कसं, काय पाटील बरं हाय का ? काल काय म्हणाला ते खरं हाय का ? हे अजरामर गाणं ते आज गाजत असलेले "" बाई, वाड्यावर चला,'' हे गाणं असो. पाटील हा नेहमीच करमणुकीचा आणि चेष्टेचा विषय बनला. त्याची ही एकच बाजू पुढे आली. दुसरी बाजू कधीच पुढे आली नाही. त्याला नेहमीच खलनायकाच्या पिंजऱ्यात उभे केले. मात्र तो खलनायक नव्हे तर नायक आहे ही प्रतिमा कधीच पुढे आली नाही. पाटलांवरील पाचंट विनोद करण्यातच आनंद लुटला जातो. कसं काय पाटील हे गाण तर त्याच्या कपाळावर चिकटवले गेले ते कदापी पुसणार नाही. या गाण्यानेच नव्हे तर मराठी चित्रपटांत पाटलाला नेहमीच रंगेल, कटकारस्थानी, धूर्त, रांगडा, वैगेरे वैगेरे जे काही वाईट तो म्हणजे पाटील. नुकताच एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो तेथेही पाटलांचे नाव घेतल्याशिवाय पान पुढे सरकलेच नाही. व्हॉटसअप असू द्या, व्यंगचित्र, किंवा नाटक-सिनेमा पाटील हा सर्वांचाच आवडता विषय. होय, पाटील अगदी चित्रपटात उभा करतात तसाच रांगडा, घरंदाज, करारी, गावचं नेतृत्व करणार पुढारी, अकडबाज मिशा, टोपी-धोतर, पायात कर्रकर्र वाजणाऱ्या चामड्याच्या चपला असे त्याचे व्...