"स्वाद भरे शक्ती भरे पारले-जी"

समस्त भारत खंडात पारले बिस्किटे आणि त्याच्या वेष्टनावरील सुरेखश्या बाळाचा फोटो  कोण ओळखत नाही गेली काही दशके पिढ्यानपिढ्या ह्याच एका बिस्किटावर फिदा असल्याचा जमाना आताशा काळानुरूप मागे पडत चालला तरी ती बिस्किटे आणि त्यांच्या सह असलेल्या प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी कश्या विसरता येतील?
एका प्रसिद्ध वर्तमान पत्राच्या संकेत स्थळावर आपल्या लाडक्या पार्ले बिस्किटाविषयी खालील माहिती   मिळाली :
पार्ले-जी चवीसाठी तर प्रसिद्ध आहेच (किंवा होता म्हणूया हवे तर सध्या ),पण त्याबरोबरच  त्याच्या वेष्टनावरील बाळाचा चेहरा/फोटोही तितकाच प्रसिद्ध आहे. पण ते बाळ म्हणजे जाहिरात संस्थेने निर्माण केलेले एक काल्पनिक सर्जन (क्रिएटिव)चित्र होते यावर आपला कितपत विश्वास बसेल बर ?

जग १९२९ मध्ये भारतात पारले बिस्किट निर्मिती सुरु झाली असा कंपनीच्या संकेतस्थळावर उल्लेख सापडतो.
१९८० मध्ये पारले-जी बिस्किटे Gluco असे नामकरण करण्यात आले. हे जी म्हणजे ग्लुकोज आहे असा याचा अर्थ.१९८२मध्ये पहिल्या टीव्ही व्यावसायिक जाहिरातीत "स्वाद भरे शक्ती भरे पारले-जी" असे घोषवाक्य (slogan ) वापरण्यात आले.
पारले-जी २००१मध्ये प्रथमच  कागदी  वेष्टन (पॅकिंग)सोडून प्लास्टिकच्या वेष्टनात वितरीत होऊ लागले. आता "स्वाद भरे शक्ती भरे पारले-जी"चा प्रवास जी म्हणजे जीनियस अश्या नवीन टप्प्यावर येउन ठेपला आहे. सध्याची 'कल के जीनियस' ही  जाहिरात संकल्पना प्रसिद्ध कवी गुलजार साहेबांनी लिहलेली आहे आणि पियुष मिश्रांनी आपल्या आवाजात सादर केलेली आहे.
पारले-जीबद्दल सांगितली जाणारी गमतीदार गोष्ट अशी की एका वर्षात खाल्ल्या जाणारे   पारले-जी बिस्कीट एका सोबत एक रेषेत ठेवल्यास पृथ्वीच्या परीघाची १९२ वेळा वेळा परिक्रमा करता येईल.
मुंबई , बंगळूरू, बहादूरगड(हरियाना ) आणि नीमराना(राजस्थान ) येथील  आपल्या १० उत्पादन प्रकल्पांसह देशभरात सुमारे ७५ ठिकाणी कंत्राट-पद्धतीने  कंपनी आपली लाडकी पारले-जी बिस्किटे दररोज ४० दशलक्ष पॅकेट इतक्या प्रचंड संख्येत उत्पादित आणि वितरीत करत असते  जे देशातील सुमारे ३३००० केंद्रामार्फत विक्री केले जातात. स्पर्धा कितीही वेगाने वाढत असली तरी ४०% बाजार हिस्स्यासह भारतातीलच नव्हे तर "जगातील नं. १ खपाची(विकली जाणारी ) ग्लुकोज बिस्किटे" असा भारदास्त लौकिक कमवून आहे.       

Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण