरकर, मेघना भुस्कुटे, आदूबाळ, मानसी होळेहोन्नूर
52 राज्यसंस्था, भांडवलशाही व पर्यावरणवाद- प्रा. राम बापट यांचे लेख- खंड २- डॉ. अशोक चौसाळकर
53 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्रे व नियतकालिकांतील लेखांचा अभ्यास- डॉ. प्रकाश बंद्रे
54 पैस पर्यावरणसंवादाचा (वैश्विक आवाका, भारतीय संदर्भ)- संतोष शिंत्रे
55 बदलता भारत- पारतंत्र्यातून महासत्तेकडे (खंड २)- संपादक- दत्ता देसाई
56 गुलामराजा- बबन मिंडे
57 एक पाय जमिनीवर- शांता गोखले, अनु. करुणा गोखले
58 मेड इन चायना- गिरीश कुबेर
59 अनुभव- बासु भट्टाचार्य- शब्दांकन- अशोक राणे
60 भारत जोडो यात्रा- एस. ए. जोशी
61 चंद्रशेखर- जसं जगलो तसं.. – अनुवाद- अंबरीश मिश्र
62 पुनर्भेट- विस्मृतीत गेलेल्या नाटकांशी : विजय तापस
63 कृतज्ञ मी, कृतार्थ मी- अ. पां. देशपांडे
64 लव्ह अँड रेव्होल्यूशन फ़ैज़ अहमद फ़ैज़ अधिकृत चरित्र- अली मदिह हाश्मी, अनुवाद- शेखर देशमुख
65 नाटय़मीमांसा- सतीश पावडे
66 दुभंगलेलं जीवन- अरुणा सबाने
67 हिल्लोळ हरवून आतबाहेरचा- प्रज्ञा दया पवार
68 मनसमझावन- संग्राम गायकवाड
69 ललद्यदस् ललबाय- मीनाक्षी पाटील
70 सीतायन- तारा भवाळकर
71 सृजनव्रती- श्री. पु. भागवत- संपादक- मोनिका गजेंद्रगडकर, विजय तापस
72 हे सांगायला हवं- मृदुला भाटकर
73 क्लोज एन्काउंटर्स- पुरुषोत्तम बेर्डे
74 गान गुणगान : एक सांगीतिक यात्रा- सत्यशील देशपांडे
75 कुमार स्वर एक गंधर्व कथा- माधुरी पुरंदरे, चित्र- चंद्रमोहन कुलकर्णी
76 टीव्ही मालिका आणि बरंच काही- मुग्धा गोडबोले रानडे
77 मनसमझावन- संग्राम गायकवाड
78 रुह- मानव कौल, अनुवाद : नीता कुलकर्णी
79 खोल खोल दुष्काळ डोळे- प्रदीप कोकरे
80 विषयांतर- चंद्रकांत खोत
81 वॉकिंग ऑन द एज- प्रसाद निक्ते
82 लैंगिकतेवर बोलू काही.. -निरंजन घाटे
83 परकीय हात- रवी आमले
84 अधले मधले दिवस- शेषराव मोहिते
85 पसायधन- विश्वाधर देशमुख
86 वसप- महादेव माने
87 सिंधू ते बुद्ध (अज्ञात इतिहासाचा शोध)- रवींद्र इंगळे चावरेकर
88 अलवरा डाकू- पुरुषोत्तम बेर्डे
89 चरथ भिक्खवे- डॉ. अमिताभ
90 ब्लाटेंटिया- बाळासाहेब लबडे
91 हिल्लोळ हरवून आतबाहेरचा- डॉ. प्रज्ञा दया पवार
92 टार्गेट असदशाह- वसंत वसंत लिमये
93 डायरी- प्रवीण बर्दापूरकर
94 वादळाचे किनारे- आनंद नाडकर्णी
95 सातपाटील कुलवृत्तान्त- रंगनाथ पठारे
96 संस्कृत आणि प्राकृत भाषा- माधव देशपांडे
97 सीता- अभिराम भडकमकर
98 इन्शाअल्लाह- अभिराम भडकमकर
99 एकला चलो रे- संजीव सबनीस
100 एक इझम निरागस- सुहासिनी मालदे
101 घातसूत्र- दीपक करंजीकर
102 गुरू विवेकी भला- अंजली जोशी
