Interesting...मानवी हातावर दिसणाऱ्या रेषा व इतर चिन्हे माकडाच्या हातावरपण??

मानवासारखा दिसणारा एक प्राणी म्हणजे माकड. या माकडापासूनच मानवाची उत्पत्ती झाली, असे उत्क्रांतीवाद मानतो. माकड आणि मानव हे पुष्कळ अंशी साम्य असलेले दोन प्राणी आहेत यात शंका नाही. परंतु या दोघांमध्ये फरक म्हणजे मानवाला शेपूट नाही आणि वानराला शेपूट आहे. दुसरा फरक म्हणजे मानवाला दोन पाय आहेत आणि या दोन पायांवरच माणूस चालतो तर माकड चार पायांवर चालते. याचाच अर्थ माकडाला हात नसून चार पायच आहेत. परंतु पुष्कळ वेळा असे बघितले गेले आहे की, माकड आपल्या पुढील दोन पायांचा मानवाप्रमाणेच उपयोग करून घेऊ शकते. म्हणून त्यांच्या पुढील दोन पायांना हस्तसामुद्रिकाच्या दृष्टिकोनातून हात म्हणावयास हरकत नाही. कारण पुढील दोन पाय जवळजवळ मानवाच्या हातासारखेच असतात. मानवी हातावर दिसणाऱ्या रेषा व इतर चिन्हे माकडाच्या हातावरपण सापडत असावीत का, असा विचार मनात आल्यामुळे हस्तसामुद्रिक अश्विन रेळे यांनी माकडांच्या हातांचा अभ्यास करण्याचे ठरविले. ही कल्पना डोक्यात आल्यानंतर अर्थातच त्यांनी जिजामाता उद्यान गाठले. संबंधित अधिकाऱ्याला ही कल्पना सांगितली आणि माकडांच्या हाताचे (?) ठसे मिळवून देण्याची विनंती केली. पहिल्यांदा या सूचनेकडे दुर्लक्षच केले गेले. पण तरीही रेळे सातत्याने या कल्पनेचा पाठपुरावा करीत राहिले. त्यामुळे जिजामाता उद्यानातील अधिकाऱ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आणि मग मात्र त्यांनी रेळेंना मदत केली. त्यांना हवे होते तसे माकडांच्या हातांचे ठसे मिळवून दिले. या ठशांचा अभ्यास करतांना काही आश्चर्यजनक हस्तसामुद्रिकशास्त्राच्या दृष्टीने भविष्यकथन करता येण्याजोगे रेषांचे व चिन्हांचे प्रकार त्यांना आढळून आले. अगदी प्रवासरेषा, मस्तकरेषा, अंत:करणरेषा,
 
व्यापार रेषा, माकडांच्या हातावर दिसल्या तेव्हा त्यांना अधिकच हुरूप आला . आपले संशोधन योग्य मार्गावर आहे, याची खात्री पटली, तेव्हा त्यांनी सर्कशीतील, जंगलातील तसेच मदाऱ्याकडील माकडांचाही अभ्यास केला. यातून अनेक उत्कंठापूर्ण निरीक्षणे त्यांच्या लक्षात आली. याच निष्कर्षांवर आधारीत हा लेख.
मानवी उत्क्रांतीचा जनक चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांतीवादाला या वर्षी १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानेच हा लेख लिहावासा वाटतो. ज्या वेळी डार्विन यांनी सर्वप्रथम हा सिद्धांत मांडला त्या वेळी त्यांना समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. परंतु आता त्यांचाच उत्क्रांतीवाद सर्वमान्य आहे आणि त्याचाच अभ्यास शालेय विद्यार्थ्यांपासून ते अनेक संशोधक करत आहेत.
