लक्ष दीप उजळले! -मल्हार अरणकल्ले
संध्याकाळ भरून आली आहे. क्षणाक्षणाला गडदपणा दाट होतो आहे. पणत्यांचे, आकाशदीपांचे तेजाकार त्यावर उमटत आहेत. अंगणांत, खिडक्यांत, सज्ज्यांत, उद्यानांत तेजोमय प्रकाशज्योतींचं साम्राज्य लखलखत आहे. रांगोळ्यांची चिन्हं या तेजाक्षरांचे अर्थ खुलवीत-फुलवीत आहेत. एका अपूर्व तेजानं दीपोत्सवाचा आनंद ओसंडून गेला आहे.
भरलेल्या आनंदाचा प्रत्येक कण म्हणजे त्याचं सूक्ष्मरूप असतो. इवल्या पणतीतल्या वातीच्या शीर्षावर नाचणाऱ्या ज्योतीतही ब्रह्मतेजाचं रूप सामावलेलं असतं. आपण सगळेच भव्यतेचं कौतुक करतो; पण ही भव्यता ज्या छोट्या छोट्या प्रयत्नांतून साकारलेली असते, त्या प्रयत्नांच्या वाट्याला कृतज्ञतेचा शब्द क्वचितच येतो.
पणतीचा आकार बोटं जुळवून होणाऱ्या खोलगट तळव्यासारखा असतो. या तळव्याची मध्यमा इतर बोटांपेक्षा काहीशी मोठी, सशक्त असते. ही मध्यमा तळव्यातल्या सकारात्मकतेचं ज्योतिरूप असते. पणतीतली ज्योतही कडेच्या एका बिंदूच्या आधारानं उंचावलेली असते. ज्योतीचा पाया टोकदार असतो आणि तिच्या शीर्षबिंदूवरही तेजाचंच टोक असतं. मध्यभागी ज्योत विस्तारलेली असते. अंधकाराचे अनेक आळोखेपिळोखे ती गिळून टाकते. पुन्हा टोकाशी निमुळती होते. एका प्रखर बिंदूतून बाणासारखी जाऊन थेट अंधकाराचाच वेध घेते. जिथं पोचते, तिथलं सारं काही उजळून टाकते.
पणतीच्या गोलातून ज्योत प्रकाशरेखा उचलून घेते. ज्योत वाऱ्यावर नाचते. अपूर्व प्रसन्नतेजा होते. ती गातेसुद्धा. ते शब्द-सूर ऐकायला एकाग्रता लागते. ज्योतीतून उमलणारे प्रकाशरेषी हात अक्षरं लिहितात; आणि ही अक्षरंच पहिला लिपीकार रेखतात. ज्योतीच्या वेळावणाऱ्या आकारांतून आधी "अ‘कार उमटतो, मग "उ‘कार साकारतो आणि शेवटच्या "म‘कारानं पूर्णत्व आकाराला येतं. ज्योतीच्या या वेलांट्यांतून उमटलेला ॐकार म्हणजे तेजाचंच स्वरूप होय. तेवणाऱ्या ज्योतीच्या तळाशी "स‘काराचं अस्पष्ट आवर्तन एकसारखं सुरू असतं. ज्योत जळत असते, तेव्हा वातीतून तेल-तूप ओढून घेतलं जाताना तिथं आवाज होतो. तो ध्वनी "स‘काराचा असतो. थरथरत्या ज्योतीबरोबर तो तेजारतीच्या आरोह-अवरोहांचा तोल सावरीत असतो. ज्योती-ज्योतींतून उमटणारे हे "स‘कार दीपोत्सवाचा आनंद शतगुणिताच्या संख्येनं खुलवीत-वाढवीत असतात.
दीपोत्सवाच्या सौभाग्यलक्षणी आनंदात मनातही अशाच सकारात्मकतेच्या ज्योती फुलून येतात. तिथला निराशेचा अंधार दूर करतात. "स‘काराचे किरण अखंड फुलवीत राहतात. ज्योतींच्या आजूबाजूच्या तेजोमय अस्तित्वाचा तोच अर्थ आहे. या तेजाक्षरांचा तोच संस्कार आहे.
दीपोत्सवाची मैफल नुकतीच सुरू झाली आहे. ते स्वरसौंदर्य फेर धरून नृत्याकार खुलवू लागलं आहे. लक्षलक्ष दिव्यांचे उजळ होकार अंधारल्या दिशांवर उमटले आहेत. आपणही सारे मिळून एक-एक पणती लावू. प्रकाशफुलांनी कोट्यवधी ओंजळी भरून टाकू; आणि दिव्याचं प्रकाश वाटण्याचं निर्मोही दातृत्व मनात जागतं ठेवू.
_______________________
संदर्भ :
१) मूळ लेख :
२) ज्योत व्हिजुअल क्लिप -https://www.youtube.com/watch?v=MitFL4ghzHU
३)दिवा - http://www.shutterstock.com/video/clip-7699534-stock-footage-indian-traditional-oil-lamp-symbolizing-spreading-of-light-and-end-of-darkness.html आणि http://media.gettyimages.com/videos/row-of-oil-lamps-window-sill-chattarpur-new-delhi-india-video-id84062023?s=640x640

Comments
Post a Comment