अनसंग
टेलिफोनचा शोध ग्रॅहॅम बेल यांनी लावला हे आपण विज्ञानाच्या पुस्तकात शिकलो आहोत. पण मोबाइलचा शोध कोणी लावला असं
तुम्हाला विचारलं तर... तर काय तुम्ही डोकं खाजवत बसाल! प्रश्नाची यादी पुढे खेचली तर तुम्हाला ब्लॅकबेरीची निमिर्ती कोणी केली... आयपॉड सर्वप्रथम कोणी बाजारात आणला... 'वर्क अॅट होम' ही संकल्पना पहिल्यांदा कोणाच्या डोक्यात आली अशा प्रश्नांची उत्तरे देता येतील? बरं या सर्व गोष्टींचा वापर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अगदी सहजरित्या करत असतोच ना. चला तर मग जाणून घेऊ या प्रश्नांची उत्तरं. 'अनसंग टेक्नोक्रॅट्स'विषयी.
माटीर् कूपर आज तुम्ही-आम्ही मोबाइलची विविध हँडसेट्स हातात मिरवत फिरतो त्या मोबाइलचा शोध या अवलियाने लावला. मोटोरोला कंपनीत इंजिनीअर म्हणून काम करणाऱ्या माटीर्ने ३ एप्रिल १९७३ रोजी जगातला पहिला मोबाइल कॉल केला तो प्रतिस्पधीर् असलेल्या एटी अँड टी बेल लॅब्स कंपनीतील त्याच्या मित्राला. त्याचवषीर्च्या ऑक्टोबर महिन्यात माटीर्ने 'रेडिओ टेलिफोन सिस्टिम'साठी पेटंट दाखल केले. सध्या माटीर् अॅरेकॉम या कंपनीचे सीईओ आहेत. ही कंपनी वायरलेस नेटवकिर्ंगमध्ये काम करते.
माइक लाझारिडिस
मोबाइल हँडसेट्स तयार करणाऱ्या ब्लॅकबेरी कंपनीची स्थापना माइक यांनी केली. ब्लॅकबेरीच्या सहाय्याने वायरलेस इ-मेल पाठवण्याचे काम सर्वप्रथम माइक यांनी केले. जेव्हा सर्व बिझनेस र्वल्ड मेमो किंवा तत्सम कागदी आदेश पाठवण्यासाठी टेलेक्सचा वापर करीत त्यावेळी माइकनी नेटवकिर्ंगमध्ये स्वत:ला बुडवून घेतलं होतं. कॅनडातील वॉटर्लू विद्यापीठाच्या या विद्यार्थ्याला जनरल मोटर्सचं मोठ्ठं कंत्राट मिळालं आणि तिथेच ब्लॅकबेरीची मुहुर्तमेढ रोवली गेली. लायब्ररीतील सर्व विज्ञानाची पुस्तके वाचल्याबद्दल या अवलियाला वयाच्या बाराव्या वषीर् बक्षीस मिळालं होतं.
डोग इंगेलबार्ट माऊसविना कॉम्प्युटर ही संकल्पना तुमच्या पचनी पडेल...? तर माऊसच्या शोधाचे पालकत्व इंगेलबार्ट साहेबांकडे आहे. १९६४ मध्ये इंगेलबार्ट यांनी माऊसचा 'प्रोटोटाईप' तयार केला. लाकडी आकाराचा माऊस व त्याला धातूची दोन चाकं असं त्याचं रूप होतं. इंगलबार्ट यांनी १९७० मध्ये त्याचं पेटंट मिळवलं. त्यानंतर अनेक 'उत्क्रांती' होऊन आजचा माऊस तयार झाला आहे. इंगलबार्ट सध्या बूटस्ट्रॅप इन्स्टिट्यूटचे प्रमुख आहेत.
टोनी फेडेल आज तुम्ही आयपॉडमध्ये शेकडो गाणी डाऊनलोड करून कुठेही त्याचा मनमुराद आनंद लुटू शकता. हा आयपॉड शोधून काढला तो टोनी फेडेल यांनी. जेव्हा सीडी प्लेअरचं माकेर्ट ऐन भरात होतं त्यावेली टेडनी इंटरनेटला कनेक्ट होईल असं तसंच छोटंसं संगीतश्रवण यंत्र तयार केलं. त्याने ही संकल्पना रिअलनेटवर्क या कंपनीकडे मांडली. मात्र, ती सपशेल धुडकावून लावण्यात आली. फिलिप्स कंपनीनेही टोनी यांना नकारघंटा वाजवून दाखवली. अखेरीस अॅपल कंपनीने टोनीची संकल्पना प्रत्यक्षात आणली आणि २००१ मध्ये जगातला पहिला आयपॉड बाजारात आला.
जॉन बॅक्कस
जगभरात पहिल्यांदा वापरली गेलेली फोरट्रान या हाय लेव्हल कॉम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेजची निमिर्ती जॉन बॅक्कस यांनी केली. ५०च्या दशकात फोरट्रान लँग्वेजमध्ये नवनवीन बदल घडत गेले आणि सॉफ्टवेअरचा मार्ग सुकर झाला. फोरट्रानपूवीर् कॉम्प्युटर्स हँड-कोडेडने वापरला जायचा. म्हणजे काही विशिष्ट आकडे टाकून काम्प्युटरचा वापर करता यायचा. फोरट्रानने मात्र सर्व चित्र पालटलं. या शोधाप्रित्यर्थ बॅक्कस यांना १९७७ मध्ये तुरिंग या कॉम्प्युटिंग क्षेत्रातील सवोर्च्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बॅक्कस यांचं २००७ मध्ये वयाच्या ८२व्या वषीर् निधन झालं.
Comments
Post a Comment