मानवासारखा दिसणारा एक प्राणी म्हणजे माकड आणि त्या माकडापासूनच मानवाची उत्पत्ती झाली. रामायण काळी वानर जातीचे माकड रामाच्या सैन्यात होते व ते मानवाइतकेच किंवा मानवापेक्षाही जास्त क्षमतेने काम करू शकत असे. तसे पाहावयास गेले तर माकडाच्या अनेक जाती आहेत. यापैकी वानर, हुप्या, चिंपांझी, गोरीला, बबून, ओरांग उटान याशिवाय इतर अनेक जातीची माकडे या पृथ्वीतलावर आहेत. हिंदू धर्मात तर हनुमानरूपी वानर जातीचे दैवत पुजीले जाते. त्यांचे एक राज्य दक्षिण हिंदुस्थानात होते, असे रामायण सांगते. एकंदरीत माकड आणि मानव हे जवळजवळ पुष्कळ अंशी साम्य असलेले दोन प्राणी आहेत यात शंका नाही. परंतु या दोघांमध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे मानवाला शेपूट नाही आणि वानराला शेपूट आहे. दुसरा फरक म्हणजे मानवाला दोन पाय आहेत आणि या दोन पायांवरच मानव चालतो तर माकड चार पायांवर चालते. याचाच अर्थ माकडाला हात नसून चार पायच आहेत. परंतु पुष्कळ वेळा असे बघितले गेले आहे की, माकड आपल्या पुढील दोन पायांचा मानवाप्रमाणेच उपयोग करून घेऊ शकते. म्हणून त्यांच्या पुढील दोन पायांना हस्तसामुद्रिकाच्या दृष्टिकोनातून हात म्हणावयास हरकत नाही. कारण पुढील दोन पाय जवळजवळ मानवाच्या हातासारखेच असतात. मानवी हातावर दिसणाऱ्या रेषा व इतर चिन्हे माकडाच्या हातावरपण सापडतात, असा विचार मनात आल्यामुळे मी माकडांच्या हातांचा अभ्यास करण्याचे ठरविले. माकडाचे हात पाहत असताना काही आश्चर्यजनक हस्तसामुद्रिकशास्त्राच्या दृष्टीने भविष्यकथन करता येण्याजोगे रेषांचे व चिन्हांचे प्रकार आढळून आले.

सर्वप्रथम माणसाच्या आणि माकडाच्या हातांच्या आकारांचा विचार करू. वरवर पाहिले तर दोघांचेही दोन्ही हात जवळजवळ सारखेच वाटतात. परंतु बारकाईने पाहिले असता माकडाच्या हाताच्या पाश्र्वभागावर पुष्कळ केस असतात. त्या प्रमाणात माणसाच्या हातावर क्वचितच आढळतात. माकडाचा अंगठा मानवाच्या अंगठय़ापेक्षा फारच लहान असतो. परंतु इतर चारही बोटे मात्र मानवासारखीच असतात. माकडाच्या अंगठय़ाचे पहिले पेर खुंटीच्या आकारासारखे असते व आतल्या बाजूला वाकलेले असते. कदाचित झाडावर, फांद्यावर त्याला आपल्या हाताची पकड चांगली करता यावी म्हणून परमेश्वराने ही व्यवस्था केलेली असावी. परंतु हस्तसामुद्रिकदृष्टय़ा पाहिले, खुंटीच्या आकाराचा अंगठा माकडाची तापट वृत्ती दर्शवतो. एखादी वस्तू फेकून मारणे, सैरावैरा पळणे, चीडखोरपणा इत्यादी माकडाच्या खास स्वभावाचा अंगठय़ाचा हा आकार निदर्शक आहे. माकडाच्या आणि माणसाच्या हाताच्या तळव्यांना तुलनात्मकरीत्या पाहिले असता, माणसाच्या हातावरील पर्वत त्याच्या बोटाच्या पायथ्याशी असतात, तर माकडाचे हाताचे पर्वत त्यांच्या दोन बोटांमध्ये एक