103 शब्द कल्पिताचे- न पाठवलेली पत्रे- संपादक- स्वानंद बेदरकर
104 दिडदा दिडदा- नमिता देवीदयाल, अनुवाद- अंबरीश मिश्र
105 वाणी आणि लेखणी- दिलीप माजगावकर
106 खुलूस- समीर गायकवाड
107 कवडसे- अनुजा संखे
108 अनादिसिद्धा- भूपाली निसळ
109 ओंजळीतील चाफा- स्वानंद मुकुंद कुलकर्णी
110 अभिरामप्रहर- भारती बिर्जे – डिग्गीकर
111 द लॉस्ट बॅलन्स- रामदास खरे
112 अर्नेस्ट हेमिंग्वे- विवेक गोविलकर
113 डोळे आणि दृष्टी- श्रीराम पचिंद्रे
114 कॉर्पोरेट आणि इतर कथा- सुनील गोडसे
115 भट्टी- अहमद शेख
116 रिंगाण- कृष्णात खोत
117 राजाधिराज कृष्णदेवराय- व्यंकटेश देवन पल्ली
118 गवतात उगवलेली अक्षरं- महावीर जोंधळे
119 रस्ता शोधताना- डॉ. भवान महाजन
120 महायोगिनी अक्क महादेवी- श्रुती वडगबाळकर
121 विवाह नाकारताना- विनया खडपेकर
122 ख्न प्रभा गणोरकर
123 नव्या वाटा शोधणारे कवी- सुधीर रसाळ
124 अनुनाद- अरुण खोपकर
125 पुस्तकनाद- जयप्रकाश सावंत
126 विहिरीची मुलगी- ऐश्वर्या रेवडकर
127 तर्किष्ट- संपादन- प्राजक्ता अतुल
128 काही आत्मिक, काही सामाजिक- सानिया
129 धर्मरेषा ओलांडताना- हीना कौसर खान
130 रुह- मानव कौल- अनुवाद- नीता कुलकर्णी
131 मंत्र- विनायक बंध्योपाध्याय- अनुवाद- सुमती जोशी
132 ऑफ मेनी हिरोज- गणेश देवी – अनुवाद -नितीन जरंडीकर
133 वाङ्मयीन युगान्तर आणि श्री. पु. भागवत- सुधीर रसाळ आणि वसंत पाटणकर
134 मोहरम- हंसराज जाधव
135 पिवळा पिवळा पाचोळा-अनिल साबळे
136 आरते ना परते- प्रवीण बांदेकर
137 चरथ भिक्खवे- डॉ. अभिताभ
138 काळ्यानिळ्या रेषा- राजू बाविस्कर
139 पासोडी- नितीन रिंढे
140 कलेची पुनर्घडण- टी. एम. कृष्णा, अनुवाद – शेखर देशमुख
141 सैयद हैदर रझा- यशोधरा डालमिया, अनुवाद- दीपक घारे
142 संवाद प्रसंग- निशिकांत ठकार
143 प्राक्-सिनेमा- अरुण खोपकर
144 हिल्लोळ हरवून आतबाहेरचा- प्रज्ञा दया पवार
145 रेघ- अवधूत डोंगरे
146 फैज अहमद फैज- अली मदिह हाश्मी, अनुवाद- शेखर देशमुख
147 महाराष्ट्र काही प्रश्न आणि आंदोलने, संपादक- मेघा पानसरे, नंदकुमार मोरे
148 गंधर्वांचे देणे- पं. कुमारजींशी संवाद- संपादक: अतुल देऊळगावकर
149 सलोख्याच्या गोष्टी- अमृता खंडेराव
150 आठवणी व संस्मरणे : जनाक्का शिंदे- संपादक- रणधीर शिंदे
151 भैय्या एक्सप्रेस आणि इतर कथा-अनुवाद: जयप्रकाश सावंत
152 हलते डुलते झुमके- मनस्विनी लता रवींद्र
153 सीतायन- डॉ. तारा भवाळकर
154 दुर्वर्तनाचा वेध- सुबोध जावडेकर
155 जे आले ते रमले- सुनीत पोतनीस
156 राहुल बनसोडे लेख संग्रह- राहुल बनसोडे
157 सरदार वल्लभभाई पटेल- बलराज कृष्णा, भाषांतर- भगवान दातार
158 सीतायन- तारा भवाळकर
159 हिराबाई बडोदेकर- गानकलेतील तार षड्ज- डॉ. शुभदा कुलकर्णी
