फार छान आणि आशयगर्भ असतात हो नवीन सिनेमातील गाणी पण- निलेश पाटील
मंडळी आपण म्हणतो की सध्याची म्हणजे नवीन गाणी खूपच विचित्र आणि कर्कश असतात विशेषतः हिंदी गाणी. कारण आपण बहुतेक सर्वजण( साधारणतः आता चाळीशीच्या आसपास असलेले तर नक्कीच) एकदम सुरेल जुनी हिंदी-मराठी गाणी ऐकतच मोठे झालोय. मलापण असेच वाटत होते अगदी अलीकडेपर्यंत पण काही निवडक नवीन गाणी आपण जेव्हा निवांतपणे लक्षपूर्वक ऐकतो आणि त्यातल्या त्यात जर अचानक त्या गाण्याच्या आशयाशी मिळता-जुळता काही प्रसंग घटना आपल्या लक्षात आली तर त्या गाण्यातील शब्द,स्वर आरोह-अवरोह याकडे आपले बारीक लक्ष जाते आणि बघता बघता आपण ते गाणे ऐकताना त्याच्याशी समरस होऊन जातो. मला असेच एक गाणे येथे नमूद करावयाचे आहे. ते आहे MP4 फॉरमॅट मध्ये इथे :
एखाद्या वेळी तुम्हाला असे पण वाटेल की काहीही लिहितो हा भाऊ पण असो . काल रात्री बऱ्याच उशिराने "हमारी अधुरी कहाणी" हे अरिजित सिंगच्या आवाजातील जीत गांगुलीने संगीतबद्ध केलेले शीर्षक गीत प्रथमच ऐकले , सिनेमात त्याचा संदर्भ काय आहे हे मला नाही माहित तो बघितला नसल्याने पण ते ऐकत असतांना त्याचा काल्पनिक संदर्भ "आमच्या मातोश्री(आई )गेल्यानंतर(जी तशी अकालीच वयाच्या ५३व्या वर्षी गेली मागच्या दोन वर्षांपूर्वी )आमचे पिताश्री (अण्णा ) कधीतरी एखाद्या निवांत वाटणाऱ्या संध्याकाळी पण अंगावर येणाऱ्या कातरवेळी एकटेच आईच्या फोटोसमोर बसलेले आहे आणि मागे बॅकग्राऊंडला हे गाणे सुरु आहे" असा माझ्या डोळ्यासमोर तरळला (जो कदाचित मला काल्पनिक वाटत असला तरी खरा पण असून शकेल कारण पिताश्री काही तसे आमच्यासमोर एकदम बोलणार नाही) आणि मला एकदम शहारून भरून आले. कंठ रुद्द झाला आणि मग मी पण फार आवरून वगैरे न ठेवता मुक्तपणे ५ ते ७ मिनिटे रडून घेतले आणि हे गाणे पुन्हा पुन्हा २/३ वेळेस ऐकले आणि त्यातून सावरलो तेव्हा मध्यरात्री केव्हा तरी झोपी गेलो. त्या गाण्याचे बोल (शब्द )उर्दूत आहे खालीलप्रमाणे :
पास आये..
दूरियां फिर भी काम ना हुई
एक अधूरी सी हमारी कहानी रही
आसमां को ज़मीन ये ज़रूरी नहीं
जा मिले.. जा मिले..
इश्क़ सच्चा वही
जिसको मिलती नहीं मंज़िलें मंज़िलें
रंग थे, नूर था
जब करीब तू था
एक जन्नत सा था, ये जहां
वक़्त की रेत पे कुछ मेरे नाम सा
लिख के छोड़ गया तू कहाँ
हमारी अधूरी कहानी
हमारी अधूरी कहानी..
हमारी अधूरी कहानी
हमारी अधूरी कहानी..
खुश्बुओं से तेरी यूँही टकरा गए
चलते चलते देखो ना हम कहाँ आ गए
जन्नतें अगर यहीं
तू दिखे क्यों नहीं
चाँद सूरज सभी है यहां
इंतज़ार तेरा सदियों से कर रहा
प्यासी बैठी है कब से यहां
हमारी अधूरी कहानी
हमारी अधूरी कहानी..
हमारी अधूरी कहानी
हमारी अधूरी कहानी..
प्यास का ये सफर खत्म हो जायेगा
कुछ अधूरा सा जो पूरा हो जायेगा
झुक गया आसमां
मिल गए दो जहां
हर तरफ है मिलन का समां
डोलियां हैं सजी, खुशबुएँ हर कहीं
पढ़ने आया ख़ुदा खुद यहां
हमारी अधूरी कहानी
हमारी अधूरी कहानी..
हमारी अधूरी कहानी
हमारी अधूरी कहानी..
यानंतर कदाचित ती फिलिंग (भावना ) नाही येणार पण काल रात्रीचा हे गाणे ऐकतांनाचा अनुभव फार उत्कट होता म्हणून लिहावासे वाटले.
तुम्हीपण सर्वजण ऐका कधीतरी निवांतपणे आणि कदाचित माझ्याप्रमाणे तुमचेपण नवीन गाणी संगीत या बद्दल एकदम नाही पण बरेचसे चांगले मत होईल. अर्थात गाणी-सिनेमा-नाटक इत्यादी हे माध्यम आहे ज्यात आपण आपल्याला शोधात असतोच कुठेतरी.
असो ! हल्ली हे ब्लॉगरुपी माध्यम आहे व्यक्त होण्यासाठी ते फार बरे झाले. मला वाटते असे खूपच वैयक्तिक अनुभव जे आपण सहसा कोणासोबतच एरवी शेयर करत नाही किंवा प्रत्यक्ष समोरासमोर नाही बोलू शकणार त्यासाठी हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. खरे तर खूप काही दडले असते प्रत्येकाच्या मनात जे वेळोवेळी शेयर केले तर मन हलके होते त्याचा एक भाग म्हणून ही पोस्ट. बाकी नंतर कधी तरी.
पण फार छान आणि आशयगर्भ असतात हो नवीन सिनेमातील गाणी हे नक्की.
निलेश पाटील
३०/११/२०१६
पण फार छान आणि आशयगर्भ असतात हो नवीन सिनेमातील गाणी हे नक्की.
निलेश पाटील
३०/११/२०१६
Comments
Post a Comment