फार छान आणि आशयगर्भ असतात हो नवीन सिनेमातील गाणी पण- निलेश पाटील
मंडळी आपण म्हणतो की सध्याची म्हणजे नवीन गाणी खूपच विचित्र आणि कर्कश असतात विशेषतः हिंदी गाणी. कारण आपण बहुतेक सर्वजण( साधारणतः आता चाळीशीच्या आसपास असलेले तर नक्कीच) एकदम सुरेल जुनी हिंदी-मराठी गाणी ऐकतच मोठे झालोय. मलापण असेच वाटत होते अगदी अलीकडेपर्यंत पण काही निवडक नवीन गाणी आपण जेव्हा निवांतपणे लक्षपूर्वक ऐकतो आणि त्यातल्या त्यात जर अचानक त्या गाण्याच्या आशयाशी मिळता-जुळता काही प्रसंग घटना आपल्या लक्षात आली तर त्या गाण्यातील शब्द,स्वर आरोह-अवरोह याकडे आपले बारीक लक्ष जाते आणि बघता बघता आपण ते गाणे ऐकताना त्याच्याशी समरस होऊन जातो. मला असेच एक गाणे येथे नमूद करावयाचे आहे. ते आहे MP4 फॉरमॅट मध्ये इथे : एखाद्या वेळी तुम्हाला असे पण वाटेल की काहीही लिहितो हा भाऊ पण असो . काल रात्री बऱ्याच उशिराने "हमारी अधुरी कहाणी" हे अरिजित सिंगच्या आवाजातील जीत गांगुलीने संगीतबद्ध केलेले शीर्षक गीत प्रथमच ऐकले , सिनेमात त्याचा संदर्भ काय आहे हे मला नाही माहित तो बघितला नसल्याने पण ते ऐकत असतांना त्याचा काल्पनिक संदर्भ "आमच्या मातोश्री(आई )गेल्यानंतर(जी तशी अकाली...