आई नावाचे विद्यापीठ
आई नावाचे विद्यापीठ श्री गणेश चतुर्थी -२९/०८/२०१४ ,शुक्रवार बहुधा कोणी तरी अत्यंत समर्पक रित्या म्हटलेले आहे कि व्यक्तीची खरी किंमत ती गेल्यावरच कळते. दर वर्षीप्रमाणे गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग उत्साहात सांग्र -संगीत सुरु होती.सकाळी गणेश स्थापना ,पूजा विधी यथा सांग पार पाडून झाल्यावर संध्याकाळी ८. १५ वाजता घरून फोन आला आणि ........ आणि फोनवरचा निरोप ऐकून आभाळ कोसळणे काय असू शकते याचा अंदाज देणारी अत्यंत वेदनादायक बातमी कळाली ती आई गेल्याची. क्षणभर आपल्याला कोणीतरी चुकून फोन केला किंवा आपल्या ऐकण्यात काही तरी गल्लत झाली असे वाटले पण त्यानंतर फोन येत राहिले आणि आणि................ काय पुढचे फार काही आठवत नाही पण १५ मिनिटाच्या आत पुण्याहून गावी/ घरी जाण्याची तयारी करून निघालोसुद्धा घराबाहेर सहकुटुंब. मिळेल त्या वाहनाने कसा-बसा पोहोचलो गावातल्या घरी.तेव्हा मात्र आतापर्यंत दाबून धरलेल्या भावना अनावर होऊन मुक्तपणे रडलो ,आजूबाजूलाही सर्व जण त्याच मनस्थितीत असल्याने काही बोलवेना पण कुणाशी. आम्ही पाचपैकी चार भावंडे आणि आमचे वडील-अण्णा यांच्या बरोबरच ...