याप्रमाणे असते. कारण त्या पर्वतांचा अ‍ॅपेक्सपण दोन बोटांमध्येच असतो व पर्वतावर चर्मरेषांचे जाळे असते. मानवाच्या हातावरील आयुष्यरेषा, मस्तकरेषा आणि अंत:करणरेषा या वेगळ्या असतात. परंतु माकडाच्या हातावर अंत:करणरेषा व मस्तकरेषा ही एक झालेली असते की जिला हस्तसामुद्रिकशास्त्रामध्ये सिमियन रेषा म्हणतात. माकडाच्या हातावर असलेल्या पर्वतांपैकी बहुतेक सर्व माकडांच्या हातावर चंद्रपर्वतावर अर्धचंद्र आकार अशी उत्तम प्रवास रेषा असते. कारण प्रवास करणे हे माकडांच्या स्वभावातच असते. एका जागी स्थिर राहणे त्याला शक्य होत नाही. लांब लांब उडय़ा मारीत थोडय़ाच वेळात तो बराच लांबचा पल्ला गाठू शकतो. मानवाच्या हातावर ज्यांना आयुष्यात भरपूर प्रवास करण्याची संधी मिळते अशांच्याच हातावर प्रवासरेषा असते. माकडाच्या हातावर रविरेषा अत्यंत उत्कृष्ट असते. ती मस्तकरेषेच्या पुढे गेलेली असते. रविरेषा ही प्रसिद्धी देणारी रेषा असल्यामुळे सर्व प्राण्यांमध्ये माकड हा प्राणी मानवात जास्त प्रसिद्ध आहे. संशोधक ज्या वेळी एखाद्या प्रकारचे संशोधन करतात त्यावेळी त्याचे प्रयोग सर्वप्रथम माकडावरच केले जातात व त्या प्रयोगात निर्माण होणाऱ्या एखाद्या औषधाचा वा वस्तूचा मानवी जीवनाला जर धोका आहे असे आढळून आले तर ती वस्तू वा औषध मानवी समाजात उपयोगात आणले जात नाही. कारण माणसाची आणि माकडाची आतील शरीररचना बरीचशी साम्य असलेली आहे.
माकडाच्या हातावर आणखी एक वैशिष्टय़पूर्ण रेषा म्हणजे व्यापार रेषा. ही रेषा फक्त मानवी व्यापाऱ्यांच्याच हातावर सापडते. त्याचप्रमाणे सिनेमा, सर्कस आणि मदारी (माकडाचे खेळ करणारे) यांच्याकडे काम करणाऱ्या माकडांच्या हातावर व्यापार रेषा आढळते व अशी माकडे त्यांच्या मालकांना उत्तम पैसा मिळवून देतात.
माकडांच्या पहिल्या आणि दुसऱ्या मंगळ आणि त्याचप्रमाणे चंद्र आणि शुक्र पर्वतावर चर्मरेषांचे जाळे असते. त्यामुळे त्यांच्या स्वभावातच प्रत्येक बाबतीत अतिरेकीपणा दिसून येतो व तो सतत राहतो. तसे सर्वच माणसांच्या हातावर नसते. त्यामुळे माणसांचे स्वभाव विविध प्रकारचे असतात.
माझ्या अभ्यासात माकडाच्या हातावर वरीलप्रमाणे गोष्टी आढळून आल्या. जसजसे माकडांच्या निरनिराळ्या जातींच्या हातांचे अभ्यास करण्याची संधी मिळेल तसतशी आणखी काही वैशिष्टय़े आढळून येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने मी प्रयत्नात आहे. इतर हस्तसामुद्रिकांनीपण या दृष्टिकोनातून अभ्यास करावा.
ल्ल अश्विन रेळे
२१६/ए, भालचंद्र भुवन,
सर भालचंद्र रोड, रुईया महाविद्यालयामागे,
माटुंगा (पू.), मुंबई- ४०००१९
भ्रमणध्वनी- ९८६९४४१६८९
वेबसाईट- www.ashwinrele.com
ईमेल- askme@ashwinrele.com

Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण