अवकाळी गारपिटीचे चक्रव्यूह भेदताना...
हल्ली ऋतुचक्र पार आकलनापलीकडे गेलेय अगदी व्हाट्स-अपवर अलीकडेच फिरत असलेल्या एका विनोदाप्रमाणे पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा, या तीन मुख्य ऋतूंपेक्षा आता हिवसाळा, पावन्हाळा आणि ऊन्हसाळा हेच मुख्य ऋतू म्हणावे असेच काहीसे झाले की काय याची भीतीदायक शंका वाटत राहावी अशी परिस्थिती झालीय. मागच्या काही वर्षात येत असलेल्या अवकाळी पाऊस,गारपीट या नैसर्गिक आपत्ती जणू काही आता नियमितपणे किंवा कायम स्वरूपी येत आहेत की काय ? हा एक मोठा प्रश्न आज भारत खंडच नाही तर समस्त जगासमोर उभा ठाकला आहे. आत्ता जो प्रश्नच नीट कळला नाही त्याचे उत्तर तरी काय आणि कसे देणार ?? साधारणत: एक वर्षापूर्वी "साप्ताहिक सकाळ" मध्ये किरणकुमार जोहरे यांचा " अवकाळी गारपिटीचे चक्रव्यूह भेदताना..." शीर्षकाचा एक लेख प्रकाशित झाला होता (तो खालीलप्रमाणे) जो आजही अगदी तंतोतंत लागू पडावा हा दुर्दैवी योगायोग आणि आपण आणि आपले सरकार निगरगट्टपणे अगदी काही झालेच नाही या अविर्भावात; वर्तमानपत्राच्या मागच्या पानावरून पुढे जावे इतक्या सहजतेने मागच्या वर...