चल्- चलूया की! (डॉ. आशुतोष जावडेकर )

संभाजी भगत या लोकविलक्षण कलाकाराची समीक्षा नक्की कोण करणार आहे ? तो लोकशाहीर आहे , म्हणून कुणी लोकसाहित्याचा अभ्यासक ? तो उत्तम गातो म्हणून कुणी संगीत समीक्षक ? त्याच्या विद्रोही विचारांना हेरत ‘ दलित स्टडीज् ’ वाला कुणी नव-प्रस्थापित ? का तो अति डावा आहे म्हणून ठोकण्याच्या मिषाने मैदानात उतरलेला कुणी अति उजवा लेखक किंवा समीक्षक ? मला वाटतं , या साऱ्यांनीच संभाजी भगतांच्या कामावर लिहावं. त्यांच्या कामाचा , निर्मितीचा आकार आणि आवाका हा मोठा आहे. मला आज काही तशी समीक्षा करायची नाही. या सदराचा आवाका मोठा असला तरी त्याची जागा मर्यादित आहे! पण मी करेन तर संभाजी भगत हेच एक स्वतंत्र ‘ डिस्कोर्स ’ चं एकक मानून करेन. आता फक्त लिखित शब्द म्हणजे साहित्य समजण्याचा काळ संपलाय. व्हॉट्सअॅपच्या दीर्घ चॅटनंतर आलेलं एखादं चिन्ह हेही कवितेसमान असू शकतं- तीही एक संहिताच ( text) असते. आणि इथे तर हा कवी त्याच्या बुलंद , खणखणीत आवाजात साऱ्या प्रस्थापितांना आव्हान देत गातोय बघा. आणि मग संगीत आणि साहित्य हे दोन डिस्कोर्स एकवटत आहेत. तो म्हणतोय : ‘ हे पालखीचे भोई , यांना आईची वळख नाही जिथे जिंदगी...