160 कुमारस्वर एक गंधर्व कथा- माधुरी पुरंदरे
161 परकीय हात : विदेशी हेरसंस्थांच्या भारतातील कारवाया आणि कारस्थाने- रवी आमले
162 भटकभवानी- समीना दलवाई
163 थिजलेल्या काळाचे अवशेष- नीरजा
164 एक भाकर तीन चुली- देवा झिंजाड
165 विहिरीची मुलगी- ऐश्वर्या रेवडकर
166 कथा जुनी तशी नवी- तारा भवाळकर
167 डायरेक्टर्स- दीपा देशमुख
168 सीतायन- तारा भवाळकर
169 माणूस असा का वागतो?- अंजली चिकलपट्टी
170 मराठी स्त्री आत्मकथनाची वाटचाल- संपा. डॉ. प्रतिभा कणेकर, छाया राजे
171 इत्तर गोष्टी- प्रसाद कुमठेकर
172 आपले विश्व आणि त्याची नवलकथा- सुकल्प कारंजेकर
173 तुम्हारी औकात क्या है- पीयूष मिश्रा- अनुवाद- नीता कुलकर्णी
174 सत्य, सत्ता आणि साहित्य- जयंत पवार, संपादक- नितीन रिंढे, प्रफुल्ल शिलेदार
175 नव्या वाटा शोधणारे कवी- सुधीर रसाळ
176 चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे- चंद्रकांत कुलकर्णी
177 कनातीच्या मागे- श्यामल गरुड
178 ऐसपैस गप्पा नीलमताईंशी- करुणा गोखले.
179 एका मासिकाचा उदयास्त- भानू काळे.
180 लाइट डायरीज… खुलूस- समीर गायकवाड
181 अनुभवाचिया वाटा- डॉ. नरेंद्र पाठक
182 तीव्र कोमल समीक्षेचे प्रकरण- डॉ. राजेंद्र सलालकर
183 शब्दप्रभू मोल्सवर्थ – संपादन- अरुण नेरुरकर
184 रंगनिरंग- प्रेमानंद गज्वी
185 हिरवी पोर्ट्रेट्स- पुरुषोत्तम बेर्डे
186 नीलमवेळ- भारती बिर्जे डिग्गीकर
187 गळ्यावरचा निळा डाग- सुनंदा भोसेकर
188 अरुण कोलटकर- संपादक- प्रफुल्ल शिलेदार
189 येथे बहुतांचे हित- मिलिंद बोकील
190 गंधर्वांचे देणे- संपादन : अतुल देऊळगावकर
191 ‘बेगमपुरा’च्या शोधात – गेल ऑम्वेट, अनुवाद- प्रमोद मुजुमदार
192 सोलोकोरस : शिकल्या अब्दुल्याची स्वगतं- साहिल कबीर
193 मायावीये तहरीर- मंगेश नारायणराव काळे
194 देशोधडी : आडं, मेडी, बारा खुट्याची- नारायण भोसले
195 हरवलेल्या वस्तूचं मिथक- प्रफुल्ल शिलेदार
196 अपरंपारावरच्या कविता- रवींद्र लाखे
197 भारतीय धर्म संगीत- केशवचैतन्य कुंटे
198 कलानुभव आणि कला विचार- श्यामला वनारसे
199 सारीपाट- माधव सावरगांवकर
200 निळे आकाश हिरवी धरती- मिलिंद बोकील
201 रेड लाइट डायरीज… खुलूस- समीर गायकवाड
202 ताओ ते चिंग- लिओ त्सू- अनु. अवधूत डोंगरे
203 कानविंदे हरवले- हृषीकेश गुप्ते
204 खुल जा सिम सिम- चं. प्र. देशपांडे
205 श्वासपाने- राही बर्वे
206 भटकंती- हरमान हेसे- अनुवाद- हेमकिरण पत्की
207 तत्त्वभान- श्रीनिवास हेमाडे
208 वीस प्रश्न- संकल्पना आणि संकलन- महेश एलकुंचवार
209 भुरा- शरद बाविस्कर
210 अर्थाच्या शोधात- विजया बापट
211 समुद्राकाठचे एक वर्ष- अरुंधती चितळे?
