गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त आणि फक्त आठवणी . आई , ५ वर्षं झालीही तुला जाऊन,आणि आम्ही तरी कुठे थांबलोय? संसारचक्र सुरूच आहे आणि धावतोय आम्हीही जमेल तसं पण आई आता तू नाहीस, फक्त तुझा आश्वासक आवाज आहे अजूनही कानात घट्ट रुतलेला,आणि खूप साऱ्या आठवणी ज्या उलगडत असतात एकामागून एक कधी अचानक तर कधी प्रसंगानुरूप. हे आई! आमचं विनम्र अभिवादन स्वीकार जिथे कुठे असशील तिथे !!
आई -तृतीय पुण्यस्मरण (२९.०८.२०१७) आई , बघता बघता तीन वर्षे झाली पण तुला जाऊन. करतोय प्रयत्न तुझ्याविना जगण्याचा आम्ही लोक ,तसं चाललं आहेच पुढे सर्वकाही भरधाव पण एक सल आहे मनात तू नसल्याची. पण आता काय करावे अश्या दोलायमान अवस्थेत भगवद गीतेचा जरा आधार वाटतो आहे. अर्थात अजून फक्त सुरुवात केलीय भगवद गीतेबद्दल कुतुहूल वाटल्याने अधिक माहिती मिळवण्याची तीही विस्कळीत स्वरूपात आहे,सातत्यपूर्ण नाही हवी तितकी पण आश्वासक नक्कीच आहे. तेव्हा बघतो मला (किंवा प्रत्येकाला ) कधीना कधी पडणाऱ्या काही गूढ- गहन प्रश्नाची समाधानकारक उत्तरे भगवद गीतेच्या साहाय्याने मिळविता येतात का ते ज्यात आत्मा आणि त्याच्या अमरत्वाबद्दल खालील उल्लेख आहे : भगवद गीता अध्याय २,श्लोक २२ वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि।तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही।। अर्थात जैसे जगत् में मनुष्य पुराने जीर्ण वस्त्रोंको त्याग कर अन्य नवीन वस्त्रोंको ग्रहण करते हैं, वैसे ही जीवात्मा पुराने शरीरोंको छोड़कर अन्यान्य नवीन शरीरोंको प्राप्त करता है. अभिप्राय यह कि (पुराने वस्त्रोंको छ...
आई तू आमच्यातून खूप खूप दूर अनंताच्या प्रवासाला निघून जाऊन चार वर्षे झाली पण.दिवस कसे भराभर निघून जातात मनाच्या कप्प्यात आठवणींचा दरवळ मागे ठेऊन ते कळतही नाही. पण एकमात्र खरं प्रसंगानुरूप येतच असते ग तुझी आठवण आणि आतातर जास्तच कारण मधला काही काळ मन तयार नव्हतं म्हणा की सुन्न झाले होते म्हणा; पण तू आता आमच्यासोबत नाही हा विचार मनात पण न फिरकू देण्याचे अविवेकी म्हण,नाही तर अजून काही -प्रयत्न अज्ञानपणे आम्ही करून बघितले, समजावत राहिलो मनाला की, तू आहेस कोणाच्या तरी घरी आणि आता काही वेळाने फोन करून सांगशील की, भाऊ आम्ही येतोय तुझ्या घरी, खूप दिवस झाले नातवंडांना भेटून तेव्हा त्यांची- तुमची उभ्या उभ्या भेट घेऊन परत जाऊ;पण कसचं काय? उगीचच आपले मनोविभ्रम,आणि काय? पण आताशा कळलं आणि थोडं थोडं उमगतही चाललं की, जे आपण दूर लोटू इच्छितो तेच अंतिम आणि कदाचित एकमेव शाश्वत सत्य आहे या भूलोकावरचे.पण ते एकदा कळल्यावर आता हेही लक्षात येतेय की आई गमावणे म्हणजे नेमकं काय असतं! हुंदका दाटून येतो मनात पण सांगणार कुणाला? आणि हो,आता जरा मोठं झाल्याचं ओझं नाही;पण जबाबदारी म्हणूया हवं तर असं हळवं होऊन व्यक्त व्...
Comments
Post a Comment