आयटीमधील नऊ 'इनोव्हेटिव्ह' कंपन्या-2009-10
मोबाईल तंत्रज्ञान, ग्रामिण भारतासाठी उपयुक्तता, रोजगार अशा विविध नाविन्यपूर्ण संकल्पना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात प्रत्यक्षात आणल्याबद्दल "नॅस्कॉम'ने भारतातील नऊ कंपन्यांना नुकतेच "नॅस्कॉम इनोव्हेशन' पारितोषिकाने गौरविले. या पारितोषासाठी 24 कंपन्यांची ऑनलाईन उत्पादने स्पर्धेत होती. उद्या (ता. 10) मुंबईत "नॅस्कॉम'च्या इंडिया लिडरशीप फोरममध्ये या नऊ कंपन्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येतील.
विजेत्या कंपन्यांची निवड करण्यासाठी त्रिस्तरीय पद्धत हैदराबाद, बंगळूर, दिल्ली आणि पुणे येथे राबविण्यात आली. भारतीय माहिती तंत्रज्ञान-बीपीओ क्षेत्रामध्ये या पुरस्काराचे विशेष महत्व आहे. त्यामुळेच, या कंपन्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांकडे भारतीयच नव्हे, तर जगाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे लक्ष असते. नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वास्तव वापर, हे भारतीय माहिती तंत्रज्ञान-बीपीओ क्षेत्राच्या वाढीचे रहस्य राहिले आहे. सन 2020 मध्ये हे क्षेत्र 75 अब्ज डॉलर्सची उलाढाल करेल, असा "नॅस्कॉम'ला विश्वास आहे. या पार्श्वभूमीवर पारितोषिक विजेत्या कंपन्यांच्या उत्पादन-सेवांना येत्या काळात अधिक महत्व मिळणार आहे.
कोण आहेत पारितोषिक विजेते?
पारितोषिक गट - बिझनेस प्रोसेस ऍन्ड बिझनेस मॉडेल
विजेता - इका सॉफ्टवेअर सोल्यूशन्स् (http://ekaplus.com) - कमोडिटी ट्रेडिंग आणि जोखीम व्यवस्थापन क्षेत्रासाठी या कंपनीने विकसित केलेय "ईका' सॉफ्टवेअर.
उपविजेता - कॉमविवा (http://www.comviva.com/) - मोबाईल क्षेत्रातील कंपनी. मोबाईलचा स्वतंत्र माध्यम म्हणून आर्थिक सेवांमध्ये थेट सहभाग व्हावा, यासाठीचे सॉफ्टवेअर कंपनीने विकसित केलेय.
पारितोषिक गट - प्रोसेस
विजेता - विप्रो टेक्नॉलॉजीस् (http://www.wipro.com/industries/manufacturing/CIGMA.htm) - व्यवसाय व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणारे सिग्मा (सेंटर फॉर इंटिग्रेटेड ग्लोबल मॅनेजमेंट ऑफ ऍप्लिकेशन्स्) विकसित केलयं. व्यवसायाच्या सुयोग्य परताव्यासाठी या व्यवस्थेचा फायदा अपेक्षित आहे.
सहविजेता - झोहो कॉर्पोरेशन (http://www.zoho.com/) - नैपुण्य शोधणे, नोकरभरती आणि प्रशिक्षण पद्धतींमधील नाविन्यपूर्ण प्रयोग हे या कंपनीचे वेगळेपण ठरलेय.
आयबीएम दक्ष बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड - व्हॉईस ऑफ कस्टमर ऍनालिटिक्स् हे कंपनीचे नाविन्यपूर्ण उत्पादन. माहितीवर योग्य ती प्रक्रिया करून ग्राहकांशी अधिकाधिक बळकट आणि विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी उत्पादनाचा उपयोग झाला आहे.
नवे तंत्रज्ञान
विजेता - तेजस नेटवर्कस् इनोव्हेशन (http://www.tejasnetworks.com/index.shtml) - नेटवर्किंगच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कामाबद्दल पारितोषिक.
सहविजेता - एअरटाईट नेटवर्कस् (http://www.airtightnetworks.com/) - स्पेक्ट्रा गार्ड ऑनलाईन या वायरलेस सुरक्षा क्षेत्रातील उत्पादनाबद्दल कंपनीला पारितोषिक.
प्रारंभ
ट्रींग मी (http://login.tringme.com/cdr.php)- फ्लॅश टेलिफोनीमधील नाविन्यपूर्ण शोधाबद्दल पारितोषिक. इंटरनेट टेलिफोनीमध्ये क्रांतीकारक बदल घडविण्याची क्षमता या भारतीय कंपनीच्या उत्पादनात आहे.
रुरलशोअर्स बिझिनेस सर्व्हिसेस (http://ruralshores.com/) - ऑफशोअर बिझिनेस प्रोसेस आऊटसोर्सिंगसाठी ग्रामीण भागाकडे लक्ष देणारी कंपनी. या कंपनीच्या धोरणामुळे भारतात ग्रामीण भागात बीपीओ पसरण्यास मदत होऊ शकते.
Comments
Post a Comment