212 रारंगढांग- प्रभाकर पेंढारकर
213 मी माझ्या डायरीतून- आसावरी काकडे
214 पैस प्रतिभेचा- दीपाली दातार
215 प्रेमातून प्रेमाकडे- अरुणा ढेरे
216 त्रिकाल- फ. मुं. शिंदे
217 धारानृत्यसंमोहन- जीवन पिंपळवाडकर
218 तल्खली- माया पंडित
219 वसप- महादेव माने
220 निळावंती : अ स्टोरी ऑफ द बुकहंटर- नितीन भरत वाघ
221 कुब्र- सत्यजीत पाटील
222 काळजाचा नितळ तळ- भीमराव धुळूबुळू
223 चालू इसवीसनाचे चिरदाह- हनुमान व्हरगुळे
224 निरंतर अधांतर- प्रमोद मनोहर कोपर्डे
225 या जीवनाचे काय करू?… आणि निवडक- डॉ. अभय बंग
226 आता वह्या सगळ्या बुडीत खाती- अनुराधा पाटील
227 सुलोचनेच्या पाऊलखुणा- ना. धों. महानोर
228 उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता- मीनाक्षी पाटील
229 कासरा- ऐश्वर्य पाटेकर
230 अधर्मयुद्ध- गिरीश कुबेर
231 एका दिशेचा शोध – संदीप वासलेकर
232 सातपाटील कुलवृत्तांत- रंगनाथ पठारे
233 अनर्थ -अच्युत गोडबोले
234 घातसूत्र- दीपक करंजीकर
235 गणिका महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण- मनु एस पिल्लई- अनुवाद – सविता दामले
236 नदिष्ट- मनोज बोरगावकर
237 विश्वामित्र सिंड्रोम- पंकज भोसले
238 काळे करडे स्ट्रोक्स – प्रणव सखदेव
239 सातपाटील कुलवृत्तांत- रंगनाथ पठारे
240 वाळसरा- आसाराम लोमटे
241 दस्तावेज- आनंद विंगकर
242 मुडकं कुंपण- रवींद्र पांढरे
243 वाचन प्रसंग- नितीन वैद्या
244 विहिरीची मुलगी- ऐश्वर्या रेवडकर
245 महामाया – डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. तारा भवाळकर
246 आठवणी व संस्मरणे : जनाक्का शिंदे- संपादन- डॉ. रणधीर शिंदे
247 अ गांधी व्हर्सेस गब्बर- गोपाळ सरक
248 सत्ताबदल: राष्ट्रीय चक्रव्यूहाचा भेद- दत्ता देसाई
249 तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी- सर्वंकष आकलन- लेखक-संपादक- सुनीलकुमार लवटे
250 सीतायन- तारा भवाळकर
251 काळजुगारी- हृषीकेश गुप्ते
252 नाही मानियले बहुमतां- नंदा खरे
253 माणूस असा का वागतो- अंजली चिकटपट्टी
254 खुलूस-समीर गायकवाड
255 बनगरवाडी- व्यंकटेश माडगूळकर (नवी आवृत्ती)
256 ओस निळा एकांत- जी. के. ऐनापुरे
257 बाभळी कॉलिंग- नीलेश महिगावकर
258 गोष्टी सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे गाव- विजय पाडळकर
259 फुलेल तेव्हा बघू- विनोदकुमार शुक्ल- निशिकांत ठकार
260 भाबडे आणि चिंतनशील कादंबरीकार- ओरहान पामुक- भाषांतर- चिन्मय धारुरकर, जान्हवी बिदनूर
