कोण कोणाला मारित भोंगा? श्री.ज्ञानेश्वर मुळे
श्री . ज्ञानेश्वर मुळे(Consul General of India, New York, USA ) यांचा एक विचार करायला लावणारा लेख: _______________________________________________________________________________ कोण कोणाला मारित भोंगा? सातेक वर्षांच्या परदेशातील वास्तव्यानंतर परतल्यानंतर तीव्रतेने जाणवलेली एक गोष्ट कोणती, असे कुणी विचारले तर मी म्हणेन "आवाज.‘ चोहोबाजूंनी येणारा . प्रत्येक दिशेने येणाऱ्या या सगळ्या आवाजांचा एक सामूहिक जीवघेणा आवाज जणु पाठलाग करतोय. वाटते की आपल्यापुढे एकच पर्याय आहे. या सर्व आवाजांना चिरत जाणारा आपला एक आवाज उठवावा किंवा उंच आकाशात उडवावा आणि सांगावे, "बंद करो सब आवाजें हमेशा के लिए‘ दिल्लीतील आवाजांची विविधता आणि तीव्रता लक्षणीय आहे. इथली कबुतरे आणि कावळेसुद्धा जोरजोरात शक्तिप्रदर्शन करताना दिसतात. वाहनचालक सहज "हमरीतुमरी‘वर येतात, तेव्हा "हमरीतुमरी‘चा अर्थ कळतो. बुद्धिवंतांच्या आवाजाची वेगळीच गोष्ट. वृत्तपत्रांतील सर्व बातम्यांचा एकसंध गदारोळ उडून आपली भंबेरी उडतेय की काय, असा भास होतो. त्या सर्व लेखांना आणि बातम्यांना, मुद्रित-लिखित शब्दांऐवजी आवाज प्र...