अन्नपूर्णाची खाद्य चॅनेल्स-शुभा प्रभू-साटम
आधुनिक माध्यमातल्या, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या या अन्नपूर्णा. सगळ्या जणींना खरं तर स्वयंपाकाची, खाऊ घालण्याची आवड, यातून बिनभांडवली व्यवसाय सुरू झाला, खाद्य चॅनेल्सचा. ‘यू-टय़ूब’वर एक असतं, एकदा का लाइक्स् मिळायला लागले आणि सबस्क्रायबर वाढायला लागले की ‘स्काय इज द लिमिट’. कुठला पदार्थ कोणाला, कुठे, कसा आणि का आवडेल हे सांगताही येत नाही. रूपाच्या सोलकढीला कॉकटेल्स म्हणून अनेक जण सव्र्ह करतात. मधुराच्या वांग्याच्या भाजीवर मध्यपूर्वेवरून पंसती मिळाली आहे. अर्चनाच्या पाककृती करून त्याचे फोटो आवर्जून तिला पाठवणारे अनेक जण आहेत. कल्पनालाही पाठारे प्रभू समाजातूनच पोचपावती मिळालीय. शुभांगी कीरने दाखवलेली अंडय़ाची भुर्जी असंख्य एकटय़ा राहणाऱ्या पुरुषांच्या मदतीला धावून आलेली आहे.. खाद्यचॅनेल्स आणि आधुनिक माध्यमातल्या या अन्नपूर्णाविषयी.. १) अर्चना अर्ते २) कल्पना तळपदे ३) स्मिता मयेकर ४) रुपा नाबर ५) मधुरा बाचल ६) शुभांगी कीर स्वयंपाकाची संथा.. फार आधी ती घरातून मिळायची. आजी, आई, काकूकडून नंतर सासूकडून. बाईला स्वयंपाक आलाच पाहिजे ही विचारसरणी त्याचा मुख्य ...