261 दृश्यकला- संपादक- गुलाम महम्मद शेख, सहसंपादक- शिरीष पंचाल, अनुवाद- अरुणा जोशी
262 डोंगरवाटा- शेखर राजेशिर्के
263 काळजुगारी- हृषीकेश गुप्ते
264 मऱ्हाटी स्त्री-रचित रामकथा. मूळ संग्राहक- ना. गो. नांदापूरकर
265 अन्न हे अपूर्णब्रह्म- शाहू पाटोळे
266 चार चपटे मासे- विवेक कुडू
267 गॉगल लावलेला घोडा- निखिलेश चित्रे
268 का. प्रियोळकर लेखसंग्रह- संपादन- नितीन रिंढे
269 वसंत आबाजी डहाके… निवडक कविता- संपादक- प्रभा गणोरकर
270 मायना- राजीव नाईक
271 यशवंत मनोहर
272 महात्मा फुले विचारधारा आणि मराठी साहित्य- संपादक- वंदना महाजन, अनिल सपकाळ
273 डॉ. बाबासाहेब आंबेडकर- निवडक वाङ्मय, खंड १, संपादक- दीपक चांदणे, अस्मिता चांदणे
274 कवितावकाश- दा. गो. काळे
275 उत्तर आधुनिकता… समकालीन साहित्य, समाज व संस्कृती- बी. रंगराव
276 उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता- मीनाक्षी पाटील
277 अब्बूंचे मोदक- फारूक एस. काझी
278 हिल्लोळ हरवून आतबाहेरचा- प्रज्ञा दया पवार
279 लव्ह अँड रेव्होल्यूशन फैज़ अहमद फैज़ अधिकृत चरित्र- अली मदिह हाश्मी, अनुवाद- शेखर देशमुख
280 आरशात ऐकू येणारं प्रेम- फेलिक्स डिसोझा
281 मिथक मांजर- इग्नेशियस डायस
282 खिडकीचा आरसा- अवधूत डोंगरे
283 शिकता शिकवता- नीलेश निमकर
284 गुरू विवेकी भला- अंजली जोशी
285 वाचन प्रसंग- नितीन वैद्या
286 निळावंती : अ स्टोरी ऑफ द बुक हंटर- नितीन भरत वाघ
287 काही आत्मिक, काही सामाजिक-सानिया
288 घातसूत्र- दीपक करंजीकर
289 रेनेसॉन्स स्टेट- गिरीश कुबेर, अनु. प्रथमेश पाटील
290 लेट मी से इट नाऊ- राकेश मारीया- अनु. सुवर्णा अभ्यंकर
291 कर्झनकाळ- जयराज साळगावकर
292 राम राम देवा- संपादन- डॉ. सागर देशपांडे
293 अटलजी- सारंग दर्शने
294 रासपुतीन ते पुतीन- पंकज कालुवाला
295 नर्मदा परिक्रमा- एक अंतर्यात्रा- भारती ठाकूर
296 मनसमझावन – संग्राम गायकवाड
297 अधर्मयुद्ध- गिरीश कुबेर
298 अद्वितीय युगप्रवर्तक संत तुकाराम (खंड १ व २)- डॉ. देवीदास पोटे
299 सातपाटील कुलवृत्तान्त- रंगनाथ पाठारे
300 तुघलक- गिरीश कर्नाड
301 टाटायन- गिरीश कुबेर
302 अर्थाच्या शोधात- व्हक्टर फ्रॅन्कल, अनु. डॉ. विजया बापट
303 माझा देश माझी माणसं- दलाई लामा, अनु. सुरूचि पांडे
304 आरोग्य सेवेतील डिजिटल आणि एआय क्रांती – डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. दीपक शिकारपूर
305 मॅन्स सर्च फॉर मिनिंग- व्हिक्टर फॅन्कले (मराठी अनुवाद)
