नातं भांड्यांशी - गाळणी, चाळणी, रोळी, खिसणी! - चित्कला कुलकर्णी
माझी आई घरातल्या विविध भांडयांकडे अगदी कुटुंबातील सदस्यच असल्याप्रमाणे लक्ष देत असे आणि त्यावेळी फ्लॅट संस्कृतीचा अभाव असल्यामुळे जेव्हा केव्हा शेजारी काही खाद्य-पदार्थ , धान्य दही वगैरे वस्तूंची खुलेपणाने देवाण-घेवाण होत असे त्यावेळी जर चुकून एखाद्या शेजारणीला दिलेले विशिष्ट भांडे परत आले की नाही याकडे तिचे अगदी काटेकोर लक्ष असायचे म्हणजे अगदी आपण कार्यालयात ऑडिट करतांना स्टॉक-कीपिंग तत्व वापरतो त्याचप्रमाणे. आता हा उल्लेख काही मंडळींना अतिशोयक्त वाटेलही कदाचित पण तत्कालीन स्त्री भावविश्वाचा विचार करून बघायचा प्रयत्न केल्यास त्यात खूपसे तथ्य आहे हे लक्षात आल्यावाचून राहत नाही . एवढे सर्व विचार इथे मांडायचे कारण म्हणजे या संदर्भातच दैनिक सकाळमध्ये वाचनात आलेला "नातं भांड्यांशी - गाळणी, चाळणी, रोळी, खिसणी! " हा चित्कला कुलकर्णी यांचा अगदी समर्पक लेख जो खालील प्रमाणे: प्रत्येक भांड्याचं दैनंदिन व्यवहारातलं महत्त्वाचं स्थान पाहिलं की, वाटतं ते भांडं काही ना काही सुचवतं. आपल्या अस्तित्वातू...