Posts

Showing posts from April, 2016

राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज यांना १०७व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Image
ग्रामगीताकार  राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज यांना  १०७व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन महाराजांचा "ग्रामगीता" हा अत्यंत सुबोध आणि रसाळ भाषेत लिहिलेला मराठीमधील अमोल ठेवा असलेला ग्रंथ ज्यात महाराजांनी मांडलेले विचार आजच्या काळात आचरणात आणण्याची नितांत आवश्यकता आहे. आजच्या कुठल्याही प्रसार माध्यमात त्यांच्या जयंतीचा किंवा त्यांनी ज्यासाठी जीवन समर्पित केले त्या विचारांचा कुठेही उल्लेख नाही यापेक्षा मन खिन्न करणारी गोष्ट ती अजून काय असेल ? असो आजच्या चटपटीत Breaking  News च्या  काळात याचे बातमी मुल्य शून्यच असेल बहुधा पण त्यामुळे नुकसान ते आपलेच , तेव्हा वेळ मिळेल तसा ग्रामगीता वाचूया आणि त्यामधील विचारांचे शक्य होईल तेवढे पालन करूया.   राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामगीतेतील अडतिसाव्या "ग्राम कुटुंब "अध्यायातील काही श्लोकरूपी सारांश जो नक्कीच आजच्या दुष्काळी परिस्थितीत मार्गदर्शक ठरू शकतो :                                         ...

दर्यातला वाघ..डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर

Image
सिंधुदुर्ग किल्ल्याला साडेतीनशे वष्रे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या किल्ल्याचे बांधणीकौशल्य आणि त्यामागची शिवाजीमहाराजांची दूरदृष्टी विशद करणारा लेख.  ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलाच्या पंचविसाव्या अध्यायात एक ऋचा आहे. शुन:श्येपाने केलेलं ते वरुणाचं स्तवन आहे. त्यात म्हटलं आहे- ‘ हे वरुणदेवा! तुला तर आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांचे मार्ग ठाऊक आहेत अन् तुला सागरात संचार करणाऱ्या नौकांचे मार्गही ज्ञात आहेत. ’ अशी आवाहने उषेला केली आहेत. अग्नीला केली आहेत. वेदकाळात समुद्रप्रवास , त्यातून होणारा व्यापार , त्यासाठी असणारी नौकांची गरज अशा साऱ्यांचीच जाण तत्कालीन समाजाला होती , हे यातून अधोरेखित होतं. जलाची , जलसंपत्तीची ही ओढ पुढील काळात अजूनच दृढ झालेली आपल्याला दिसते. वेद हे अपौरुषेय , मौखिक पद्धतीने आपल्यापर्यंत आले असे मानण्याची परंपरा आहे. हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासात प्रारंभिक लिखित साधनांचा मान बौद्धांकडे जातो. त्यांचे निकाय अन् जातकांमध्ये समुद्राचे , समुद्र पर्यटनांचे उल्लेख आहेत. सागर पर्यटनासाठी निघालेल्या पूर्ण नामक एका व्यापारीपुत्राची कथा असलेल्या शूर्पारक जातकामध्ये सोपाऱ्...

इस्रायलमधील दुष्काळ आणि पाणीबाणी-– अनय जोगळेकर

Image
हा लेख इस्रायलबद्दल आहे पण ठिबक सिंचनाबद्दल नाही. कारण ठिबक सिंचनाचा शोध लावून आणि ऊस , कापूस ते धानापर्यंत पाणी खेचणाऱ्या पिकांसाठीही ठिबकने कशा प्रकारे पाणी पुरवठा करता येतो हे जगाला दाखवून दिल्यानंतरही इस्रायलमध्ये पाणीबाणी निर्माण झाली होती. इस्रायलमध्ये मोठ्या नद्या नाहीत. पर्जन्यमान वर्षाला ५० सेमी आणि देशाचा ५०%हून अधिक असलेल्या वाळवंटी भागात ते ५ सेमीहून कमी , सुपीक जमिनीचा अभाव इ. गोष्टी आता महाराष्ट्रातील बऱ्याच जणांना माहिती झाल्या आहेत , त्यामुळे त्याचे चऱ्हाट लावण्याचे काही कारण नाही. पण असे असूनही इस्रायलमध्ये गेल्या दशकात सलग ७ वर्षे दुष्काळ पडला.  याच कालावधीत देशाच्या लोकसंख्येत ३०% हून अधिक वाढ झाल्याने पिण्याच्या तसेच घरगुती वापरासाठीच्या पाण्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. बरं सर्वत्र ठिबकचा वापर होत असल्याने अमुक एका पिकावर बंदी घाला तमुक कारखाने बंद करा असं म्हणण्याचीही सोय नव्हती. अशा परिस्थितीत इस्रायलने काय केले हे गेल्या आठवड्यात मुंबईत आलेल्या तेथील राष्ट्रीय जल प्राधिकरणाचे प्रवक्ते उरी शोर यांच्याशी बोलताना समोर आले. ते महत्त्वपूर्ण ...