306 करेज टू बी डिस्लाइक्ड- इचिरो किशिमि आणि फुमिटाके कोगा, अनु. नीलम भट्ट
307 व्यक्ती आणि व्याप्ती- विनय हर्डीकर
308 वंश अनुवंश- डॉ. हेमा पुरंदरे, शब्दांकन- उज्ज्वला गोखले
309 अशीही एक झुंज- मृदुला बेळे
310 झिम्मा- विजया मेहता,
311 ऱ्हासचक्र- डॉ. अरुण गद्रे
312 आधुनिक वैद्याकीची शोधगाथा- शंतनु अभ्यंकर
313 मेड इन चायना- गिरीश कुबेर
314 शब्द कल्पिताचे… न पाठवलेली पत्रे- संपादक- स्वानंद बेदरकर
315 निळे आकाश हिरवी धरती- मिलिंद बोकील
316 रफ स्केचेस- सुभाष अवचट
317 सप्तसूर माझे- अशोक पत्की
318 ताई- (पद्मभूषण सुमित्राताई महाजन, पूर्व लोकसभा अध्यक्षपदाच्या कारकीर्दीचा बहुपदरी आलेख)- मेधा किरीट,
319 नासिक डायरी- रमेश पडवळ
320 पुस्तकांच्या सहवासात- अॅड. मिलिंद चिंधडे
321 तेल नावाचं वर्तमान- गिरीश कुबेर
322 नात्यांचे सव्र्हिसिंग- विश्वास जयदेव ठाकूर
323 बॅरिस्टर नाथ पै- आदिती पै- अनु. अनंत घोटगाळकर
324 गांधी.. प्रथम त्यांस पाहता- संपादन- थॉमस वेबर- अनु. सुजाता गोडबोले
325 स्मरणस्वर- आनंद मोडक
326 आवर्तन- पं. सुरेश तळवलकर
327 नादवेध- सुलभा पिशवीकर, अच्युत गोडबोले
328 मंतरलेले दिवस- ग. दी. माडगूळकर
329 असा बालगंधर्व – अभिराम भडकमकर
330 रेघ- अवधूत डोंगरे
331 गाईच्या नावानं चांगभलं- श्रुती गणपत्ये
332 सातमायकथा- हृषीकेश पाळंदे
333 दुरेघी- चंद्रकांत खोत
334 पोलादी बाया- दीपा पवार
335 संभ्रमाची गोष्ट- पी. विठ्ठल
336 वसप- महादेव माने
337 सीतायन- तारा भवाळकर
338 दौशाड- नंदकुमार राऊत
339 मनसमझावन- संग्राम गायकवाड
340 दस्तऐवज- आनंद विंगकर
341 स्थलांतरितांचे विश्व- संजीवनी खेर
342 बहिर्जी- ईश्वर आगम
343 खंडोबा- नितीन थोरात
344 हिंदू संस्कृतीतील स्त्री- आ. ह. साळुंखे
345 व्यक्तिवेध- डॉ जयसिंगराव पवार
346 वर्दीतल्या माणसाच्या नोंदी- सदानंद दाते
347 कालकल्लोळ- अरूण खोपकर
348 मजबुती का नाम महात्मा गांधी- चंद्रकांत झटाले
349 गोष्ट पैशापाण्याची- प्रफुल्ल वानखेडे
350 आर्टिफिशिअल इंटिलिजन्स – अच्युत गोडबोले
351 डियर तुकोबा- विनायक होगाडे
352 सोलो कोरस- साहिल कबीर
353 राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान- सरफराज अहमद
354 शब्दांच्या पसाऱ्यातील अर्थांच्या आत्महत्या- सुनीता झाडे
355 ओल हरवलेली माती- नीरजा
356 भटक भवानी- समीना दलवाई
357 सत्तेच्या पडछायेत- राम खांडेकर
358 नदिष्ट- मनोज बोरगावकर
359 तुरुंगरंग: अॅड. रवींद्रनाथ पाटील
360 सिनेमा पाहिलेला माणूस- अशोक राणे
Comments
Post a Comment