शेतकऱ्यांचा सूड (अतुल देऊळगावकर)

Image
हवामानबदलाच्या काळात शेती करणं म्हणजे बॉंबवर्षावात युद्धभूमीवर फिरण्यासारखं किंवा हिटलरच्या छळछावणीत दररोज मरणासमीप असण्यासारखं आहे. हाताशी आलेली भाजी, धान्य व फळं डोळ्यांदेखत नासून जाण्यानं होणाऱ्या मरणयातना भोगल्याशिवाय समजणार नाहीत. संपूर्ण राज्यातील शेती एकाच वेळी उद्‌ध्वस्त झाली आहे. एका वर्षात अवर्षण, अतिवृष्टी व अवकाळी पाऊस सहन करणाऱ्यांना काय वाटत असेल? याची कल्पनाही आपण करू शकणार नाही.  _______________________________________ जगी (किंचित) सुखी शेतकरी कोण आहे? या प्रश्‍नाचं उत्तर कुणीही नाही असं येतं. लंडनमधील "ग्रॅंटा‘ हे त्रैमासिक बदलतं वास्तव समजून घेण्यासाठी जगातील सर्वोत्तम कथाचे विशेषांक काढत असते. जगातील शेतकऱ्यांना शेती नकोशी झाली आहे आणि जमीन बळकावण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या सज्ज आहेत. "ग्रॅंटा‘च्या ग्रामीण जीवनावरील विशेषांकातून असा भाव व्यक्त होतो. भारतामधील साठ टक्के शेतकरी शेती सोडायची संधीच हुडकत आहेत, असं नॅशनल सॅंपल सर्वेक्षण सांगत आहे. युरोप अमेरिकेतील शेतकऱ्यांना आपल्यापेक्षा कैकपटीनं अधिक अनुदान व संरक्षण मिळतं. अत्याधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान त्या...

पाऊस पुरवायचा कसा? (अतुल देऊळगावकर)

Image
श्री . अतुल देऊळगावकर  संपूर्ण जगात सध्या पाण्याची टंचाई भासत आहे. वर्षाच्या कालावधीचा जर तासांच्या प्रमाणात हिशेब केला, तर अवघा शंभर तासच पाऊस पडतो. वर्षभर हा पाऊस पुरवायचा कसा, हा सगळ्यात मोठा प्रश्‍न आहे. ऑस्ट्रिया आणि अमेरिकेसारख्या प्रगत देशांनाही पाण्याचा तुटवडा भासत आहे. आपल्याकडे तर बदलत्या हवामानानुसार पाण्याचं नियोजन केलं पाहिजे, हेच कुणाच्या लक्षात येत नाही. पडणारा पाऊस आणि पाण्याचं नियोजन याबद्दल जगातली परिस्थिती कशी आहे आणि आपल्याकडे काय घडायला हवं, याबद्दल सांगत आहेत ज्येष्ठ जलतज्ज्ञ अतुल देऊळगावकर  ________________________________________________________________________________ एखाद्या देशाच्या सैन्याला नामोहरम करीत अतिरेकी संघटनाच त्या देशाचा ताबा मिळवण्याकडे वाटचाल करू शकते, हे पाहून संपूर्ण जग सध्या हादरून गेलं आहे. "इस्लामिक स्टेट इन इराक अँड ग्रेटर सीरिया‘ (इसिस) या अतिरेकी संघटनेकडे अत्याधुनिक शस्त्रं आहेत. जिवावर उदार झालेले तरुण आहेत. एकीकडे "मी, मी आणि मीच‘ हा टोकाचा व्यक्तिवादी विचार करणारी तरुण पिढी आणि त्याच वेळी स्वतःच्या जिवाचीसुद्धा पर...

अधांतरीच्या गोष्टी- मूळ लेख -राजेंद्र येवलेकर

Image
‘ गुरुत्व सोडताना फार त्रास होत नाही. पण गुरुत्वात परत येताना फार कठीण जाते.. ’ नासाचे अमेरिकी अंतराळवीर स्कॉट केली यांनी ३४२ दिवस आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकात राहून प्रदीर्घ अंतराळ-वास्तव्याचा सांगितलेला हा अनुभव. एकूण चार मोहिमांत ५२० दिवस अंतराळस्थानकात राहून त्यांनी रशियाचे व्हॅलेरी पोलयाकोव यांचा ४३८ दिवस वास्तव्याचा विक्रम मोडला. ते अवकाशात गेले आणि तेथून त्यांनी पृथ्वी पाहिली तेव्हा तिचे अद्भुतपण त्यांना जाणवले. अवकाशाची अथांगता मोठीच ; पण तेथून त्यांना पृथ्वीवर परतल्यावर हिमालयाच्या उत्तरेकडील सरोवरे बघण्याची लागलेली आस जीवनाचा अर्थ सांगणारी.. शेवटी पृथ्वीपासून दूर गेल्याशिवाय तिचे महत्त्व कळणार थोडेच ? अवकाशातून परतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा मनसोक्त केळी खाल्ली. त्यांना केळी खूप आवडतात. अवकाशातून पृथ्वी कशी वाटते , असे एका पत्रकाराने त्यांना अवकाशात असतानाच विचारले होते. तेव्हा ‘ माझी पृथ्वी आजारी वाटते आहे. मध्य अमेरिका व आशियावर प्रदूषण जाणवते आहे ,’ असे त्यांनी सांगितले. अवकाशातून पृथ्वीच्या प्रकृतीचे निदान करताना ‘ तिला जपले पाहिजे ’ असा हळुवार सल्लाही त्यांनी द...